गोष्ट एका लग्नाची ...

Primary tabs

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
9 Nov 2016 - 12:02 pm

गोष्ट एका लग्नाची ...
निंबाच्या सावलीत म्हातारबा म्हंजी माझं आजोबा , गावातल १-२ भावकीतील पांढरे टकुरे मी सोत्ता न माझा एक मित्र अशे आम्ही ४-५ जण यष्टीची वाट पाहत थांबलो होतो ,आता का बर? असा प्रश्न पडलंच तुम्हाला. तर म्याच सांगतो पैलेच, तर तर .. आम्ही चाल्लो होतो पोरगी पहायला !!!! माझ्याचसाठी :)
त्यात आमच्या गावातल्या यष्टीचा कारभार बेभरवशी, आली तर आली नई तर नई.
माझा तर डोळाच नई लागला रातभर जेव्हा आज्यानी सांगितलं , " पम्या उद्या आपल्याला पोरगी पाह्याला जायची बरं का तुह्यासाठी" ऐकून मला आधी भ्यावच वाटलं होत. आजवरचा मह्यावाला इतिहास बघता पोरींचं न माझं काय इशेष जमत नव्हतं. काय ते ४ बुक शिकलो. पण शाळेत असताना इमीवरून माझ्या आज्यांन मला असा काय पिसला होता ना ….तवापासून मला भ्याच वाटायचं पोरींशी बोलायला , बर इमीच न माझं काय लफडं बी नव्हतं. दुसर्याची चिठी पोचवायला गेलंतू .....धरला मास्तरनी ...नय म्हणलं तरी पोरीत तीच जरा बरी होती दिसाय ;) मंग असा कारभार चालायचा पोरांचा .. त्ये म्हन्तेत ना " एक मासा न खंडीभर रस्सा " .......!!!!!जाऊंद्या जुन्या गोष्टी काह्याला काढयाच्या आता ?
पोरगी पाह्याची मला, पण नट्टून ठठुन आलाय माझा दोस्त बाळ्या ! नाय म्हणल तरी मला जरा रागच आलाय दोस्तानी कस नवरदेवापेक्षा कमी नीट दिसाया हव मला सोडून ह्योच पसंत पडला मंग? जाऊंद्या असं अभद्र नय आणू मनात.
आली....... आली. एकदाची फुफाट्यात रस्ता शोधात यष्टी फाट्यावरून आत वळली तशे समदे पोजिशन घेऊन उभे राहिले. इतक्या वाढुळ बाळ्यांनी बोलू बोलू माह्या डोक्याची कलही केली पार " कशी असणं रे पोरगी ? मंग हाय ह्या वर्षी तुहे लाडू ? आन लग्नात ना सफारी सूट घ्यायचा बर का? चकाचक सूटबूट, एकदम गोईंदा दिसशील ;) पोराच्या तोंडात तीळ भिजणं तर शपथ.
यष्टी आधीच कच्चुन भरलेली ,कावलेला ड्रॉयव्हर न अर्धामेला झालेला कंडाक्तर , असा थांबा सोडून फर्लांगभर म्होरं यष्टी थांबवली , तशे सगळे माग पिसाळ कुत्र लागल्यागत जे पळत सुटलेत .म्या बाळ्याला म्हणल तू हो पुढं न जागा धर कारण माझा आजा हातात काठी घेऊन दुडकत दुडकत चाल्ला होता त्याच्या म्होरं म्या असा पळत सुटलो असतो तर बर दिसलं असत का ते? म्हणला असत " पघा.. पघा... किती घाई झाली पम्याला "
हा तर यष्टी थांबली , पण आमच्या गावच अडाणी पब्लिक कुणाला उतरू बी द्यायना धड , निस्ती यष्टीत घुसायची घाई ,बाहेर निघत व्हते त्यांना कोंबू कोंबू आत घातलंय परत ... आतलेआत न बाहेरचे बी आतच! कंडाक्तरच्या नरड्याच्या शिरा वरडुन वरडुन फाटाया आल्या असतींन कशेबशे ५-६ टाळके गर्दीत पीसु पिसू बाहेर पडले न कंडाक्तर नी बेल मारली तसा मह्या काळजाचा ठोकाच चुकला आमच म्हातार न मी अजून पोचलो बी नव्हतो तर यष्टी चालू झाली मला ना अस्सा राग आला कंडाक्तर चा..... थोडं पुढं जाऊन यष्टी स्लोव झाली न जीवात जीव आला कसबस म्हातार्याला पायरीवर चढवलं तस कंडाक्तर ठणाणा बोंबलयला लागल. म्हातार चढतय आपलं काठीवर जोर देऊ देऊ मला पैलेछुट कळनाच ह्ये का बोंबलतय अस? खाली पायल तर म्हाताऱ्याची काठी कंडाक्तरच्या पायावर न गडी चढतय जोर लावू लावू काय ही तर्हा ? कंडाक्तरचा चेहरा असा लालजरत झालेला, म्हणलं आता होतीय शिंगाशिंगी पण राहिल, त्येला बहुतेक अशी रोच्ची सवयच झाली असंन.
ही मरणाची गर्दी न त्यात उन्हाचा कहार, निस्त्या घामाच्या धारा,मी जरा पुढं होऊन ५ फुल्ल पिंपळगाव म्हणलं.सगळे कूट कूट अर्धे मुर्धे उभे राहिले. मी आज शर्टींग केली होती ती ह्या गोंधळात कुठून कुठून बाहेर आली व्हती ,इस्कट्लेले केस ,अभद्र अवतार! त्यात माझा आजा ! आता गपचिप उभा राह्यचं ना तर हाश-हूश करत लागला फेट्याच्या हातभर कोसा गोलगोल फिरवायला गरम झालं म्हणी , अर्रर्रर्रर्रर्र.... २-३ सपकारे माझ्याच डोळ्यावं बसले .ते हातातलं भुईचक्र कोणाच्या नाकात ,डोळ्यात चाललय बाबाला काही घेणंदेणं नई .. न कंडाक्तर तर जवळच नाय फिरकला आज्याच्या .
त्ये लहान पोराला नैका पाय फुटल्यावर ते कस चालत ना ? आपलं दुडू -दुडू मधीच पडलं, मधीच उठण,पण चालनच्च. तशीच यष्टी बी चाल्ली हुती निवांत ,ह्या जल्मी तरी पोचू कि नय शन्काच हुती मला .
कस बस रडत धडपडत कंडाक्तर नी बेल मारली " चला चला पिंपळगाव, पिंपळगाव आलं एकदाच , बाहेरची गर्दी बघून परत एक घामाची धार घसारली गालाव्रुन.
झाल... त्या दिवशी कळलं, निस्त आमच्या गावाचं न्हाई तर इथून तिथून सगळंच पब्लिक येडंच असतय पुन्हा त्येच रामायण ! माझा आजा पुढं मी माग कुणी उतरूच द्यायना जगातील शेवटची यष्टीच जणू ! बाहेर निघायचं तर कुणाच्या तरी बासनात तंगड अडकलं माझं , झालं मरणाचं हाल सोडवता सोडवता तवर म्हाताऱ्यानी मोर्चा सांभाळला काठी उगारून " थांबा.. थांबा.. हाय तिथं.. पैल ऊतरणारे उतरून द्या नीट मंग चढा " तरी एक गडी म्हातार्याला ओव्हरटेक करून उतरायच्या बेतात ढासाढुशी कराया लागला म्हातार्यांन रापकन एक काठी बसवली त्याच्या बुडावर मग बाकीचे पण जरा बिचकलेच मग समद यवस्थित पार पडलं ! हूश्श् .........
***************************

अशी ऐसपैस पडवी. जीव गार गार झाला सावलीत , पाठी माग गोठा दावणीला ४-५ जनावर , शेणकुराचा वास दोन साईडला दोन मोठाल्या सतरंज्या अंथरल्या हुत्या गार पाण्याचा तांब्या घशात रिचवल्यावर जरा जीवात जीव आला
आजा न भावकीतले पुढं न मी न बाळ्या चाळचूळ करत माग बसलेलो , नमस्कार चिमित्कार झाले ,वळख- पाळख नातं-गोत , फलांन - बस्तान, अंमक - ढमक मला अज्याबात इंट्रेष्ट नसतो असल्या गोष्टीत ..
चा आला एक घोट घेतला तर तोंडातल्या तोंडात फिरायला लागला इतका ग्वाड, अक्खा डबा रिचिवला जणू ! बाकीचे भुर्के मारीत चा पित होते पुचाट भुळभुळीत चा कुणी पित नसतेत गावाकडं.
खेडे गावात ना एक पद्धत असती पाहूने म्हणलं का जेवण खावंन आलच. तर आधी पोरगी पाह्याची का जेवण उरकून घ्यायच? पोरीकडंच एक म्हातारा टकूर बोललं. यष्टीच्या नादात सकाळची न्याहारी हुकली होती , न आता पॉट पार खपाटीला आलं होत भुकेन. पण माझा आजा म्हणला पैले पोरगीच बघू.मग होत राहील जेवण निवांत ,मला आताशा का कायानु जरा घाम फुटायला लागला पोरग असलं म्हणून काय झालं भीती तर वाटतीच ना राव ?
समोरच्यानी आवाज दिला ऐकलं का जरा " सुमी ला पाठवा बाह्यर , पावन तुम्ही पण जरा असे समोर येऊन बसा झालं.... सुमी आली बाहेर पण म्या वर पाहिलं नाही पण तिने लावलेल्या गजर्याच्या वास अहाहा ....
तिला समोर बशिवल , पाच दहा मिंट सगळे चिडीचिप मंग आजाच जरा घसा खाकरून बोलता झाला " बर सुमन काय काय येत पोरी तुला ? सुमन चिमणीसारखी चिव चिव चिव बोलली कायतरी माझया कानात काहीच शिरलं नाही .
होत नव्हतं तेवढं अवसान गिळून एकदाच मुंडी वर करून अवजडताच पाहिली सुमी. पण परतपरत पहात राहावं अशीच होती साजरी. दोन्ही खांद्यावर पदर, उंच मान ,तांबूस गव्हाळ रंग,तेज दार नाक. नजर खाली होती तिची. पण आजा पुढ्यातच बसला होता म्ह्नुन परत मुंडी खाली केली ती केलीच. बास आता मला काही काही ऐकू येत नव्हतं दिसत होता फक्त सुमीचा गॉड चेहरा ,बाळ्यांनी २-४ दा ढुसणी दिली तेव्हा भानावर आलू.
जेवण-खावंन सगळं झाली.गाव गावाच्या बाता,पाऊस पाणी , माझं तर कशातच ध्यान नाय लागलं नंतर. आता का ? ह्यो काय प्रश्न झाला ?गावरान कोंबडीच मटन. सगळ्यांनी चापूचापू हानलय आज्यानी पण !बाळ्याचं तर इचारूच नका "खायला बोकडा न दिसायला सुकडा" हाय बेण !
आता परतायच्या यष्टीत नाक दाबू दाबू लोकांचे काय हाल हुतींन माझ्या आज्यांमुळं ह्या इचाराणचं मला खुद्कन हसू आलं :)

