Skip to main content

मिठीत तुझ्या असताना...

लेखक जेनी... यांनी सोमवार, 05/05/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिठीत तुझ्या असताना... ओठातल्या ओठात हसताना.. पापण्यांची होते फडफड श्वास श्वासांवर झेलताना... धुंद मी..बेधुंद तु असताना.. रती मी..मदन तु होताना... शहारतो श्वास माझा... ओठांशी ओठ बिलगताना... मोकळ्या केसातुन फिरताना... बटा गालावरच्या आवरताना... हळुच चोरली नजर मी चोळीची गाठ सुट्ताना.... ती नजर झेलताना.. तो श्वास पेलताना.. रोमांच उभे पाठीवर बोटांनी नाव कोरताना मज मी विसरुन जाते... क्षण भरभरुन जगते... सावली तुझी पांघरुन डोळ्यातली लाज लपवते... हा ऋतु रोज यावा.. हा स्पर्श रोज व्हावा.. सहवास मला तुझा असा रोज रोज घडावा... रोज रोज घडावा.....!!!
लेखनविषय:

वाचने 18688
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

काव्यरस : = गरम पाण्याचे कुंड याचा अर्थ स्थळ - hot water bath-tub असाही घेता येइल!! :-)

मैने पुछा. क्या अनजान हो उन मुलाकातों से? जवाबमे सवाल आया कही से , ख्वाबो का भी कोई हिसाब होता है?

In reply to by प्रचेतस

तसा विचार मी ही केला पहिल्यांदा. पण मग तशी फार घसरली सुद्धा नाही आहे म्हणुन गप्प बसावं म्हंटल. तरीही जेनी तिन टिंबे यांना तुम्ही लिहीता छान, फक्त रोमान्स अन अश्लिल मधली धुसर रेषा लक्षात घ्या अशी विनंती. तश्या या जेनी ३टिंबे आजवर मिपाच्या इतिहासात बरच छान लिहुन गेल्या आहेत हे नम्रपणे नमुद नरते.

तांबड्या रंगाच्या छटा मिसळलेली गुलाबी कविता. वृत्त वापरायचं असेल तर "येक पे रैना! या गोड्डा बोलो या चतुर"

मोकळ्या केसातुन फिरताना... बटा गालावरच्या आवरताना... हळुच चोरली नजर मी चोळीची गाठ सुट्ताना.... खल्लास आपण.. आजपासुन आपण तुमचा पंखा जेनीबै.. (स्वगतः च्यायला, हि लग्नाळलेली मंडळी आमच्यासारख्या सिंगलांना जळवणं कधी थांबवणार आहेत काय माहीत?

In reply to by जेम्स बॉन्ड ००७

बाय द वे ह्या गाठीवाल्या चोळ्या बाजारात अवेलेबल आहेत काय ? नाही फारच जुनी फ्याशन आहे म्हणून विचारले.

In reply to by धर्मराजमुटके

जुन्या फ्याशनीच फिर फिरुन बाजारात येतात. ८०-९० सेंमी मध्ये किती बदल होऊ शकतात असेही, नै का?

वृत्त नाही..टेस्ट नाही रोम्यांटिझम मेला हो वेणी नव्हे..बॉब-कटाचा सैल होऊन सुटला 'बो!'

ग्रामीण भागातल्या एका प्रणयोत्सुक स्त्रीचे शहरी साहित्यिक मनोगत... जमलंय हो तीन टिंबं! (का कुणास ठाऊक अजंठा मधल्या काळंसावळं 'केलेल्या' सो कु(ज्यु) ची आठौण आली.)

In reply to by आनन्दिता

*ROFL* असं असेल तर पुढचेही भाग लवकर येउ द्या ओ जेनीबै.. *wink*

खरं तर स्मायली द्यायचीच झाली तर मी अश्या कवितेला अशी स्मायली देईन... *kiss3* [नीलकांताने पुरवलेली ही स्मायली नायतर आणखी कुठल्या धाग्यावर वापरणार? :) ]

रांगेत उभा असताना... पोटात प्रेशर असताना.. आतड्याची होते गुडगुड कंबर आवळून धरताना... बाहेर मी..आत तु असताना.. अवघडला मी..मोकळा तु होताना... गुदमरतो श्वास माझा... वाट तुझी बघताना... बंद दार उघडताच... चपळाईने घुसताना... हळुच चोरली नजर मी लाईन 'कट' करताना... त्या नजरा झेलताना.. त्या शिव्या पेलताना.. गुद्दे पडले पाठीवर घाईत दार लोटताना मज मी विसरुन जातो... क्षण भरभरुन जगतो... कडी दरवाजाची लावून पब्लिकच्या शिव्या खातो... हा मोका रोज यावा.. हा मुहूर्त रोज मिळावा.. नंबर माझा टायमात असा रोज रोज लागावा... रोज रोज लागावा.....!!!

