Skip to main content

विरंगुळा

वड्याचं तेल

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 23/05/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’ ‘नाही साहेब,...’ ‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’ ‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’ ‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’ ‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’ ‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’ ‘....’ ‘भ**हो, जरा लाज बाळगा. कंपनी पगार देते लाख लाख रुपये ते कुणाच्या **त घालायला ? पगाराचं जाउदे एक, निदान कंपनीच्या कृपेनं खाल्ल्या पैशाला तरी जागा ? **खाली गाडी दिलीय ना कंपनीनं ? फिरा लेको जरा फिल्डवर आणि पयशे आणा !

एक लग्नसमारंभ . . . . . जो खरं तर झालाच नाही

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 20/05/2016 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत. साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता. माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते.

अधांतर -2

लेखक समीर१२३४५६ यांनी शुक्रवार, 20/05/2016 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
- परंतू नियतीच्‍या मनात मात्र एक वेगळाच डाव ठरलेला होता अलकाचे लग्‍न जुळत नव्‍हते, तिच्‍या वडिलांनी ब-याच ठिकाणी बोलणी करुन पाहिली होती, परंतू सगळीकडे नकारघंटाच ऐकू येत होती. अलकाचे दिसणे वागणे खूपच चांगले होते, परंतू का कोणास ठाऊक सर्व लोक कृष्‍णाला खूृृप घाबरत असायचे. कृष्‍णााला मात्र या गोष्‍टीचा थांगपत्‍ता नव्‍हता, तो आपल्‍या बहिणीसाठी वणवण फिरत असायचा.

एवढीशी गोष्ट

लेखक abhajoshi14 यांनी शुक्रवार, 20/05/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज शेजारच्या घरातून सकाळी सकाळी जोर जोरात भांडी वाजल्याचा आवाज आला. आमच्या शेजारी एक सुखवस्तू आणि गोड कुटुंब रहाते. सासू मुलगा सून आणि त्यांची दोन लहान मुले. एकूण च एक मेकांना धरून आणि सांभाळून असतात. म्हणून च मला जर आश्चर्य वाटले. आमची ही आणि ती सून दोघी एकाच ऑफिस मध्ये आहेत - साहजिकच मला संध्याकाळी सगळा रिपोर्ट मिळाला. सुनेची बाजू - "अहो मी अक्खे घर ह्यांच्या ताब्यात दिले आहे. एकही गोष्टी मध्ये मी लुडबुड करत नाही कि हक्क गाजवत नाही. रोजची भाजी काय करायची हे देखील त्याच ठरवतात. त्यांची मदत तर मला खूप च होते आणि मी ते प्रत्येक वेळेस सर्वांना सांगत असतेच अभिमानाने.

राँग नंबर

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 19/05/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे! मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो! सगळा ग्रुप जमला होता. मग खूप धमाल केली होती. अशाच एका क्षणी हसता हसता त्याने अचानक तिला I love you म्हटलं होतं. त्याचं सगळंच धक्कादायक आणि अनपेक्षित. कधी काय करेल याचा नेम नाही. हीच spontaneity तिला भावली होती. आणि ती काय लाजली होती!

एक संघ मैदानातला - भाग ९

लेखक शि बि आय यांनी बुधवार, 18/05/2016 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ग्राउंडवर सगळेच जोशात होते. उद्या निघायचं म्हणून आज काही जास्त प्रँक्टिस नव्हती आणि मुख्य म्हणजे आज फायनल ७ ची कव्हर कळणार होती. आप्पा म्हणाल्या प्रमाणे ते काही टूरला येऊ शकत नव्हते त्यामुळे बर्याचश्या गोष्टी आजच ठरणार होत्या. १७ मुलींमधून टूरला जाणाऱ्या १२ जणी...... त्यातून सर्वप्रथम मैदानात उतरणाऱ्या ७ जणी कोण ? वाँर्मअप झाला थोडी स्किल प्रँक्टिस झाली, आळीपाळीने सगळ्यांची कव्हर फिरवून झाली. खंर तर आम्ही वाट बघत होतो की आप्पा आत्ता सगळ्यांना बोलावतील आणि टूरची टीम सांगून पुढचा प्लान सांगतील. पण कसलं काय आणि कसलं काय?

राजाराम सीताराम एक ----------------भाग १७ - मुंबईचा मित्र

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 17/05/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

सैराट २ - सैरभैराट

लेखक प्रशु यांनी मंगळवार, 17/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथ आकाशला मराठी अम्मा लहानाचं मोठं करते. डोशाच्या गाडीवर कांदा कापत कापत आकाश बेगमपेठला शिकतो. (इथं अजयच्या आर्त सूरात एक दीनवाणं गाणं, मात्र ठेका तोच) Software Consultant बनून US ला onsite जातो. इकडे अम्माची झोपडपट्टी redevelop होते पण सुनेने हाकलल्या मुळे अम्मा वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजतेय. तिला भेटायला आकाश हैद्राबादला येतो. तीची अंतीम ईच्छा म्हणून तीच्या अस्थी तीच्या मूळ गावच्या विहीरीत विसर्जन करायला तो करमाळ्याला येतो. आणी बघतो तर काय? विहिर चक्क कोरडीठक्क पडलीय. वारेमाप ऊस पिकवल्यामुळे सगळ्या जिल्ह्यातच पाण्याची बोंब आहे. अखेर गावात पाणीची जलराणी दाखल होते. पाणी भरायला हि...

... काय म्हणतील!

लेखक रातराणी यांनी शनिवार, 14/05/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

सैराट - अफाट स्टोरी टेलींग

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 14/05/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा! प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून.