Skip to main content

चित्रपट

96 - प्रेमाचा धवलगिरी

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 08/05/2019 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.

सरफरोश...

लेखक चिनार यांनी गुरुवार, 02/05/2019 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
सरफरोश सिनेमाला वीस वर्ष पूर्ण झाल्याचे वाचनात आले. साहजिकच वीस वर्षांपूर्वी आपण काय करत होतो हा विचार डोक्यात आला. पण त्यात काही विशेष सांगण्यासारखं नाही. आणि आणखी वीस वर्षांनी हा प्रश्न पडल्यावरही उत्तर हेच असणार ह्यात शंका नाही. असो. तर ९९ साली सरफरोश रिलीज झाला त्यावेळी मी आठव्या वर्गाची वार्षिक परीक्षा दिली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या.टीव्हीवर सरफरोशचं ट्रेलर बघितल्याचं मला पक्कं आठवतं. ट्रेलरमध्ये आमिरचे वडील त्याच्या कपाळावर टिळा लावतात तो प्रसंग आवर्जून दाखवयाचे. आता त्यादरम्यान (आणि त्यानंतरही!) देशभक्तीपर सिनेमाचं बॅटन सनी देओलच्या हातात होतं.

भीती!

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 30/04/2019 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
भीती.. सर्वव्यापी, सार्वकालिक, रूप बदलत व्यापून टाकणारी भावना. भीतीची भावना ही चांगली गोष्ट नाही असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात तसं नाही. काही प्रकारच्या भीती चांगल्या असतात. या भूतलावर आपलं अस्तित्व टिकण्यासाठी ज्या गोष्टी उपयोगी ठरल्या त्यापैकी भीती ही महत्वाची गोष्ट आहे. ती जर नसती तर fight, flight or freeze या प्रतिक्रिया देऊच शकलो नसतो आणि आपलं अस्तित्व कधीच सम्पलं असतं. आदिमानवाच्या आणि आपल्या जीवनमानात झालेल्या बदलामुळे आज भयाची कारणं बदलली आहेत. पण प्रतिक्रिया, मनोकायिक पातळीवरच्या तशाच आहेत.

चित्रपट परिचय – Gifted

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 29/04/2019 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
२०१७ चा हा चित्रपट हिंदीतून बघावयास मिळाला. सात वर्षाची मुलगी मेरी आणि तिचा मामा फ्रँक यांची ही कथा आहे. तशीच मेरीची आजी (आईची आई) एव्हलीन , आणि मृत आई डायान यांची ही कथा आहे. सात वर्षाची ही गोड मुलगी आपल्या मामासोबत राहते आहे. सुमारे सहा-साडेसहा वर्षापुर्वी डायानने फ्रँककडे सोपवत स्वतःला संपवले होते. मामा , एक बोका आणि शेजारी राहणारी घरमालकीण रोबर्टा हे तिचं विश्व आहे. मेरी तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप वेगळी आहे कारण तिची बुद्धीमत्ता असामान्य आहे. समवयस्क मुले तिला मंद-पकावू वाटतात. त्यामुळे शाळेत जाण्यास ती उत्सुक नाही.

विहीर

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 28/04/2019 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
*विहीर: एक नितांतसुंदर अनुभव* ओशो म्हणतात.. First Principle (Truth) cannot be told. If at all it is told, it becomes second principle. Words cannot contain the Truth. All it can do, is to give a pointer towards it. विहीर सिनेमा पाहताना नेमका हाच अनुभव येतो आणि उदमेखून काही न सांगता फार महत्वाच काही सांगून जातो. माणूस कायम अनेक पातळ्यांवर जगतो.. एकाच वेळी. आयुष्य शोभादर्शीतून पहात असल्याप्रमाणे समोर उलगडत जातं. अमूर्त माणूसपण अनामिक ओढ लावत असत, त्याच वेळी त्याच प्राणीपण सुटत नाही. नात्यांतून मिळणारं बंधन उबदारपणा हवाही असतो, आणि त्याच वेळी ते रेशमी दोर काचत ही असतात प्राणांना.

ग्रीन बुक : माणूस होण्याचा प्रवास

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 22/04/2019 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास माणसाला खूप काही शिकवून जातो. विशेषतः आपल्या शहराच्या बाहेर, आपल्या राज्याच्या बाहेर, आपल्या देशाच्या बाहेर पडलो की एका वेगळ्याच जगात आपण जातो. जे जात-पात-धर्म-वर्ण या पलीकडे माणुसकी म्हणून एक धर्म आहे, ज्यामुळे आपण जगाकडे वेगळ्याच नजरेने पहायला शिकतो. ज्यात आपल्याला सगळी माणसं सारखीच आहे याची जाणीव होते. Peter Farrelly चा यंदा तब्बल 03 ऑस्कर जिंकणारी डॉक्टर डोनाल्ड शर्ले (मेहेरशाला अली) आणि टोनी लिप (विगो मॉर्टेन्सन) यांची माणूसकी उलगडत जाण्याची कथा म्हणजे ‘ग्रीन बुक’. १९६० च्या दशकात अमेरिकेतल्या प्रसिद्ध पियानो प्लेयर असणाऱ्या डॉ.

ड्युएल

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 16/04/2019 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
चांगली कलाकृती कोणती? तर जिचा आस्वाद घेणे, अनुभव घेणे संपले तरी डोक्यात सुरू राहते ती! अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे. या व्याख्येला पुरेपूर उतरणारा एक सिनेमा मला कसा भावला हे मांडायचा आज प्रयत्न करणार आहे. सिनेमा हे दृक-श्राव्य माध्यम. यात माणसांनी कमी आणि कॅमेराने जास्त बोलले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. संवादाचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणणे मांडायचा आणि दुसरा म्हणजे स्पष्ट मांडणी न करता खाणाखुणा सांगण्याचा. समोरच्याला विचार करायला भाग पाडण्याचा. यात काही गोष्टी मांडणे जाणीवपूर्वक टाळावे लागते. पण यात तोल सांभाळावा लागतो तो अति अवघड!

केसरी - चित्रपट परीक्षण/रिव्यू - स्पॉईलर अलर्ट

लेखक bhagwatblog यांनी सोमवार, 25/03/2019 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते.

चित्रपट परिचय - जलेबी

लेखक मराठी कथालेखक यांनी रविवार, 24/03/2019 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
२०१६ च्या ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले नसले तरी एका बंगाली चित्रपटाचा हा रिमेक आहे असे विकीपिडीयावर वाचल्याने उत्सुकतेपोटी डाउनलोड करुन मी हा चित्रपट बघितला. चित्रपटाचे शीर्षक जलेबी असले तरी ही गोड-गोड प्रेमकथा नाही. चित्रपटाच्या सुरवातीस नायिका आयेषा मुंबई-दिल्ली ट्रेनच्या प्रवासाला निघते. आधीच निराश आणि वेदनेने व्याकूळ असलेल्या आयेषाला एक समवयस्क अनोळखी स्त्री अनू या प्रवासात भेटते. अखंड बडबड करणार्‍या अनूला आयेषा सुरवातीला काहीशा अनिच्छेनेच उत्तर देत असते. पण हळूहळू आयेषाचा एक समांतर प्रवास सुरु होतो .. आठवणींचा आणि वेदनेचा.

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

लेखक नाखु यांनी रविवार, 13/01/2019 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
अॅक्सिडेंटल प्रॉयमिनिस्टर***** जनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला. त्यात मुलायमसिंग, लालूप्रसाद यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि हेगडे,शरद यादव यांचे धोरणी दूरदृष्टी मनसुबे याचा परिपाक म्हणून देवेगौडा यांच्या नावाला फारसा विरोध झाला नाही. अगदी तसेच कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले (पंतप्रधान होतीलच म्हणून) अश्या फारसं उपद्रवमूल्य नसलेल्या व्यक्तीला (फक्त कॉंग्रेस ला एकनिष्ठ राहिले आहेत हा बोनस गुण) मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले. आता हे माहीत असलेलेच तपशील पुन्हा