Skip to main content

विरंगुळा

नोटबंदीचा एक दिवस !!

लेखक चिनार यांनी सोमवार, 20/02/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या जेवणाआधी युवराज काहीतरी सटरफटर खात सोफयावर पसरले होते. तेवढ्यात त्यांच्या व्हाट्स ऍप्पवर काहीतरी मॅसेज आला. सोफ्यावरूनच हात लांब करून युवराजांनी समोरच्या टीपॉयवरचा मोबाईल घेतला. त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आलेला मॅसेज त्यांनी वाचला. "रात्री ८ वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करणार." ते वाचल्यावर युवराजाच्या कपाळावर आठ्या पडल्या. ते मनात म्हणाले, "तेच्यायला..आता परत हा काहीतरी बोलणार. आणि मला त्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यावी लागणार. दिवसभरात का बोलत नाही हा माणूस? ही कोणती वेळ आहे भाषणं ठोकायची?" मॅसेजकडे दुर्लक्ष करून युवराज सरळ जेवायला गेले.

इक बंगला मेरा न्यारा--२

लेखक तिमा यांनी सोमवार, 20/02/2017 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्रः- त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली. मी चुटकी वाजवली, हां, म्हणजे हा मुलगा 'श्यामलन' चे सिनेमे नक्की पहात असणार तर! अब आयेगा मझा!!! दोन दिवस नुसतेच गेले. तिसर्‍या दिवशी सकाळी मुंबईहून मुलगा आला. काम सोडून यावे लागल्यामुळे थोडासा त्रासलेला वाटला. कोचावर स्थानापन्न झाल्यावर घरातल्या कुटुंबप्रमुखाने विषयाला हात घातला. "तुम्हाला तसदी दिल्याबद्दल सॉरी, पण इथे हिला आणि माझ्या मुलाला जरा वेगळे अनुभव येत आहेत." "काय झालं ?" मुलाने विचारलं. " माझ्या मुलाला वरच्या खोलीत एक आजोबा दिसले, असं तो म्हणतो. पण आम्हाला काहीच दिसलं नाही." त्यामुळे, ही जरा अस्वस्थ झालीये.

परग्रह जरूर जैयो ...! (बट व्हाय ?)

लेखक लीना कनाटा यांनी सोमवार, 20/02/2017 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
बर्यााच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा तांबड्या लोकांचे तांबडे प्रश्न (अॅज इन मंगळवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं मंगळा वर जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, मंगळाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण मंगळ ओरियंटेड वगैरे नाही. एनटी (न्यूरो टेक्नॉलॉजि) मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही मंगळा वर पोहचलो. पासप्लॅनेट वर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही.

इक बंगला मेरा न्यारा.

लेखक तिमा यांनी शनिवार, 18/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आम्ही या बंगल्यात अनेक वर्षं राहिलो आहोत. माझ्या वडिलांनी हौसेने चांगला प्रशस्त बंगला बांधला. तेंव्हापासून इथे रहाण्याची इतकी संवय लागली होती की चार दिवस कुठे गांवाला गेलो तरी आईला मी, परत कधी जायचं, असं सारखं विचारुन भंडावून सोडत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाहेरगांवच्या कित्येक चांगल्या ऑफर्स मी नाकारल्या आणि आमच्या गांवातच नोकरी पत्करली. पगार थोडा कमी मिळायचा, पण मला ही जागा सोडायची नव्हती. आयुष्य तसं संथगतीने पण खाऊन्-पिऊन सुखी गेले. मुलं मोठी झाली, थोरला अमेरिकेला गेला आणि धाकटा मुंबईला गेला. थोड्याच दिवसांत त्याने मुंबईतल्या धंद्यात जम बसवला. मोठा फ्लॅट घेतला.

Brevet des Randonneurs Mondiaux 300

लेखक देशपांडेमामा यांनी गुरुवार, 09/02/2017 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक थोडे विचित्र आहे कारण १) हे फ्रेंच भाषेतले आहे आणि २) हा प्रकार जो पर्यंत सायकलींगची आवड लागत नाही तोपर्यंत काही कळत नाही :-) BRM च्या अधिक माहीतीकरता मोदकभाऊंच्या ह्या धाग्याला भेट द्या डिसेंबर २०१६ मध्ये २०० ची BRM म्हणजेच long distance cycling चा २०० किमी चा प्रकार पुर्ण केला होता. त्यानंतर काही ना काही कारणाने पुढचा ३०० चा प्रकार करता आला नाही. पण फेब्रुवारी २०१७ चा करायचाच असे ठरवले कारण पुढला थेट जुन मध्ये होता/आहे. नोंदणी वगरे सगळे सोपस्कार करुन तयारीला लागलो आणि नेमक तेव्हा काम वाढलं !

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५१

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 02/02/2017 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः- वर्षभरापेक्षा जास्त कालावधी नंतर आज ह्या लेखमालेच्या पुढच्या भागाच्या लेखनाचा मुहुर्त लागला आहे . त्यामुळे अगदी नवीन वाचणार्‍यांना सगळे संदर्भ लागतीलच असे नाही.यासाठी क्षमस्व.परंतू सदर भागापासून या लेखमालेनीही मनातल्या मनात थोडा सांधेबदल केलेला आहे.त्यामुळे हे लेखन मागील संदर्भांशिवायंही सर्ववाचकांना आवडेल अशी आशा धरून पुनः एकवार सुरवात करतो आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.

(मी सध्या काय करते?)

लेखक रुपी यांनी शुक्रवार, 27/01/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थातच. आमचा एक क्षीण प्रयत्न! म्हटलं तर विडंबन, म्हटलं तर दुसरी बाजू... मी सध्या काय करते? नुकत्याच आलेल्या "ती सध्या काय करते?" या चित्रपटामुळे अश्या अनेक "तीं"वरचे जोक आंतरजालावर धुमाकूळ घालत आहेत. 'तेव्हाच अमके केले असते तर आज हा प्रश्न पडलाच नसता' अशा आशयाचे कित्येक फॉरवर्ड्स कित्येकांना 'ती'च्या आठवणी व्याकूळ करुन सोडत असतील! एवढ्या सगळ्या आठवणींत माझी आठवण आमच्या गल्लीतही कुणालाच येणार नाही, हे मी आधीच कळून चुकले. कारण खरं तर आमचं घर कुठल्या गल्लीत नव्हतंच.