Skip to main content

विरंगुळा

विरंगुळा — मनोरंजन आणि हलक्याफुलक्या मराठी लेखनाचा विभाग. विनोदी किस्से, गमतीजमती आणि विरंगुळा देणारे मराठी साहित्य येथे वाचा.

स्ट्रॅटेजी

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 07/01/2017 21:12 या दिवशी प्रकाशित केले.

आठ - दहा दिवसांपूर्वी व्हाट्सॲपवर आंतरसोसायटी हापपिच क्रिकेट स्पर्धेच आवतान आल. आणि गेलं नाही तर आपल्या सोसायटीची काय इज्जत राहिल? हा प्रश्न प्रत्येक सोसायटीच्या क्रीडाप्रेमी, हौशी क्रीडापटू इ. लोकांना पडला. आणि बघता बघता स्ट्रॅटेजीजना सुरुवात झाली. आमच्या सोसायटीचे हौशी क्रीडापटू कसे मागे राहतील?

सत्व

लेखक psajid यांनी शुक्रवार, 30/12/2016 15:17 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्याकडून तांबूस सोनेरी किरणं उसनी घेऊन उल्हासित झालेली पहाट श्री.दिक्षीत यांच्या दारावर हळुवार थाप मारू लागली होती परंतु उशिराच्या जागरणामुळे असेल किंवा रात्रीच्या पार दुसऱ्या प्रहरी लागलेल्या झोप यांमुळे असेल श्री.दिक्षीत तिच्या गोड हाकेला प्रत्युत्तर देत नव्हते. आपल्या सोनेरी रूपावर भाळून स्वागताला येणाऱ्या दिक्षीत यांची तिला अगदी सवयच होऊन गेलेली होती. परंतु आज ते बाहेर येत नाहीसं पाहून तिला अचंबा वाटला. थोडावेळ वाट पाहून थकलेली पहाट मोत्यासारख्या शुभ्ररुपात त्यांच्या दरवाजात अवतरली.

२०१६ आणि सिक्स वर्ड्स स्टोरी

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 30/12/2016 10:37 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील.
माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले.

धावते विचार :)

लेखक मन यांनी सोमवार, 26/12/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.

---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------
पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस.
.
.

मन्याची नोटबंदी !

लेखक चिनार यांनी सोमवार, 26/12/2016 10:54 या दिवशी प्रकाशित केले.

८ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटबंदीची घोषणा केली. त्यावर बऱ्यावाईट प्रतिक्रिया येणं सुरु झालं.काळ्या पैशेवाल्यांचे चेहरे पांढरे पडले अन प्रामाणिक लोकांचे चेहरे खुलले. पण काळे नं पांढरे ह्यातल्या कश्याशीही संबंध नसलेला आमचा मन्या मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर परेशान झाला होता. आता अर्थातच हे आमच्या ध्यानात आलं नव्हतं. साहजिकच आहे म्हणा, नोटबंदी नंतरच्या गदारोळात मन्याची आठवण येणे शक्यंच नव्हते. पण त्यादिवशी बँकेच्या लायनीत उभा असताना, दूर झाडाखाली मन्या दिसला. मी त्याच्याजवळ गेलो.

वाट - एक पाहणे !

लेखक चिनार यांनी बुधवार, 14/12/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.

वाट पाहणे हा योग माझ्या कुंडलीतच असावा बहुधा. मी कुठेही, कधीही, काहीही करायला गेलो की सर्वात आधी माझ्या वाटेवर येते ते म्हणजे वाट पाहणं. बऱ्याच ठिकाणी वाट पाहणं अपरिहार्य असते आणि ते सगळ्यांच्याच "वाट्याला" येते. उदा.बाहेर जाताना बायकोची तयारी होईपर्यंत वाट पाहणं या वैश्विक समस्येवर अजूनतरी तोडगा निघाला नाही. पण माझ्या वाट्याला वाट पाहण्याचे आणखी कितीतरी योग येत असतात. इतके की आताशा वाट पाहणं मी एन्जॉय करायला लागलो आहे. अतार्किक ,स्वैर,रँडम विचार करायचे असतील तर त्यासाठी मी वाट पाहण्याचा वेळ उपयोगात आणतो.

नेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 11/12/2016 07:22 या दिवशी प्रकाशित केले.

मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे.
तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे.

१. 'साडी'तील सौंदर्य (-वती)

(मी आज केलेला आराम - डिसेंबर २०१६)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 07/12/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी.

मी आज केलेला आराम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन पोटभर आराम सुरू केला.
आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

नोव्हेंबर महिन्यात मिपाकरानी केलेला एकूण आराम पुढीलप्रमाणे

रात्रीची झोप - २४० तास
दुपारची झोप - १६ तास .
(वरील तास धाग्यावर कोणीच माहीती न दिल्याने वैयक्तिकली अंदाजपंचे काढली आहे - ऑफीसमधील झोपेचे तास कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)

लिटिल मास्टरशेफ .... एक जळजळता प्रयोग. (अनाहिता बालदिन लेखमाला)

लेखक भावना कल्लोळ यांनी मंगळवार, 06/12/2016 15:31 या दिवशी प्रकाशित केले.

लिटिल मास्टरशेफ .... एक जळजळता प्रयोग. हा किस्सा आमचे युवराज ९ वर्षाचे असताना आहे तर अस्मादिकांना दोन छान ,गोंडस आणि काही प्रमाणात आगाऊ ( वडिलांवर गेले आहेत बाकी काही नाही) अश्या आमच्या निर्मित्या आहेत. कन्यारत्न ठीक म्हणावे पण युवराज .... हं हं हं ... जो आई बोलेगी मय उसका उलटाच करेगा अश्या धाटणीतले आहेत काही अंशी. तर काही दिवसांपूर्वीच स्टार प्लस वाहिनीवर लिटिल मास्टर शेफ हा शो सुरु झाला होता आणि लहान मुलांमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला होता. असाच एक निवांत रविवार आला. कधी नव्हे ते नवरोबा गुण्या बाळासारखा वागत होता, मुले शांत होती. ना घरकामाचे टेन्शन होते ना सफाईचे. राहता राहिले जेवण तर तो…