परीकथेची दोन सव्वा दोन वर्षे - भाग ८
९ एप्रिल २०१६
आजी आजोबांनी नातवंडांचे हात धरून अक्षरे गिरवायला शिकवायचा काळ केव्हाच ईतिहासजमा झालाय.
सध्या आमच्या रात्रशाळेत प्रौढशिक्षणाचे वर्ग भरतात.
ज्यात परी आजीआजोबांचे बोट पकडून त्यांना स्मार्टफोन वापरायला शिकवते :)
.
.
१७ एप्रिल २०१६
बाबड्या चुरूचुरू बोलायला लागलीय तशी कॉमेडी, आगाऊ आणि बरेच काही झालीय. प्रत्येक गोष्टीत आपले लॉजिक लावू लागलीय.
त्या दिवशी गार्डनमध्ये आम्ही पकडापकडी खेळत होतो. तिच्या हाताला सहजी लागणार नाही एवढा वेग ठेवून मी पळत होतो. मी पुढे पुढे, ती मागे मागे. थोड्याच वेळात ती समजली, की पप्पाला काही आपण पकडत नाही. तसे म्हणाली, "जास्त नको पळू. थोडे थोडे पळ.
मिसळपाव