अक्षय पावभाजी
ब्रेकफास्टला पावभाजी खाण्याची ही काही माझी पहिली वेळ नाही. आदल्या दिवशी घरात काही कार्यक्रम झाला आणि आलेल्या पाहूण्यांसाठी पावभाजीचा मेनु असेल तर पुढचे दोन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ राहिलेली पावभाजी संपवण्याचा अनुभव मला अगदी लहानपणापासूनचा आहे. फक्त माझी आई किंवा बायकोच नाही... तर इतरही काही माता-भगिनींच्या बाबतीत मी हे होताना पाहिलं आहे. एकदा केलेली पावभाजी केलेल्या दिवशी संपली अथवा कमी पडली हे माझ्या तरी ऐकीवात नाही.
ह्या भाजीबरोबर खायला आणलेले पाव संपतात... मग चौकोनी ब्रेडच्या स्लाईसवर ह्या भाजीला साथ देण्याची जबाबदारी येते..! तेही दम तोडतात...
मिसळपाव