गूढकथा - आग्या वेताळ
तो काळ होता सन 1960. महाराष्ट्रातले एक खेडेगाव- धामनेर! आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात. ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते?
एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे?
आता मी येथे एका झाडावर बसलो आहे. पोळ्यातला मध कुणी चोरत तर नाही ना यावर जातीने लक्ष देतोय...मी झाडावरच बसलेला असतो. कंटाळा आलाय या आयुष्याचा पण, मी काही करू शकत नाही.
या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!
माझे वडील धामनेर पासून जवळ तालुक्याच्या ठिकाणी शिंकपूर येथे प्राथमिक शिक्षक होते. नुकतीच तिथे त्यांची बदली झाली होती. आम्ही दोघे त्या वेळेस 14 वर्षांचे होतो.
मिसळपाव