भीती!
भीती.. सर्वव्यापी, सार्वकालिक, रूप बदलत व्यापून टाकणारी भावना. भीतीची भावना ही चांगली गोष्ट नाही असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात तसं नाही. काही प्रकारच्या भीती चांगल्या असतात. या भूतलावर आपलं अस्तित्व टिकण्यासाठी ज्या गोष्टी उपयोगी ठरल्या त्यापैकी भीती ही महत्वाची गोष्ट आहे. ती जर नसती तर fight, flight or freeze या प्रतिक्रिया देऊच शकलो नसतो आणि आपलं अस्तित्व कधीच सम्पलं असतं.
आदिमानवाच्या आणि आपल्या जीवनमानात झालेल्या बदलामुळे आज भयाची कारणं बदलली आहेत. पण प्रतिक्रिया, मनोकायिक पातळीवरच्या तशाच आहेत.
मिसळपाव