अधांतर
सकाळची बाजारातील लगबग चालली होती.सर्वजण आपापल्या कामात मग्न होते. कृष्णाही इतर बायकांसोबत आपल्या कामाला लागला. आज सर्वजण दुस-या एका वाडीत जाणार होती, भिक्षा मागायला. कृष्णा आपला पदर सांभाळून उठतो,आणि लगबगीने आपल्या टोळक्याकडे पोहोचतो. सर्वजण मिळून नंतर दुस-या वाडीत भिक्षा मागायला जातात.
कृष्णा आपल्या गोड बोलण्याने त्या समाजात खूपच प्रिय होता, मात्र आपल्याला त्या समाजात यावे लागल्याचे दु:खही त्याच्या मनात सलत असायचे.कृष्णा सर्व लोकांच्या टिका सहन करुनही हे काम करत होता. संपूर्ण आयुष्य जणू त्याने या कामासाठी घालवायचे ठरविले होते.
मिसळपाव