कातरवेळ
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!
मिसळपाव