मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चित्रपट

चित्रपट परिचय : दी झोया फॅक्टर

मराठी कथालेखक ·
माझ्या मते लगान चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये एक नवे पर्व निर्माण झाले. या पुर्वी प्रेमकथा, प्रेम त्रिकोण , गुन्हेगारी, लॉस्ट अ‍ॅन्ड फाउन्ड ई मोजक्याच विषयांत अडकलेला व्यावसायिक चित्रपट अनेक विषयांना स्पर्श करु लागला. लगान प्रमाणेच काही चित्रपटांचा विषय एखादा खेळ होता. दी झोया फॅक्टर हा पण क्रिकेटवर बेतलेला चित्रपट आहे. क्रिकेट या खेळात खूपशी अनिश्चितता आहे. त्यामुळे गुणवत्तेबरोबरच "नशिबाची साथ" मिळणेही गरजेचे असे क्रिकेट रसिकांना व खेळाडुंना वाटू शकणे खूप स्वाभाविक आहे. तर या आत्मविश्वास विरुद्ध "नशिबाची साथ" या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला आहे.

बागी ( वांगी ) ३ परीक्षण

हस्तर ·
थोडक्यात :- पहिला इंटर्वल पर्यन्त भाग साऊथ च्या तडाका चा कॉपी आहे ,पण मूळ चित्रपट सरस आहे ,दुसरा भाग फक्त टायगर श्रॉफ ची हाणामारी आहे गरिबांचा रेम्बो टायगर ने जेवढे जमेल तेवढ्या उडया मारल्या ,मारधाड मध्ये त्याला सौमर साल्ट असे काहीतरी म्हणतात आणि गाणे चालू असताना उड्या मारल्या कि डान्स म्हणतात तडकानुसार मोठा भाऊ अनुकंपा तत्वाने इन्स्पेक्टर बनतो पण दरवेळी लहान भाऊ येऊन त्याचे काम करतो ,दोन बहिणी ,त्यांच्याशी भांडण मग मुलगी बघायला त्यांच्याच घरात जात सगळे सारखे आहे पण मूळ चित्रपट ज्यात तमाना भाटिया आहे तो जास्त नेत्रसुखद आहे तडाका मध्ये भित्रा भाऊ पण शेवटी एकशन करतो इकडे ते

बहिणीला जपणारी मारग्रेट

महामाया ·
Music For Millions ---------------------- गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... आठवणीतला हॉलीवुड रवींद्र दत्तात्रय तेलंग अकल्पितपणे घडून आलेल्या योगाची लज्जत न्यारीच असते. सारखं कथानक असलेले दोन चित्रपट बारा तासांच्या आत बघण्याचा योग असाच एकदा मिळाला-एक हॉलीवुडचा, एक बॉलीवुडचा.

1917 : रेस अगेंस्ट टाईम

महासंग्राम ·
90च्या दशकातल्या तरुणांना कॉल ऑफ ड्युटी ww 1 हा गेम माहितीच असेल.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : 'Tanhaji: The Unsung Warrior'

bhagwatblog ·
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह गेला”. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मावळे, सरदार, गनिमीकावा तंत्र, विविध आरपारच्या लढाई, किंवा त्यांच्या मोहिमे वर चित्रपट निघू शकतो.

छपाकसे पेहेचान ले गया...

शा वि कु ·
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं. हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे- 1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.

चित्रपट परीक्षण - पानिपतचे पानिपत !

kvponkshe ·
https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcS0jmiD28tffm_2izqUlI7OMNaBFNxivrxa-Mrke-qR_R4YyrGt निर्माते कशासाठी चित्रपट काढतात ? लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ? खरा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून ? समाज प्रबोधन करण्यासाठी? वरील प्रश्नाचे खरे उत्तर "पैसे कमावण्यासाठी " हेच आहे. जेव्हा एखादा निर्माता शेकडो कोटी खर्च करून एखादा चित्रपट काढतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की त्यातून त्याचे शेकडो कोटी वसूल व्हावेतच, शिवाय अधिक शेकडो कोटींचा नफा व्हावा. आता उलट बाजू विचार करू. जेव्हा एखादा प्रेक्षक ३०० -४०० रुपयाचे तिकीट काढून चित्रपट बघायला जातो, तेव्हा त्याची काय अपेक्षा असते?

पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

निमिष सोनार ·
माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना: मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक

bhagwatblog ·
“शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो.