भूगोल
१४ ऑक्टोबर २०२४ रात्रीचं चंद्र- शनि पिधान आणि धुमकेतू
आज १४ ऑक्टोबर २०२४ रात्री चंद्र- शनि पिधान!
C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतूचे संध्याकाळच्या आकाशात आगमन
✪ शनि- चंद्र पिधान बघण्याची दुर्मिळ संधी
✪ एका क्षणात शनि चंद्राच्या अंधार्या भागामागे अदृश्य होणार व काही वेळाने त्याच्या प्रकाशित भागाकडून परत दिसणार!
✪ महाराष्ट्रामध्ये पिधानाची साधारण वेळ रात्री ११.४५ ते १.४० अशी आहे
✪ C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतू संध्याकाळी शुक्राच्या जवळ दिसतो आहे
✪ धुमकेतू बघण्यासाठी अंधारं आकाश व पश्चिम क्षितिज दिसणारी जागा हवी
✪ स्मार्टफोनचा प्रो- मोड वापरून धुमकेतूचा फोटो घेता येऊ शकतो
✪ अनुभवावेत असे दोन्ही विलक्षण अनुभव
✪ आकाश द
माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . .
आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .
नवी ईमारतीतील अडगळ निवारण
दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.
पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले
नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
12/P पॉन्स- ब्रूक्स धुमकेतू बघण्याची व त्याचा फोटो घेण्याची संधी!
✪ सूर्यास्तानंतर थोड्या वेळानंतर हा धुमकेतू बायनॅक्युलरने बघता येऊ शकतो
✪ प्रकाश प्रदूषण नसलेल्या व अंधारं आकाश असलेल्या जागेवरून बघता येईल
✪ स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफ घेता येईल.
✪ धुमकेतू बघण्यातला रोमांच!
✪ धुमकेतू 30 मार्चला अश्विनी ता-याच्या अगदी जवळ असेल
सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की, सध्या 12/P पॉन्स- ब्रूक्स नावाचा धुमकेतू दिसत आहे. 12/P म्हणजे ज्याचा अवधी शोधला गेला होता, असा हा 12 वा धुमकेतू होता. हा धुमकेतू 71 वर्षांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. गेले अनेक शतकं त्याचं निरीक्षण केलं जात आहे.
माझी नर्मदा परिक्रमा
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !
रेवदंड्याचं दर्शन
कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.आकाश दर्शनाची पर्वणी! तारे जमीं पर!!
कल्पना चावला स्पेस एकेडमीच्या विद्यार्थ्यांसोबत आकाशातल्या खजिन्याची लूट
✪ तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी रात्रभराचं आकाश दर्शन शिबिर
✪ मुलांचा आनंदमेळा आणि ता-यांचा झगमगाट
✪ “रात है या सितारों की बारात है!”
✪ मृग नक्षत्र? नव्हे, हा तर मोssssठा तारकागुच्छ!
✪ प्रकाश प्रदूषण नसलेलं अप्रतिम आकाश आणि तारकागुच्छांची उधळण
✪ कडक थंडीतही मुलांचा उत्साह, मस्ती आणि धमाल
✪ तुंग परिसरात ट्रेक आणि मुलांसाठी नवीन एक्स्पोजर
✪ नितांत रमणीय निसर्गात राहण्याचा अनुभव
सर्वांना नमस्कार.
चंद्राद्वारे ज्येष्ठा चांदणीचे पिधान
५ फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार
✪ पिधान ह्या खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी
✪ नुसत्या डोळ्यांनी पहाटे हे दृश्य बघता येईल
✪ पहाटेच्या आकाशात शुक्र व मंगळ बघता येतील
✪ त्याबरोबर सप्तर्षी, वृश्चिक, स्वाती- चित्रा, अभिजीत, मित्र, अनुराधा आदि तारे, तारकासमूह बघण्याची संधी
✪ M 7 आणि ओमेगा सेंटारी तारकागुच्छ बघण्याची संधी
सर्वांना नमस्कार. येत्या सोमवारी पहाटे म्हणजे ५ फेब्रुवारी २०२४ च्या पहाटे आकाशामध्ये एक खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी आहे. चंद्र जेव्हा एखाद्या ग्रहाला, लघुग्रहाला किंवा ता-याला झाकतो तेव्हा त्या अविष्काराला पिधान म्हणतात.
चंद्रामागे जाणारा व परत येणारा शुक्र बघण्याचा थरारक अनुभव
✪ दिवसा झालेले चंद्र- शुक्राचे पिधान
✪ क्षणार्धात अदृश्य व थोड्या वेळाने परत दृश्यमान होणारा शुक्र!
✪ ध्यानाचा अनुभव- जणू पूर्ण अंधार आणि क्षणार्धात आलेला प्रकाश
✪ दिवसा उजेडीसुद्धा शुक्र बघता येतो
✪ आकाशातील आश्चर्ये आपल्याला विनम्र करतात
सर्वांना नमस्कार. आपल्याला दिसणारं आकाश एक जादूचा पेटारा आहे! अंधा-या रात्री दिसणारं आकाश बघताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. अशाच एका अवाक् करणा-या अनुभवाबद्दल आपल्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव अगदी वेगळा होता कारण तो दिवसा आलेला होता! दिवसाच्या वेळी आपण चंद्र तर बघूच शकतो आणि सौर फिल्टर वापरून सौर डागसुद्धा बघू शकतो.
मिसळपाव