Skip to main content

विरंगुळा

स्क्रिन शॉट भाग - ६

लेखक राजू यांनी सोमवार, 18/07/2016 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत..... विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे." हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना. विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे?

एक संघ मैदानातला - भाग १८

लेखक शि बि आय यांनी सोमवार, 18/07/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याने चालताना इतरांच्या चेहऱ्यावर ‘चला सेमी फायनलपर्यंत तर आलो’ असा भाव होता आणि आमच्या चेहऱ्यावर मात्र बळीला चालेल्या बोकडाचा ! चहा घ्यायला मेसमध्ये गेलो. चहा घेत असताना मुद्दामुन उसवलेल्या टी- शर्ट कडे रेश्माचं लक्ष गेलं. " अरे रेवा... तुझ किट उसवले आहे वाटतं... जा बाथरूममध्ये बदलून ये.. " आता हिला काय सांगू मला मुद्दाम ग्राउंडवर दुसऱ्या टी शर्टमध्ये बसायचं आहे म्हणून हा उद्योग मी करून ठेवला आहे ते.. " आं... अरे हो गं... जाऊ दे आत्ता नको ग्राउंडवर गेल्यावर बदलते आणि तिथेच बसून टाके घालून टाकते. " अगं.. कशाला अशी ग्राउंडवर येत आहेस बदल आधी.. " " नको ना.. जाऊ दे ना..

भूतकथा - कर्णपिशाच्च !

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 14/07/2016 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
कर्ण पिशाच्च बांदिवडे गावात रामाचे जुने मंदिर होते. मूर्ती अतिशय प्राचीन आणि सुंदर होत्या . गावातील बाबू मेस्त्री हा सुतारकाम करायचा . त्याची रामावर फार भक्ति होती. पण त्याला मटक्याचा देखील नाद होता . रोज सकाळी रामाचे दर्शन घेवून बाबू कामावर जायला निघे आणि मग रस्त्यात समोर येणार्याो मुलांना थांबवून खाऊ /चॉकलेट द्यायचा अन विचारायचा की तुमचा आवडता अंक सांगा ... मग मुले जो अंक सांगतील तो आकडा तो लांज्याला मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन लावायचा ... जर आकडा लागला ,तर स्वारी खुशीत असायची .... मग रात्री राम मंदिरात भजन काय अन गाव जेवण काय ? सगळी धूमधमाल असायची ....

एक संघ मैदानातला - भाग १७

लेखक शि बि आय यांनी सोमवार, 11/07/2016 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही रूमवर पोचलो तेव्हा दोन हरलेल्या संघानी बोजा-बिस्तर आवरला होता. त्यांना हैदराबादची कनेक्टेड टूर असल्यामुळे ते उद्या पहाटे निघणार होते. एकूण काय तर शाळेतली कावकाव जरा कमी होणार होती. रोज रुमवर आल्यावर झालेल्या जखमा साफ करणे हा एक मोठा प्रोग्राम असायचा. हात पाय स्वच्छ केल्यावर प्रत्येक जण आपापले मेडिकल किट समोर ठेऊन जखमांची रंग-रंगोटी करायचा. तळपायाची निघालेली सालटी, फुटलेले गुढघे, कोपरं, खरचटलेले हात-पाय आणि लागलेलले मुके मार ह्यावर प्रयोग करताना इतर मुलींच्या तोंडाची चक्की अखंड चालू होती. मी आणि रूपा मात्र उद्या काय करावं आणि कस करावं हा विचार करत होतो.

ती - ५

लेखक खटपट्या यांनी सोमवार, 11/07/2016 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती" - २ "ती" - ३ "ती - ४" "ती" - ५ रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा गाडी गावात पोचली होती आणि लोक खाली उतरुन आपापले सामान खाली उतरवण्याच्या मार्गाला लागले होते. नेहा दीसत नव्हती. अतुल अजून झोपलाच होता. झोपून माझा चेहरा भुतासारखा झाला होता.

