Skip to main content

बालगीत

कित्ती लागली मला भूक

लेखक काव्-काव् यांनी मंगळवार, 21/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कित्ती लागली मला भूक खायला दे खूप-खूप-खूप वरण-भात, लिम्बू तुप खूप-खूप-खूप, खूप-खूप-खूप कित्ती लागली मला भूक खायला दे खूप-खूप-खूप मसाले-भात, टोमेटो-सूप खूप-खूप-खूप, खूप-खूप-खूप पोटात बसलाय भस्मासुर भुकेला माझ्या आलाय पूर बाबा म्हणतो दानासूर आई म्हणते बकासूर जेवढे खाइन तेवढे थोड़े कांदा भजी, बटाटे वडे बिनचूक म्हणतो सगळे पाढे चोकलेट मागतो बाबाकड़े सगलेच मला आवडते गोड़, तिखट, आंबट, कडू सगलेच मला कमी पड़ते शेव, चकली, चिवडा लाडू कित्ती खाशील लेका तू? आई माला रागावते म्हणते.. सगळेच संपले घरातले आता शेजारून मागवते पण, आई तुला खर्र..

Two Friends

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
Two Friends
Little John was thin and boney; His fat friend had a name Tony ||1|| Once both were gone in the woods; They had school bags without any food ||2|| Tony feels hungry in the after noon; John said I'll get the food very soon ||3|| John climbs on a Mango tree as he saw; a watchman came while plucking up mangoes raw ||4|| John jumped down and ran away fast; Watchman caught Tony at the last ||5|| - Pashanbhed (Stone breaker) 07/05/2011 4:15AM
"अर्रर्रर्रर्र...
काव्यरस

(बिल्ली हरवली)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 07/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल हरवली आहे एक बिल्ली... सुगरण, परंतु चित्र- विचित्र पदार्थच रांधणारी, नांवं उच्चारतांना वाचकाची जीभ लुळी पाडणारी... हरवली आहे एक बिल्ली... शुद्धलेखनप्रेमींचं अवघं मराठी बिघडवणारी, अच्रत-बव्ल्त शब्दांची उधळण करत नाचणारी... हरवली आहे एक बिल्ली... लेखन आणि फोटोग्राफी दोन्ही सुरेख करणारी, पण न पाहिलेल्या काकीच्या आठ्वणीने हमसून रडणारी... हरवली आहे एक बिल्ली... सर्वतापी चारोळ्यांची रांगोळी काढणारी, तरण्याताठया लोकांना उगाच काका बनवणारी... हरवली आहे एक बिल्ली... स्वतःच स्वत:ला बावीस सप्तमांश म्हणवून
काव्यरस

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल.... तर थोडी माहिती. गीत- मुन्नी बदनाम हुई' चित्रपट - दबंग्ग संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला) हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात. मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया.
काव्यरस

दाणे पडले टप टप टप

लेखक विदेश यांनी शनिवार, 02/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दाणे पडले टप टप टप चिमण्या गोळा पट पट पट चिव चिव करता टिपती दाणे टिपता टिपता म्हणती गाणे या रे पिलांनो जवळी या आपण गाणे गाऊ या घरटे काडयांनी सजवू दाणे पोटापुरते जमवू हाव नको ती जास्तीची सवय करू या कष्टांची चोच दिली ज्या देवाने घास ठेवले समोर त्याने आभार त्याचे मानू या चिव चिव गाणे गाऊ या

ससा आणि कासव -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा शुभ्र कापूस जसा इवला पिटुकला होता ससा लाजरा बुजरा भित्रा जरा अवखळ चपळ होता ससा एकदा मळ्यातून फिरता फिरता गेला तो तळ्याकाठी तडक इवल्या पिटुकल्या सशाला दिसला मोठा एक खडक खुदकन ससा मनात हसला ऐटीत खडकावरती बसला थोड्या वेळाने झाली गम्मत सशाला वाटली जम्माडी जम्मत खडक लागला हलायला ससोबा लागले डुलायला अचानक घडले तरी काय सशाचे थरथरले की पाय सशाला वाटले झाला भूकंप त्याच्या अंगाला सुटला कंप पाहिले त्याने पायाखाली जीव झाला वर खाली नव्हता पायाखाली खडक होती कासवाची पाठ टणक कासवाने हलवली हळूच मुंडी ससोबाची उडाली घाबरगुंडी धूम ठोकली सशाने मळ्यात कासव निघाले निवांत तळ्यात
काव्यरस

हत्तीदादा हत्तीदादा -

लेखक विदेश यांनी शनिवार, 12/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हत्तीदादा हत्तीदादा कसला आहार घेतो रे ? अगडबंब शरीर बघून शत्रू गार होतो रे ! ससेभाऊ ससेभाऊ कुठला साबण वापरतो ? शुभ्र रेशमी अंगाला डाग एकही ना पडतो ! अस्वलकाका अस्वलकाका कोणते तेल लावतो रे केस नेहमी दाट काळे गुपित काय सांग बरे ? हरणा हरणा - थोडं थांब कसले बूट घालतो सांग ? उड्या मारत चपळाईने लांब लांब टाकतो ढांग ! माकड माकड - हूप हूप कुठली फळे खातो खूप ? फांदीवरच्या कसरतीने आम्हाला तू करतो चूप ! सिंहराज सिंहराज - कोणत्या चघळता गोळ्या ? त त प प करतो आम्ही ऐकून तुमच्या डरकाळ्या !

खारूताई, खारूताई !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
खारूताई, खारूताई! पळापळीची कित्ती घाई ! झुपकेदार शेपटीची- ऐट भारी हो तुमची ! बघुन टकमक इकडेतिकडे तुरु तुरु पळता कुणीकडे ? आज्जीची गोष्ट ऐकली आम्ही- रामाला मदत केली तुम्ही ! इवलीशी ताई, काम खूप मोठ्ठे- पाठीवर पाहू द्या ना रामाची बोटे !!