Skip to main content

छायाचित्रण

एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 10/04/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
. १९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता. ...

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ८ निकाल.

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 09/04/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, 'चतुष्पाद प्राणी' छायाचित्रण स्पर्धा आठला नेहमीप्रमाणेच चांगला आणि भरभरुन असा प्रतिसाद मिळाला अनेक सदस्यांनी एकापेक्षा एक सरस अशी छायाचित्र स्पर्धेत टाकली. सदस्यांनी केलेले मतदान आणि त्यातल्या निवडीच्या पद्धतीत पहिल्या पसंतीला तीन गुण, दुसर्‍या पसंतीस दोन गुण, आणि तिसर्‍या पसंतीला एक गुण अशा पद्धतीने यावेळी छायाचित्र निवडली त्यातून अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे ठरले. तिसर्‍या पसंतीत काटेकी टक्कर Mrunalini आणि खान्देशी यांच्यात झाली अवघ्या दोन गुणांचा फरक राहीला होता. सर्व सहभागी सदस्य, विजेत्या स्पर्धकांबरोबर मृनालीनीचं अभिनंदन.

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 23/03/2015 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो. गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं.

खग्रास सूर्यग्रहण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 20/03/2015 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज (२० मार्च २०१५) खग्रास सूर्यग्रहण झाले. जगात अनेक ठिकाणी या घटनेला बरेच बरेवाईट (जास्त करून वाईट) संदर्भ असले तरी शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही एक दुर्मिळ पर्वणी असते. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या मानाने खग्रास सूर्यग्रहण कमी वेळा होते. या प्रकारात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकत असल्याने खंडग्रास सूर्यग्रहणात शक्य नसलेले अनेक शास्त्रीय प्रयोग या काही मिनिटांच्या काळात आटपण्यासाठी त्यांची लगबग चाललेली असते. त्याशिवाय, सूर्याचे अनेक अवस्थेतली प्रकाशचित्रे काढण्यासाठी त्या विषयातल्या तज्ज्ञ आणि हौशी लोकांनाही ही पर्वणीच वाटते.

साईझ मॅटर्स

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 10/03/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
डीएसलार घेवून फिरणारया माकडांच्या गँग मध्ये नुकताच सामील झालो होतो तेव्हाची गोष्ट. मोठा कॅमेरा हातात आला की आपण लई भारी फोटोग्राफर होणार अस उगाचा वाटायला लागते. पण मॅन्युअल मोड वापरताना सुरवातीला जो घाम फुटतो तो सगळी हवा काढून टाकतो. आणि मग उगाच खुन्नस खावून सराव चालू होतो. मिळेल तिथे, जे हाताला लागेल त्याचे फोटो काढणे. मध्येच कुणी "वर्तमानपत्रात काम करता का?" असे विचारून उगाच कुरवाळून जातो. असो. असाच एक सराव बेंगलोर मध्ये एका तळ्याकाठि चालला होता. तिथे एका वॉटर लिलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न चालू होता. काहि केल्या मनासारखा फोटो येत नव्हता.

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 04/03/2015 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र.

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र.७: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/03/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.

छायाचित्र स्पर्धा क्र. ७: शांतता: मतदानासाठी धागा

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 18/02/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! छायाचित्र स्पर्धा क्र.७ मतदानासाठी हा धागा आहे. या स्पर्धेला अभूतापूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद! सर्व सदस्यांनी आपल्या आवडीच्या छ्याचित्रांना दि. २५/०२/२०१५ पर्यंत भरभरून मतदान करावे ही विनंती! एखादे चित्र चुकून राहिले असेल तर कृपया त्वरित निदर्शनास आणून द्यावे.