Skip to main content

विरंगुळा

व्हेंन्टीलेटर

लेखक नाखु यांनी सोमवार, 07/11/2016 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः बागेच्या दाराशी असलेली नेहमीची भेळेची गाडी.

रंगभूमी दिन

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/11/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥ या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं.

सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 01/11/2016 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
. डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 01/11/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

काहीच्या काही - मधु आणि मधुमाशी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 30/10/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल. दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते. कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन बोल्टचा रिकार्ड सुद्धा मोडला असेल. ओलम्पिक असते तर नक्कीच सुवर्णपदक मिळाले असते. तरीही शरीरावर कित्येक ठिकाणी मधुमाश्यांच्या चुंबनांचे वेदानामयी काटे उमटलेच.

(ओम नमः) शिवाय

लेखक तिमा यांनी शनिवार, 29/10/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अ‍ॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली. नरकचतुर्दशीच्या सुमुहूर्तावर थेटरात स्थानापन्न झालो. रिकाम्या खुर्च्या मनांत धडकी भरवत होत्या. पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि आम्हाला, दर क्षणाला, साक्षात त्या भगवान शंकराचे दर्शन होऊ लागले. अजय देवगण हा साक्षात 'शिवाय' म्हणजे शंकराच्या रुपात हिमालयाच्या उंच शिखरांमधे लीलया बागडत होता.

तीर्थरुपांच्या काही आठवणी!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत. माझ्या आत्याशी देशपांड्यांच अजिबात जमत नसे. मला आठवत कि एकदा ती घरी आलेली असताना पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मला आवडायच म्हणून नुसत वाटलेलं पुरण वेगळ काढून ठेवलं होतं. मी ते अगदी पुरवून पुरवून २-३ दिवस खात असे.

वेळ ही निराळी (भाग दोन)

लेखक कऊ यांनी शुक्रवार, 21/10/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ ही निराळी भाग दोन ती एक रात्र. त्या एका रात्रीत सर्व काही चेंज झालं.. सर्व काही.. ती वेळ अशी होती की तेव्हा नाती बदलली.. ती वेळ निराळी होती.. पुजा गोरे.. ती मुलगी जी कधीतरी केवल वर जीव ओवाळून टाकायची,तीच पुजा अजय सोबत होती आज.दुपारचं जेवण सुमोने बाहेरून मागवून घेतल.जेवून झाल्यावर पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या.

वेळ ही निराळी (भाग - एक)

लेखक कऊ यांनी शनिवार, 15/10/2016 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
"वेळ ही निराळी" "यार हे readings बरोबर येतच नाही. कँडी वोल्टमीटरकडे बघ ग जरा. सर पण कुठे गायब झाले. 5.30 झाले ना यार" सेजलची ही बडबड ऐकून डोक दुखायला लागलं.आधीच 10.40-2.40 lectures 2.45 ला लगेचच practical .

अब तक छप्पन !

लेखक चिनार यांनी सोमवार, 10/10/2016 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय लष्कराने नुकतीच दहशतवाद्यांविरोधात यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केली. त्यासाठी संपूर्ण देशवासीयांनी लष्कराचे मनापासून अभिनंदन केले. सैनिक हो !! आम्हाला तुमचा अभिमान आहे !! आता गंमत बघा. इकडे सरकार समर्थकांची छाती छप्पन इंचाने भरून आली असताना त्यावर लगेच जुन्या-जाणत्या नेत्याचे उत्तर आले. "अरे असल्या छप्पन स्ट्राईक्स केलत्या आम्ही सत्तेत असताना, पण आम्ही कधी हिशोब नाही ठेवला." बरोबरच आहे म्हणा, नाहीतरी कुठल्या गोष्टींचा हिशोब ठेवलाय यांनी आजपर्यंत?? खोटं का बोलावं..कश्शाकश्शाचा म्हणून हिशोब नाही. आता तुम्हाला वाटेल, कमीतकमी स्वतःच्या वयाचा आणि अनुभवाचा तरी हिशोब ठेवावा.