क्रमश :

आस्वादहे ठिकाण

प्रतिक्रिया

नाखु's picture

9 Nov 2016 - 12:14 pm | नाखु

भारी, येऊ द्या पुढचा भाग..

खेडूत's picture

9 Nov 2016 - 12:20 pm | खेडूत

मस्त कथा- सुरूवात आवडली.
पुभाप्र!

स्नेहांकिता's picture

9 Nov 2016 - 12:25 pm | स्नेहांकिता

पिवशी फॉर्मात !
येऊंद्या अजून .

खी खी खी! येकच लंबर बरं का! येवंद्या फुडला भाग.

स्मिता चौगुले's picture

9 Nov 2016 - 1:31 pm | स्मिता चौगुले

लै भारी गं पिवशे.. लवकर लवकर पुढचे भाग टाक.

हा हा!मस्त वर्णन!पियुडे छान सुरवात!

प्राची१२३'s picture

9 Nov 2016 - 2:07 pm | प्राची१२३

मस्तच !! आवडली. पुढचा भाग लवकर टाका.

टवाळ कार्टा's picture

9 Nov 2016 - 2:15 pm | टवाळ कार्टा

खी खी खी

पद्मावति's picture

9 Nov 2016 - 2:22 pm | पद्मावति

=)) वाह वाह मस्तच!!!

नूतन सावंत's picture

9 Nov 2016 - 2:34 pm | नूतन सावंत

छान सुरुवात,पुभाप्र.

पाटीलभाऊ's picture

9 Nov 2016 - 2:40 pm | पाटीलभाऊ

लवकर येऊ द्या पुढचा भाग.

अद्द्या's picture

9 Nov 2016 - 2:54 pm | अद्द्या

हाहाहाहा

भारीय सुरुवात .

येउद्या पुढचं लवकर

विचित्रा's picture

9 Nov 2016 - 3:36 pm | विचित्रा

पुभाप्र

सुचेता's picture

9 Nov 2016 - 3:40 pm | सुचेता

मस्त लिहलेयस ग, ग्रामीण लेहजा सुरेख

संजय पाटिल's picture

9 Nov 2016 - 5:36 pm | संजय पाटिल

लवकर टाका पुढचा भाग....

प्राची अश्विनी's picture

9 Nov 2016 - 5:37 pm | प्राची अश्विनी

खुसखुशीत झालीय.
लवकर पुढचा भाग येऊदे.

किसन शिंदे's picture

9 Nov 2016 - 5:43 pm | किसन शिंदे

भारी सुर्वात केल्येय बग गोष्टीची. आता पुढं व्हकार नकार काय आला आसंन कि नसंन ते बईजवार येऊंदे बर पिवशे

पैसा's picture

9 Nov 2016 - 5:51 pm | पैसा

मस्त खुसखुशीत!

ज्योति अलवनि's picture

9 Nov 2016 - 7:02 pm | ज्योति अलवनि

झक्कास! एक विनंती, आता पुढचा भाग लवकर येऊ दे राव. नाहीतर हळू हळू interest कमी होतो.

जव्हेरगंज's picture

11 Nov 2016 - 12:33 am | जव्हेरगंज

सही!!!

आंदो!

स्रुजा's picture

11 Nov 2016 - 1:31 am | स्रुजा

ओये होये पिश्वी.. कुनाची ईष्टोरी म्हणायची गं ही ;)

भारी आहे..

विशाखा राऊत's picture

11 Nov 2016 - 2:53 am | विशाखा राऊत

पियुडी और एक लव्ह स्टोरी ;)

निशाचर's picture

11 Nov 2016 - 4:56 am | निशाचर

गोष्ट आवडली. पुभाप्र!

पिवडे लय भारी.पूर्ण कर पण...लव स्टोरी.बरंच शुध्द लिवलंय गं.

पियुशा's picture

11 Nov 2016 - 11:03 am | पियुशा

सर्वान्चे धन्यवाद --/\--
मी लीहीताना सगळक्डे समास सोडलेला होता प्रकाशीत झाल्यावर सगळ एका खाली एक कस काय आलय ? काय कराव समास येण्याकरीता ?

सामि's picture

11 Nov 2016 - 11:47 am | सामि

कसल भारिए

चिनार's picture

11 Nov 2016 - 2:06 pm | चिनार

मस्त!!!

सुबोध खरे's picture

11 Nov 2016 - 8:48 pm | सुबोध खरे

लै भारी

Sanjay Uwach's picture

11 Nov 2016 - 10:10 pm | Sanjay Uwach

लई भारी लीवलाइसा की

रातराणी's picture

11 Nov 2016 - 11:33 pm | रातराणी

भारीच :) पु भा प्र

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2016 - 5:24 am | अत्रुप्त आत्मा

जिल्बुचा Sssssssssss आ.... ली!
लै भारी लिवलय.
@त्ये म्हन्तेत ना " एक मासा न खंडीभर रस्सा " .......!!!! ››› =)) कहर! =))

समांतर~ बघू , इथे तरी येतो का पांडूऊऊऊऊऊऊ! (पांडू- एक मिपासंन्यासी! =)) )