Skip to main content

गोष्टी सिनेमाच्या - भाग ३

लेखक साहना यांनी शुक्रवार, 16/06/2023 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
डेव्हिड लिंच ह्या अवलिया अमेरिकन दिग्दर्शकाबद्दल मी कधी तरी विस्ताराने लिहीन. कारण हि व्यक्ती आहेच तशी प्रतिभाशाली. डेव्हिड लिंच ह्यांनी अमेरिकन टीव्ही वर ट्वीन पिक्स नावाची एक मालिका आणली. मैलाचा दगड वगैरे विशेषणे आम्ही काही महत्वाच्या घटनांना वापरतो. पण ट्वीन पिक्स हा टीव्ही कलाक्षेत्रांतील मैलाचा दगड नव्हता तर डेविड लिंच ह्यांनी थिल्लर डेली सोप चा डोंगर फोडून त्यावर कथानक, चरित्र निर्माण ह्यांचा डांबर टाकून जो जबरदस्त एक्सप्रेस वे बनवला तो थेट आम्हाला आजच्या नेटफ्लिक्स, प्राईम इत्यादींच्या दुनियेत घेऊन आला.

गोष्टी सिनेमाच्या - भाग २

लेखक साहना यांनी शुक्रवार, 16/06/2023 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी सिनेमाच्या - भाग २ नॉस्टॅल्जिया म्हणजे भूतकाळाच्या आठवणीत रमणे एक विशेष भावना आहे. सर्वच लोकांना ह्या भावनेचा अनुभव असला तरी काही लोकांना भूतकाळाविषयी विशेष आत्मीयता असते. आपले जुने प्रेम, घर ह्यांच्याबद्दल लोकांना आत्मीयता तर असतेच पण काही लोकांना अत्यंत साध्या साध्या गोष्टींची आठवण सुद्धा येऊन भावना आवरता येत नाहीत. एखाद्या अगरबत्तीचा सुगंध, फुलांचा वास, किंवा माजघरातील दिव्याच्या वातीची आठवण, एखादे पक्वान्न आणि अत्यंत सध्या सरळ गोष्टी ह्या भावना ट्रिगर करू शकतात. असो, ज्यांना अनुभव आहे त्यांना १००% ठाऊक आहे कि मला काय म्हणायचे आहे.

गोष्टी सिनेमाच्या - भाग १

लेखक साहना यांनी गुरुवार, 15/06/2023 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी सिनेमाच्या - भाग १ लहानपणी शांता शेळके ह्यांची चित्रपट विषयक काही पुस्तके मला कुणी वाचायला दिली होती. त्यांत माझ्या आठवणी प्रमाणे काही इंग्रजी चित्रपटांचा सारांश दिला होता. हे अनेक चित्रपट जुने होते आणि ग्रामीण भागांत (आणि शहरांत सुद्धा अनेक ठिकाणी) कुठे केबल आणि इंटरनेट नसल्याने त्या काळी मला बघता आले नाहीत. पण तरुणपणी ते सर्व चित्रपट मी आवर्जून पाहिले. शांता शेळके ह्यांनी मला इंग्रजी चित्रपट न पाहता सुद्धा चित्रपटांची आवड लावली असे म्हणू शकते. त्या काळी हॉलिवूड चित्रपटांची एक डिक्शनरी यायची त्यांत शेकडो चित्रपटांची माहिती येत असे, म्हणजे ३-४ वाक्यांत चित्रपटाची कथा आणि एक रेटिंग.

३००० वर्षांचा विरह

लेखक साहना यांनी मंगळवार, 13/06/2023 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
ऍमेझॉन वर हा चित्रपट आहे. जिन्न हा विषय आम्हाला बहुतेक करून अल्लाउद्दीन च्या दिव्यामुळे ठाऊक आहे पण जिन्न हि संकल्पना इस्लाम मधील खूप लोकप्रिय संकल्पना आहे. इस्लामच्या अनुसार जिन्न हे दुसर्या जगांतील जीव आहेत आणि मानवा प्रमाणेच ते सुद्धा अल्लाह चे अनुसरण करणारे किंवा काफिर असू शकतात. जिन्न मानवाला दिसत नाहीत पण मानवीय जीवनात कधी कधी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो. इस्लाम मधील बहुतेक संकल्पना ह्या इस्लाम पूर्व गोष्टीचे rehashing आहेत त्याच प्रमाणे जिन्न सुद्धा इस्लाम पूर्व आहे पण इस्लाम जगभर पसरला म्हणून ती सुद्धा पसरली आणि इंग्रजीत त्याला लोक जिनी ह्या नावाने ओळखू लागले.

