मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चित्रपट

मकाण्णाचे सोने - जलजला

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भगवान शंकराने आपला तिसरा नेत्र उघ्डला तर त्यातून निघणार्‍या अग्निज्वाळांनी संपूर्ण सृष्टी भस्मसात होईल हे लहानपणी वाचलेलं बहुतेकांना आठवत असेल. परंतु विनोद शहा आणि हरीश शहा या दोन महान विभूतींनी पूर्वापार चालत आलेली ही समजूत खोटी आहे आणि शंकराच्या तिसर्‍या डोळ्यातून अग्निज्वाला न निघता फक्त लेसरबीमच निघतो, या लेसरबीममुळे फक्त भूकंप होतो आणि त्यात फक्त खलप्रवृत्तीचे व्हिलन लोकच मरतात आणि सत्प्रवृत्तीचे हिरो लोक सुखरुप निसटून जातात हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं आहे! स्वत:च्या मूर्तीकडून करुन घेतलेले हे चमत्कार पाहून साक्षात शिवशंकरालाही संतापाने तांडव करावसं वाटलं असेल.

प्रेमअगन..!

पाटिल ·
प्रेमअगन. इसवी सन १९९८. फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना. राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन. स्मिता जयकर- सूरजची आई. अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे. बीना बॅनर्जी- सपनाची आई. समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ). पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे..! विशालभैय्या आणि सपना रोज वेगवेगळ्या स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात. कारण अनुपमपापा अब्जाधीश आहेत. कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..

आप मुझे अच्छे लगने लगे-२

पाटिल ·
लेखनविषय:
भाग-१: https://www.misalpav.com/node/49462 (पुढे चालू)... 'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे' रोहित-निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद चाललाय. ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..!

बोंबललेल्या सुहागरातीची कहाणी (संपूर्ण)

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सृष्टीची रचना झाल्यापासून शेकडो वर्ष पृथ्वीतलावर राहिलेल्यांचा असा दृढ विश्वास आहे की इच्छाधारी साप कोणत्याही क्षणी कोणाचंही रुप धारण करु शकतात. असं माझं मत नाही बरं का, राजकुमार कोहली नामक मल्टीस्टारर सिनेमांचा कारखाना चालवणार्‍या महाभागाच्या एका सिनेमाची सुरवातच या अचाट वाक्याने होते. हा राजकुमार कोहली म्हणजे खंडीभर कलाकार घेऊन तीन तासाच्या सिनेमात त्यांना कोंबून कोंबून बसवण्यात पटाईत माणूस. याचा राजतिलक हा सिनेमा तर एंटीटी-रिलेशनशिप डायग्राम आणि फ्लो चार्ट काढणार्‍यात एक्सपर्ट असलेल्यांचंही डोकं गरगरेल असा प्रचंड कॉम्प्लेक्स प्रकार आहे.

तेनाली रामा: "सोनी सब" चॅनलवरील उत्कृष्ट मालिका

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जुलै 2017 ते नोव्हेंबर 2020 इतका कालावधी चाललेली आणि 804 एपिसोड्स असलेली "सोनी सब" चॅनल वरची "तेनाली रामा" ही मालिका मी त्या वेळेस जरी मी बघू शकलो नव्हतो तरी काही महिन्यांपूर्वीपासून पासून बघायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जसा वेळ मिळेल तसे जवळपास ५० एपिसोड बघून पूर्ण झाले आणि उरलेले सर्व एपिसोड बघायची माझी इच्छा आहे. "सोनी लिव्ह" या ॲपवर या मालिकेचा ऑडियो आणि व्हिडिओ थोडा पुढे मागे होत असल्याने (त्याचे कारण माहिती नाही) मी ही मालिका युट्युबवर बघत आहे. युट्युबवर पूर्ण लांबीचे सगळे एपिसोड उपलब्ध आहेत.

वंडर वूमन आणि ग्रीक पुराणातील व्यक्तिरेखा!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मार्वल कॉमिक्स किंवा डीसी कॉमिक्स असो, ते त्यांच्या सुपरहीरो चित्रपटांमध्ये ग्रीक पौराणिक कथांचा स्मार्ट वापर करतात. मार्व्हलच्या थॉर प्रमाणेच, डीसीने वंडर वुमन सुपरहीरो तयार करण्यासाठी झ्यूस आणि एरेस या ग्रीक देवतांच्या कथेचा वापर केला. मार्वलमध्ये कॅप्टन अमेरिका हा सुपरहिरो आहे ज्याचा संदर्भ इतिहासातील युद्धामध्ये आहे आणि तसेच काहीसे वंडर वूमनमध्ये पण आहे.

स्पायडरमॅन: घरचा, घरापासून दूरचा आणि घरचा रस्ता हरवलेला!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अवेंजर्स" या अमेरिकन सुपरहिरो चित्रपट सिरीजला पुढे नेणाऱ्या 2019 साली आलेल्या "स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम" या चित्रपटात पीटर पार्कर युरोपमध्ये सहलीवर जातो तेव्हा व्हेनिसमध्ये एका वॉटर मॅनचा हल्ला होतो तेव्हा चेहऱ्याऐवजी जादूचा गोळा असणारा कुणीतरी (मिस्टेरिओ) त्याच्यावर हिरवा गॅस सोडून कंट्रोल करतो. 2011 साली मी लिहिलेल्या जलजीवा कादंबरीत असलेले जलजीवा मला आठवले. या चित्रपटात त्या पाणी मानवांना इलेमेंटल्स म्हटले आहे. माझ्या कादंबरीतील जलजीवा पण असेच आहेत फक्त त्यांची व्युत्पत्ती वेगळ्या पद्धतीने होते. असो.

हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं

हस्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते नेटकरी मंडळी तर सायबर क्राईम मध्ये वस्ताद असल्यागत फिरत असतात ,त्यांना असे लावते कि एखाद्याचा आयपी ऍड्रेस मिळालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी पोचतील आणि तिसऱ्या दिवशी जेल होईल पण पोलिसाच्या कामात बऱ्याच खाचा खोचा असतात ह्या चित्रपटात तर दरोडेखोर सरळ सांगतो कि उत्त

आप मुझे अच्छे लगने लगे.

पाटिल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आप मुझे अच्छे लगने लगे. इसवी सन २००२. हृतिक= रोहित, अमिषा= सपना, किरण कुमार= ढोलकिया (सिनियर), मुकेश तिवारी= रमन ढोलकिया (ज्युनिअर), निशिगंधा वाड= सपनाची भाभी, आलोकनाथ= रोहितचा बाप. सपनाचा बाप ढोलकिया (सिनियर) हा शहरातला मोठा डॉन.