In reply to by चिन्मय खंडागळे

हान तेच्या मारी!! *clapping* चिन्मय ही कविता वेगळी टाकुया का? स्वयंभू विडंबन आहे हे. म्हणजे मी ते चोरताना कस विडंबनात बसेल असा विचार करत होते बघा तोवर तुम्ही बरोबर नजर चोरलीत. खरच सांगा नविन धाग्यात टाकु या का?

In reply to by चिन्मय खंडागळे

@रांगेत उभा असताना... पोटात प्रेशर असताना.. आतड्याची होते गुडगुड कंबर आवळून धरताना...>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @बाहेर मी..आत तु असताना.. अवघडला मी..मोकळा तु होताना>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

In reply to by चिन्मय खंडागळे

वृत्तातल्या गडबडगुंड्यासकट, टिंबांसहित घायकुतीला आलेले विडंबन! बुवांनी हल्ली काही टोळभैरवांना घाबरून मिपावर अशा करूण कविता लिहिणे बंद केले आहे. पण हा एकलव्य शिष्य बघून बुवा खूश होतील नक्की!

In reply to by पैसा

@जास्त प्रकाश पाडतील! >>> :-/ दु...दु...दु... :-/ http://www.sherv.net/cm/emoticons/war/shooting-soldier.gif पै तै .. @हत्ती http://www.sherv.net/cm/emoticons/guns/banana-gun.gifअगोबा! :-/

थांबा....

मी आता परत दुकान चालू करतो! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/grenade-toss.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

ही ह्हा ह्हा हाहा!!! ही ह्ही ही ह्ही ही ह्ही, हि & हि =)) स्मायली का लपविता =))

In reply to by चिन्मय खंडागळे

"फॉक्कन" आलेल्या या विडंबनामुळे मनःशांती, इ.इ.इ. सगळेच मिळाले. -बॅटू आगरी.

In reply to by बॅटमॅन

काय सांगू! ओरिजिनल कविता वाचली तेव्हापासूनच हात शिवशिवत होते. पण विडंबन 'होतच' नव्हतं. शेवटी प्रतिभा काय आणि प्रेशर काय, यायची तेव्हाच येते. तोवर येरझार्‍या घालत राहण्याशिवाय पर्याय नसतो.

मिठीत तुझ्या असताना... धिकताना तिकताना धिकताना... है धिकताना तिकताना तिकताना ...!

बेडरुम मधे (आपापल्याच) प्रिंट करुन लावावी अशी कविता. जेनी आज्जी अजुन येउदैत टिंबे...आय मीन आपल्या कविता

मोकळ्या केसातुन फिरताना... बटा गालावरच्या आवरताना... हळुच चोरली नजर मी चोळीची गाठ सुट्ताना.... मरी गयो ! *man_in_love* काव्यरस: गरम पाण्याचे कुंड णाही णाही... काय हे जेणी ! आधीच इथे गरमी...सॉरी सॉरी उकाडा वाढला आहे,त्यात गरम पाण्याच्या कुंडात कोण उडी मारणार ? *help* बाकी कविता फारच स्फोटक आहे हो... *bomb*

अजूनेक!... अजूनेक!!... डोक्यात तुझ्या फिरताना... अन् कडकडून चावताना.. टकलावर होते तडफड मी तुरूतुरू पळताना... 'ऊ' मी..'उकिरडा' तू.. शिकारी मी..सावज तू... शहारतो श्वास माझा... रक्ताचे घोट पिताना... मोकळ्या केसातुन फिरताना... जटा पालथ्या घालताना... हळुच चोरले अंग मी तू डोके खाजवताना.... तो कंगवा चुकवताना.. त्या नखांमध्ये लपताना.. रोमांच उभे पाठीवर बोटांतून तुझ्या सुटताना मज मी विसरुन जाते... भरभरुन अंडी घालते... सावलीत तुझ्या केसांच्या माझ्या लिखा लपवते... हा ऋतु रोज यावा.. हा स्पर्श रोज व्हावा.. शाम्पूचा स्पर्श तुझ्या केसांना कधी न घडावा... कधी न घडावा........!!! कधी न घडावा........!!! (आता जेनीताई माझा मर्डर करायला धावणार बहुतेक!)