भोला चित्रपट...भोळा प्रेक्षक.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 28/05/2023 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
अविभाज्य अमेझोनचा (Amezon Prime) सन्माननीय सदस्य म्हणून कंपनीने सुचना पाठवली की भोला सिनेमा आपण चकटफू बघू शकता. हल्ली ही कंपनी सुद्धा भारी लब्बाड झालीयं.सिनेमे भाड्या ने(मुळ शब्द भाडे याचे ब.व.,घराचे भाडे,बसचे भाडे सारखे) किंवा विकतही देतात. पहिल्यांदा असे काही नव्हते.अ.प्रा वर पुर्व प्रकाशित २१ सरफरोश मी फुकट पाहीला पण आता मात्र पैसे मोजावे लागतात.(बरे झाले मी लवकर पाहीला) साX, विपणन तज्ञ (Marketing Expert) सुद्धा एक भारीच जमात आहे.आपला ढोल आणी ग्राहकाचा बॅण्ड कसा जोरात वाजवायचा यांना बरोबर समजते. खुल्या चित्रपटगृहाची सवय, बंद चित्रपटगृहांत बसवत नाही.आता अंतरजालावर सोईस्कर वाटते.

‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 18/05/2023 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुम्हांला बुद्धीला ताण द्यायला आवडतं असेल.आऊट ऑफ बॉक्स साय –फाय सिनेमा आवडतं असेल तर ‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’ हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. मी हा सिनेमा बघण्याचे कारण म्हणजे सात ऑस्कर या सिनेमाने खिशात घातले आहे.तेव्हा पाहायला सुरुवात केलीच.

द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा

लेखक जावा फुल स्टॅक यांनी शुक्रवार, 05/05/2023 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा. पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे.

महाराष्ट्र शाहीरः नोंदी

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 05/05/2023 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
"महाराष्ट्र शाहीर" पाहिला. चित्रपटाची चित्रपट म्हणून मला चिकित्सा करण्याची अधून मधून उबळ येते, त्या अर्थाने हा रसास्वादही नाही, परीक्षणही नाही, समीक्षा तर नाहीच नाही. चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती, निरपेक्ष नीरक्षीरविवेक मांडून तपासायचे माझ्याकडून हळू हळू कमी होत आहे. एरवी स्मरणकातरतेचे मला वावडे आहे. मराठीला ग्रासलेल्या स्मरणकातरतेची उबग येते. विशेषतः मराठी चित्रपटांना एखादा हिट फॉर्म्युला सापडला की दळ दळ दळण दळतात. नॉस्टॅल्जियाचे म्हणालतर खूप मोठे मार्केट आहे. मराठी चित्रपटांना ते सतत खुणावत असतं. त्याची जाणीव ठेवूनच हा चित्रपट पाहायला घेतला.

ती आणि इतर.... "सायलेन्स इस नॉट दि ऑप्शन....!!!"

लेखक मधुरा कुलकर्णी यांनी गुरुवार, 06/04/2023 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
#LatePost             वास्तविक हे चित्रपट समीक्षण मी खूप आधी लिहिलं होतं... पण प्रकाशित करायचा मुहुर्त आत्ता लागलाय असं म्हणायला हरकत नाही...              खरंतर चित्रपट समीक्षण हा व्यक्तिपरत्वे भिन्न मत दर्शवणारा लेख आहे.. पण तरी एखादा चांगला चित्रपट आणि त्याच समीक्षण करणं आणि मास कम्युनिकेशन साधून एखादा जनुईन चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणं...

चित्रपट समीक्षा -- The Man from Earth (2007)

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 26/03/2023 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरीलच एका धाग्यात "The Man from Earth" या चित्रपटाबद्दल वाचलं. मिपाकरांना आवडला, म्हणजे चित्रपट चांगला असणारच, याची खात्री होती. पण हल्ली सवयीप्रमाणे, चित्रपट पाहताना अपेक्षा तशा बाजूलाच ठेवलेल्या असतात. उगीच नंतर वेळ वाया गेल्याची खंत राहत नाही.