ठहरने को बोला है

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 08/07/2016 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं. माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं.

एक संघ मैदानातला - भाग १६

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 05/07/2016 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूरला ८ ने मारून गटातून विजयी म्हणून बाहेर पडलो त्यामुळे जरा मस्त वाटत होत, पण त्याचबरोबर दीप्ती आणि दादा अजूनही येताना दिसत नव्हते म्हणून काळजी वाटत होती. सोलापूरला काढू शकू असा विश्वास असल्यामुळे दिप्तीला आज आराम द्यायचा असं आम्ही ठरवलं आणि चहा घेण्यासाठी म्हणून स्टेडियम मधून बाहेर आलो. काल घरी फोन लागला नव्हता म्हणून चहानंतर घरी फोन करायचा असं ठरवलं. चहा घेतानाच लांबून दादा आणि दीप्ती दिसले. तिच्या हाताला बँडेज वैगरे नव्हतं. अंकूने दोघांना चहासाठी टपरीवर आणलं. " वाचली रे पोरगी.. " " म्हणजे ? काय झालं ?" " अगं.. म्हणजे मोठी इंज्युरी नाहीये... मला वाटलं प्लास्टर वैगरे होतंय की काय...

एक संघ मैदानातला - भाग १५

लेखक शि बि आय यांनी शुक्रवार, 01/07/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.. --------------x--------------x---------- बाकीचे संघ हळूहळू येऊन बसत होते. स्पर्धेचा दुसरा दिवस असल्यामुळे सगळ्या टीम्स हजार होत्या. आमचा टाइमपास चालूच होता पण आम्हाला सगळ्यांना खर तर कोल्हापूर वि. वसई ह्या मॅचची उत्सुकता होती. सामने सुरू होत होते संपत होते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागत होते. एकूणच माहोल संथ ही नव्हता आणि फार धसमुसळाही नव्हता. जे जे जिथे जिथे हवं तसं तसं ते ते होतं... पण काही तरी मिसिंग होतं. आता शेवटची मॅच सुरू झाली होती. आम्ही वाट पाहत होतो ती ह्याच मॅचची...

परत स्मार्टफोन!

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 01/07/2016 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
(अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'माझा पहिला स्मार्टफोन' या लेखाचा दुसरा भाग) आधीच्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे http://www.misalpav.com/node/27462 कलीयुगातले हजार वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाच्या घड्याळातला एक सेकंद असतो असं म्हणतात. यासारखंच एक नवीन समीकरण आता रुजू झालंय. आपल्या आयुष्यातल्या एका वर्षात तंत्रज्ञान एका युगाने समोर जातंय. या अनुषंगाने मोबाईल क्रांती विषयी बोलायचे झाल्यास, फक्त सहा महिन्यापूर्वी घेतलेला लेटेस्ट स्मार्टफोन तुम्ही अश्मयुगात असल्याची ग्वाही देतो.

लॉजिक-जिम-लॉजिक

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 26/06/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
लॉजिक-जिम-लॉजिक प्रस्तावना : लेखाचं नाव वाचून फार अपेक्षा ठेवू नका , तुम्हालाही अशी नग मंडळी कुठेना कुठे दिसतील जमल्यास त्यांचं वर्णन इथे करू शकता , बरेच दिवसांनी बोर्डावर पदार्पण करतोय सांभाळून घ्या -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आम्रविकेत ४ वर्ष जीवाची अमेरिका करताना आरोग्या कडे अर्थात पूर्ण दुर्लक्ष झाले , कार ते कार्पेट प्रवास , चालणं कमीत कमी किंवा नाहिच पार्किंग लॉट सर्वात जवळ पार्किंग साठी कसरत , वीकांताला मजबूत पार्ट्या , बटाटा , चीज आणि अमेरिका जागतिक मेलटिंग प