Skip to main content

विरंगुळा

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 22/06/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!

पाऊस

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 21/06/2016 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
तसे पावसाळ्याचे वेध मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागलेले असतात. नैऋत्येहून निसटलेले चुकार काळे ढग इकडे लहानसं आकाश व्यापून टाकत असतात. बाजूंनी पांढरे, कापसांसारखे गुंतागुंतीचे, थराथरांचे आणि मध्यभागी काळसर असलेले ढग येथे दिसू लागलेले असतात. हे तसे दरवर्षीच सुरुवातीला दिसतात. मागाहून येणाऱ्या जलाने संपृक्त झालेल्या काळ्याभोर मेघांच्या लाटांची ते जणू वर्दी द्यायला आलेले दिसतात.

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 20/06/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
. वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय. संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली. पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे.

एक संघ मैदानातला - भाग १४

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 16/06/2016 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पत्ते खेळत चकाट्या पिटल्यामुळे सकाळी काही वेळेत जाग आली नाही. शेवटी दादांनी येउन उठवल्यावर आमचा सूर्योदय झाला. सकाळचा वाॅर्मअप करण्यासाठी आम्ही तयार होऊ लागलो पण संडास आणि बाथरूम इतर संघांनी अडवल्यामुळे आमची पंचाईत झाली होती. १५ मिनिट कानोसा घेत आत बाहेर केल्यावर आपली इथे डाळ शिजण कठीण आहे हे दिसलं. तोंड धुवून प्रत्येकीने पिशवीमध्ये आपापले अंघोळीनंतरचे कपडे कोंबले आणि आम्हाला दिलेली बादली आणि मग घेऊन आम्ही तशाच हाफ पॅन्ट आणि शूजमध्ये ग्राउंडच्या दिशेने सुटलो. सकाळी सकाळी वाॅर्मअप करायचं सोडून हि सगळी फौज बादली आणि पिशव्या घेऊन कुठे चालली हे बघायला दादा आमच्या मागे पळत आले.

बोट - शिक्षण

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 16/06/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला।' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का?’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही. तसंच एक एक मार्कासाठी डोचकं पिकवलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की अकरावी एस् एस् सी नंतर असा एक चार वर्षांचा कोर्स आहे ज्याला फी नाही, ज्यात प्रवेशासाठी मार्कांची अट नाही, पुस्तकं बेताचीच आणि समजायला बर्यापैकी सोपी, चार वर्षांच्या संपूर्ण कोर्सभर एकही परीक्षा नाही, कारण शिक्षकच नाहीत! वर दर महिन्याला ऐंशी रुपये पॉकेट मनी मिळेल - तर तो लक्षच देणार नाही. देऊन तरी काय उपयोग?

ड्रॅगन....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 12/06/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, ही गोष्ट चीनमधील किअांग्सू प्रांतातल्या हुआई गावच्या वू चेंगने लिहिली. त्याचा काळ कुठला होता हे ठामपणे सांगता येत नाही, पण साधारणत: १५०५ ते १५८० दरम्यान हा होऊन गेला असावा. तो त्या काळातील एक बर्‍यापैकी प्रसिध्द कवी आणि लेखक होता. मींग राजदरबाराच्या बखरीत त्याचा आणि त्याच्या काही काव्यांचा उल्लेख सापडतो. या महाकाव्याचा किंवा महाकादंबरीचा विषय ह्युएन्संगाची भारतातील यात्रा हा आहे. ही व्यक्ती अर्थातच काल्पनिक नसून खरी आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून इतिहासात प्रसिध्दी पावलेला प्रवासी हयुएन्संगच आहे. तो ७ व्या शतकात होऊन गेला.

घर क्रमांक – १३/८ भाग - ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/06/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
घर क्रमांक – १३/८ भाग - १ घर क्रमांक – १३/८ भाग - २ घर क्रमांक - १३/८ भाग - ३ घर क्रमांक – १३/८ भाग - ४ ..... त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की मी भेटल्यानंतर ते एकदा त्या घराला भेट देऊन आले होते व तेथे त्यांना ती दोन पत्रे सापडली. त्यांनी ती वाचली देखील. ती वाचल्यानंतर त्यांनी त्या बाईबद्दल थोडीफार सावध चौकशीही केली.

बेधुंद (भाग १३)

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 11/06/2016 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या अन हर्षलाची मन्न बाकीच्या नजरेत नाही , पण एकत्र झाली होती . अक्षा अन शिवेका एकमेकांकडे बघत असत पण काहीही बोलत नसत ! त्यात अक्षाला समजले की शिवेका विद्यापीठ सोडून जात आहे , चौथी सेमिस्टर आता संपत आली होती ! चौथी सेमिस्टर चोरून एकमेकांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या करण्यात गेली . हर्षला 'फ़ाइव्ह स्टार्स' मध्ये आली आहे हे फक्त हर्षला अन फ़ाइव्ह स्टार्सलाच माहित होत . परीक्षा संपली होती . शिवेकाने तिसऱ्या वर्षापासून दुसऱ्या विद्यापीठात जायचा निर्णय घेतला होता , कदाचित 'प्रेम अन मजबुरी' अशी दोरीवरची कसरत तिला झेपत नव्हती !

बेधुंद (भाग १२)

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 11/06/2016 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षलाच्या वेडेपणात नित्याची तिसरी सेमिस्टर कशीबशी सरली . त्यातच ज्याने नित्यासाठी हर्षला चा बायो डाटा आणला होता तो निलेश अन हर्षला चांगले मित्र झाले होते . देखणा निलेश सगळ्यातच पुढे होता , अभ्यास , खेळ अन त्याच व्यक्तिमत्व अन त्याची 'हेअर स्टाईल ' कोणत्याही मुलीला आकर्षित करायला पुरेशी होती . त्याची उंची जरा नितेश पेक्षा कमी होती पण हर्षला पेक्षा थोडी जास्त होती . नित्या निलेशला काही बोलत नव्हता अन बोलणार तरी कसं ? एखाद्या पोरीला माझ्यावरच प्रेम कर अस कोण सांगू शकेल ?

बेधुंद (भाग ११)

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 11/06/2016 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
(बऱ्याच दिवसाने वेळ मिळाल्याने सलग तीन भाग टाकतोय …! कदाचित तारा उडण्याची शक्यता आहे ! ) नित्याचे दिवस हर्षलाची स्वप्न बघत सरत होते , नित्या अजूनच हर्षलासाठी वेडा झाला होता ! कधीकधी एकटाच बाल्कनीत बसून शून्यात बघत असे ! भांडखोर , मस्तीखोर नित्या शांत शांत वागायला लागला होता , कधीकधी तो तिला बघण्यासाठी 'लायब्ररीत' ही जाऊ लागला . काय असत हे प्रेम ? अजून एकदाही तो हर्षलाला बोलला नव्हता पण तरीही त्याला ती आपली वाटू लागली होती . 'विषय' हर्षलाचा अवघड असल्याने कुणी तिच्यावरून त्याला साधं 'चिडवायाची' पण हिम्मत करत नसत !