Skip to main content

विरंगुळा

बेधुंद (भाग : १७ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी रविवार, 28/08/2016 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
सुऱ्याचे दिवस आनंदात 'न्हाऊन' सरत होते . स्वप्नातही त्याने त्याला पियासारखी 'गर्लफ्रेंड' मिळेल असा विचार केला नव्हता. स्वर्ग जर कुठे असेल तर इथेच - पियाच्या मिठीत ! अजून २ वेळा तरी त्याला पियाला भेटता येणार होते , त्याचे दिवसरात्र पियाच्या 'गरम' श्वासांच्या आठवणीत जात होते - स्वर्ग कुठे असेल तर इथेच ! अन, दुसरीकडे एकाच रूम मध्ये राहून नित्याला काहीच चांगले भासत नव्हते ! ऐनवेळी हर्षलाचे 'ट्रेनींग' बदलल्याने , तो दिवसातून २०-२५ वेळा तरी तिला कॉल करत असे पण तीचा नंबर लागत नव्हता . दुसऱ्या कुणाला फोन करायची सोय नव्हती ! महाराष्ट्रापासून दूर असल्याने त्याला काय करावे हे कळत नव्हते .

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/08/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.

एक संघ मैदानातला - भाग २०

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 25/08/2016 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही वैयक्तिक कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.. --------------x--------------x---------- योग्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. उद्यासाठीचा सॉलिड टॉपिक तिला मिळाला होता. तुप्याने तिला झापडून शांत केलं. ती गप्प बसणार नाही हे आम्हाला माहित होत पण तिला जे हवं ते आम्ही तिला आत्ता करू देणार नव्हतो. सगळीकडे प्रचंड शांतता होती. हवेत उकाडा असल्यामुळे आत जावेसेही वाटत नव्हते पण म्हणून रात्र बाहेर काढणे पण योग्य नव्हते. अजून थोडा वेळ बाहेर काढून आम्ही नाइलाजले आत जाऊन झोपलो. मनावर आलेल्या ताणाने म्हणा किंवा त्या रागाने म्हणा नीट झोप काही लागली नाही.

" गुरु "

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 19/08/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
समोर उभा असलेला बाप त्याची सगळी करणी आज उधळून लावत होता , आत्ता मात्र महाडिक पण त्या दुसऱ्या मांत्रिकाकडे पोहोचला , झाली हकीकत सांगितली होम पेटवला गेला आणि आत्ता दोघे मिळून जनार्दन चा बळी घ्याला जोर लावत होते...... " गुरु सठ गुरु हठ गुरु हैं वीर, गुरु साहब सुमिरों बड़ी भांत सिंगी ढोरों बन कहो, मन नाउं करतार। सकल गुरु की हर भजे, छटटा पकर उठ जाग चैत संभार श्री परमहंस। " तिकडे जनार्दन च्या सर्वांगाला टाचण्या टोचल्या जात होत्या श्वास कोंडला जात होता.

इंग्रजी व्यायामशाळा

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 18/08/2016 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी-इंग्रजी शब्दकोष असं सांगतो की ‘व्यायामशाळा’ याचा समानार्थी इंग्रजी शब्द आहे ‘जिम्नॅशियम’. मात्र बोली भाषेत ह्या दोन्हीमध्ये फारच तफावत आहे. पूर्वी व्यायामशाळा असायच्या. व्यायामशाळा म्हणजे जिथे दंड, जोर, बैठका, मुद्गल, डंब-बेल्स आणि तत्सम उचलण्याची वजने हे मुख्य व्यायामप्रकार. थोडक्यात म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध सगळे व्यायाम. सिंगल बार, डबल बार, शिवाय जागा असली तर आखाडा आणि मलखांब. चपला बूट बाहेर काढायचे. व्यायाम अनवाणी करायचा. लॉकर्स वगैरे नाहीत. काढलेले कपडे अडकवायला भिंतींवर खिळे. बहुतेक जण बनियनवर व्यायाम करायचे. काही उघडबंबही असायचे आणि त्यात कोणालाही काही गैर वाटत नसे.

माझा सायकल प्रवास….

लेखक नपा यांनी गुरुवार, 18/08/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
सेमिस्टर नंतर आपल्या गावी आपण सायकल वर जाऊया..!! का?...उगाच अभियांत्रिकीच्या तिसऱ्या सेमिस्टर ला हा किडा आम्हा मित्रांना चावला. अति उत्साहात बरेच जण तयार झाले. पण दर वेळी परीक्षा देऊन थकलेलो आम्ही, या ना त्या कारणाने आपापल्या गावी (अर्थातच केलेल्या संकल्पाला फाट्यावर मारून) विनासायास आणि विनासायकल पोहचायचो. अधून मधून तो किडा पुन्हा पुन्हा डोकं वर काढायचा, चावायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. नंतर अचानक लक्षात आला कि आता हे तर शेवटचे वर्ष, मग मात्र मी पुन्हा एकदा सगळ्यांना विचारले कि कोण कोण तयार आहे सायकल सवारीला ला? फक्त एक मित्र तयार होता. सातव्या सेमिस्टर नंतर जायच ठरलं.

डेली सोप.... एक कथा वाचन -२

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 18/08/2016 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/37012
रघु: बाराखडी म्हणजे ते नाही का मुलाना शाळेत शिकवतात... क का कि की कु कू ...ह हा हि ही हु हू हे है हो हौ हं हः ती बाराखडी .... जाऊ दे तुम्हाला नाही कळायचे ते.... तुम्ही इंग्लीश मिडीयम मधे शिकलेले असाल. निर्दालनः म्हणजे.... रघु: ते जाउ दे हो.... पण ही कथा मी मॅडमला कशी सांगु? मला नीट समजावून सांगा. निर्दालनः नीट समजावून सांगायचे? ओक्के .... हे बघा .... हे बघा.... अगदी सोप्पे आहे... मी आणखी सोप्पे करुन सांगतो. (टेबला वरचे फळांच्या ट्रे मधील फळ घेतो ) हे बघा हे हे ....

सुश्याचं प्रेमपत्र

लेखक निखिल माने यांनी मंगळवार, 16/08/2016 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
"सुश्या फुगाला प्रपोज करणार" हि बातमी संजीवनच्या होस्टेलमध्ये वणव्यासारखी पसरली.सुश्याच्या नेभळटपनाकडे बघून आणि त्याचा पूर्वेतिहास माहित असल्याने मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.पण त्याला भेटून त्याचा रागरंग त्या बातमीवर विश्वास ठेवावाच लागला. कॉलेजच्या शेवटच्या वर्षीतरी ती आपल्याला 'हो' म्हणेल या भोळ्या आशेपोटी हा बहाद्दर हे नसतं धाडस करतोय हे मला कळून चुकल.खरतर आमचा सुश्या आणि फुगा दोघेही कॉलेजमध्ये प्रचंड फेमस! अभ्यासात सतत टोप केल्यामुळे सुश्या आणि आपल्या जरा जास्त नखर्यामुळे फुगा कॉलेजमध्ये प्रचंड फेमस झाले होते.

गो गोवा... भाग २

लेखक एनिग्मा यांनी सोमवार, 15/08/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
गो गोवा... भाग १ ११:३० ला येणारी मंडळी बरोबर १२:३० ला माझा दारात होती. तासभर माझा जीव टांगणीला लागला होता. घरच्या बॉस सोबत पुन्हा आश्वासनांची उजळणी करून मी घरचांचा निरोप घेतला. गाडी जवळ आलो तर माझे तिन्ही परम मित्र माझी गळाभेट घ्यायला आतूर होते आणि मी ही. गाडी पण सांगितल्याप्रमाणे नवीन होती. गाठीभेटी झाल्यावर गाडीत बसायला लागलो तर तिथे मागच्या सीट वर कोणीतरी पांघरुणात लपलेल होत. मी हळूच विन्याकडे पाहिल आणि खुणावलं, " कोण?". "अरे तो आपला ड्राइवर आहे", विन्या. "ड्राइवर?