दि. २२ जून २०१४ रोजी झालेल्या मि.पा. कट्ट्याचा वॄतांत
मी तसा मिपाचा दोन वर्षे जुना सदस्य आहे. परंतू मिपाकरांना भेटण्याची माझी ही पहिलीच वेळ. खुप दिवसांपासून मि. पा. करांना भेटायची इच्छा होती ती श्रीरंग जोशी, वल्ली, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा यांच्यामुळे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचे आभार.
शनिवारी वल्लींनी मेसेज करून सांगितले की रविवारी कट्टा आहे श्रीरंग जोशी व इतर सदस्य येणारेत. तेव्हाच ठरवले की हा चान्स सोडायचा नाही. रविवारी संध्याकाळी ४ ला शनिवार वाड्याला पोहोचलो.