In reply to by स्पंदना

डोक्याला डोकं भिडतं जिथे उवांना नवं घर मिळतं तिथे उवाsss लिखांना मारी लायसिलsss!! *scratch_one-s_head*

In reply to by सूड

+१११... दुसरी कविता पण त्याच धाटणीची आहे. बहुतेक सगळा स्टॉक तसलाच आहे, पिवळसर गुलाबी. ;) *biggrin*

In reply to by जेनी...

ओ जनाबाई आज्जी, धन्यवाद खुलासा केल्याबद्दल. मला माहीती नव्हते की या असल्या कविता तुम्ही तुमच्या सारख्या म्हातार्‍या लोकांसाठी लिहीत आहात म्हणुन... चालु द्या. नाहीतरी म्हातारपणात आता करायला काही नसेलच म्हणुन पुर्वीच्या/भुतकाळातील गुलाबी आठवणी येताहेत जणू... ;)

In reply to by जेनी...

आता जनाबाई आज्जींचा आदेश डावलुन कसं चालेल? रजा घेतो ह्या धाग्यावरुन. *bye*

In reply to by शिद

बघा आलात परत *biggrin* म्हणजे तुम्हालाच करमत नैय्ये ... आता मलाच म्हणावं लागतय " चालु द्या .. चालु द्या " *lol*

In reply to by सूड

गुलाबी रंगातली अंमळ पिवळी कविता !! नॉय नॉय.. गुलाबी ढंगातली अंमळ जुलाबी कविता??

In reply to by सूड

हिहीहि सुड काका डोन्ट माइंड हं .. पण लग्न झालेल्या लोकांचे गुलाबी आयुष्य पिवळे होण्याची स्वप्न बघत बसणार्‍यान्ना काय कळणार म्हणा *biggrin*

In reply to by जेनी...

छे!! मी कशाला माईंड करु. अभि, आपको अर्धे हळकुंड में पिवळा होनाईच हय तो वयसा सही. ;)

चिन्मयचे धाडस बघुन मला पण चेव आला, माझ्याही मुठी वळु लागल्या आणि ठरवले की लग्न करुन गांजलेल्या माणसाची कैफियत मांडायचीच. जेनीतै सारख्या कव्यत्री रम्य चित्र तरुणांच्या डोळ्या समोर उभे करतात आणि मग ते बिचारे (माझ्या सारखे) बरोबर लग्नाच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्या नशिबी काय वाढुन ठेवलेले आसते ते सांगण्याचा एक प्रयत्न (अर्थात हेची परवानगी न घेता... कोणी घरी सांगु नका रे) मुठीत तुझ्या असताना... छद्मी तू हसताना... हृदयाची होते धडधड... शब्द तुझे झेलताना... त्रस्त मी...बेधुंत तू असताना... पती मी... अनाहिता तू होताना... अताशा लागतो उर्ध्व माझा... जीने चार ही चढताना हात टकलावरुन फिरवताना... शर्टात पोट आवरताना... हळुच चोरली नजर मी... (पँटचे) बक्कल तटकन तुटताना ती नजर झेलताना... तो फुत्कात पेलताना... रट्टा बसे पाठीवर... बोटाने नाक कोरतना... मग... मी मजला विसरुनी जातो... पार्टीला जास्तच घेतो... सावली तुझी पडता पाठी... मी तोंड लपवुनी पितो... तु माहेराला जावे... फोनही तुझा न यावा... एकांत मला असा हा... केव्हातरी (तरी) मिळावा... केव्हाततरी(तरी) मिळावा...!!! (सगळी कडे तीन टिंबे द्यायचा प्रयत्न केला आहे कुठे राहिली असतील तर दुर्लक्ष करावे)