Skip to main content

विरंगुळा

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 24/11/2016 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 24/11/2016 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
गाभा: माझ्या एका मित्राला तू महाराष्ट्राच्या राजकारणात का जात नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the maraathaa , by the maraathaa, for the maraathaa" आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक आमदार मराठा आहेत . २) मंत्रीमंडळात मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , पुणे किंवा पार्ले येथील भाषा क्वचित असते . फडणवीसांसारख्या ब्राह्मण नेत्याला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ?

संभ्रम-ध्वनी (कथा)

लेखक चॅट्सवूड यांनी मंगळवार, 22/11/2016 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती. कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वरच बोलणे झाले, पण तिसऱ्याच दिवशी कार्तिक ने ताराला कॉफीसाठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, तिची ग्रॅजुयेशन झाल्यावरची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे, म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली. कार्तिक त्याच शहरातला, आई वडीलांन बरोबर राहणारा.

गोष्ट एका लग्नाची ... भाग - ३

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 18/11/2016 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ... भाग २ गोष्ट एका लग्नाची ... लहानपणी बा च्या पाठडावर बसून घोडा घोडा खेळणं येगळं , न प्रत्येक्षात जित्या जागत्या घोड्यावर बसणं येगळं. नाय नाय बॉ आपल्याला काय झेपणार नव्हतं काही झालं तरी मूक जनावर ते इतक्या गोंधळात बिथरल म्हंजी झाला का खेळ ?

बोट - आयजीच्या जिवावर बायजी उदार

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 17/11/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते. मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं. तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली. घरापासून दूर राहाणार्या कित्येक लोकांमध्ये एक गैरसमज असतो.

गोष्ट एका लग्नाची ...भाग -२

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 15/11/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ..... गोष्ट एका लग्नाची ... भाग - २ बस्ता न खस्ता... लगीन घर म्हनजी आठवडेबाजार पेक्षा कमी नसतंय ,कोण काय बोलतय काय सांगतय कैच ताळमेळ नसतोय काम करणारे ४-५ न उंटावरून शेळ्या हाकणारे बाकी समदे :) सकाळी सकाळी २ जीभडे दारासमूर येऊन उभे राहिले आज बस्ता मह्यावाला :) रातीपासून बाया- बापड्यांची कलकल ऐकून माझं डोकं ठणाणा वाजत होत."निस्ता पसारा करून ठेवलाय घरभर , बबन्या ,अरे गोधड्यांच्या वळकुट्या कर की पाहत काय बसलाय , न तुमी दोघी जरा कौशीला मदत करा का निस्त्या हिंडताल इथून तिथं न तिथून हिथं!

पाश्शेहजाराच्या गोष्टी: २. नोट

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 15/11/2016 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी तशी थंडी अजून जोरदार पडत नसली तरी नोव्हेबरमध्ये सकाळी सहाची वेळ म्हणजे थंडीची वेळ. नाशिककडं जाणा-या एसटी बसमधले प्रवासी खिडक्या बंद करून बसले होते आणि बरेचसे झोपेत होते. सोमवार सकाळची बस म्हणजे दोन दिवस पुण्यात येऊन परत जाणारे कॉलेजचे विद्यार्थी, काही बँकवाले आणि कंपनीत काम करणारे काही नोकरदार लोक, काही सरकारी कर्मचारी. त्यांच्या बसायच्या जागाही ठरलेल्या. बसचे चालक-वाहक ठरलेले त्यामुळे तसे सगळे चेह-याने एकमेकांना ओळखतात, काही नावानिशीही ओळखतात हे “ते आले बघा पाटील साहेब, चल आता” असं वाहक चालकाला म्हणाला त्यावरून लक्षात आलं.

पाश्शेहजाराच्या गोष्टी: १. बचत गट

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 11/11/2016 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
“आज रामा कशापायी आलाय तुझ्यासंगं गटाच्या मीटिंगला? आपलं ठरलंय न्हवं पुरूषमाणसांना नाय येऊ द्यायचं म्हणून?” बचत गटाची अध्यक्ष असलेल्या कांताने जरा जोरातच विचारलं. “राम राम अध्यक्षीणबाई. दादांनी सांगितलं हिकडं यायला म्हणून आलो बगा. आता तुमी नगं म्हणत असालसा तर जातो की लगेच माघारी. आपलं काय काम नाय बा, दादांचं हाये,” रामा बेरकीपणानं म्हणाला. दादा म्हणजे प्रस्थ. केवळ गावातलं नाही तर पंचक्रोशीतलं. गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या आण्णांच्या रोजच्या बैठकीतले. दादांच्या सल्लामसलतीविना आण्णांचं पान हलत नाही म्हणे.

मी आज केलेला आराम...!!

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 10/11/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज केलेला आराम नमस्कार, गेली अनेक वर्षे मी जमेल तसे बिछान्यात लोळत आहे आणि लोळत असताना मिसळपाववरचे लेख वाचत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचता वाचता किंवा आपल्या जोडीदाराच्या संगतीने अनेक लोकांना बिछाना गाठावासा वाटतो आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक मस्तपणे आणि नियमीतपणे आराम करतात.

गेम (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 09/11/2016 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता. चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!" पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले.