Skip to main content

विरंगुळा

वाघाची मावशी

लेखक निनाद यांनी गुरुवार, 15/05/2008 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
बाल कविता वाघाची मावशी वाघाची मावशी, ए मनी मावशी वाघाला आण ना घरी एके दिवशी तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहातगावात! मग कुठे? लांबलांबच्या तिथे तिथे म्हणजे कुठे? लांबलांबच्या जंगलात! जंगलात जायची तुला वाटते ना गं भीती? छे रे बाळा! आता मी थकले आहे किती? उंदिरमामा दिसताच जातेस कशी पळत? तू लहान आहेस बाळा, तुला एव्हढं नाही कळत कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी? म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी शर्थ झाली बाई!
Taxonomy upgrade extras

कट्टा

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 14/05/2008 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
कट्टे तह्रेतह्रेचे कट्टे हसत खिदळत चघळत गप्पा बहरत खुलत सतत हा कट्टा गहीवरून कधी बसतही धक्का बांधीत नकळत मनांते पक्का वासु कट्टा वासुगट टारगट, फुकट धमाल कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल तिखट रिटॉर्ट ये पटपट जहाल खटनट वासु म्हणे करन्ट कमाल पेन्शनर कट्टा म्हातार जर्जर शरीर, फार प्रहर काढले सरता भास्कर, कट्ट्यावर घर मानुनी आले पारावर चार पेन्शनर पळभर विसावले गप्पांवर स्मृतींवर खरोखर
Taxonomy upgrade extras

रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (पूर्वार्ध)

लेखक बट्ट्याबोळ यांनी सोमवार, 12/05/2008 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्र आणि घटना काल्पनीक.) योगायोगाने रंगपंचमी ला पुण्यात होतो. मित्रपरिवार कामात व्यस्त असल्याने रंग खेळता आले नाहित.(आणि दुर्दैवाने मैत्रिण परिवार नाही आम्हाला ... असो) तर मी आणि किटू घराच्या चौकटीत (balcony)गप्पा मारत होतो.अचानक रस्त्यावर गर्दी जमली. मा. श्री. इलासआण्णा तावरे साहेब(माजी युवक क्वांग्रेस अध्यक्श, पुने शहर, सध्या राष्ट्रवादित, फ़ुल पावरबाज) आपल्या पांड-या शुभ्र mercedes (म्हणजे आहे 2nd hand एस्टीमच, पण ते आणि त्यांची भक्त मंडळी समजतात. उगाचच कोणच्या भावना कशला दुखवा. ज्या दिवशी गाडी पहिल्यांदा गल्लीत आली, पिच्या (आन्ना चा डावा हात .... शी !!!) ने साष्टांग नमन घातला होता.

मॅट्रिक ते मॅट्रिक्स

लेखक हेरंब यांनी शनिवार, 10/05/2008 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
"द मॅट्रिक्स" हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे. म्या सदा येळकाढूकर, मुक्काम मुंबै !! माज्या बापाची गांवी शेती हाये. पन् म्या शिकावं अशी माज्या आयबापाची लई विच्छा. तसा म्या गेलो साळंत, पन् म्यॅट्रिकला गाडी फेल ! लई धडका मारल्या बगा पन् काईच उपेग नाय जाला. टकुर्‍याचा भुगा व्हायची येळ आलती. म्हंजी व्हायाचं काय की मला झ्वाप यायची कंदीबी, झ्वापलेला असताना काय भन्नाट सपानं यायची राव ! पर कोनाला सांगाया ग्येलं तर येडं हाय म्हनायची. शेवटी बा थकला.

संगणक उद् बोध

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 10/05/2008 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्री गणेशायः नमः नारद म्हणे नर्ड मुनीवर शंका अजाणांच्या करा दूर सोपे करून सांगा सत्वर संगणकाचे गूढ नारदा भक्तीभावे श्रवण कर संगणक महान अवतार आला कराया जगाचा उद्धार नर्ड म्हणे सांगी जनास रे वसतो साता समुद्रापार बाल फाटक ऋषी थोर उघडली विश्वात घरोघर सुक्षमृदू गवाक्षे संगणकी गवाक्षामधून घडते विश्वाचे दर्शन शोधुन काढी महाज्ञान गुगल ऋषींच्या कृपेने उघडी गवाक्षे एकामागे एक वेगळे रूप धरी प्रत्येक करी कामे झणी कित्येक मानव जणू बहुमेंदूंचा जे मूढ आधाशी होती अमाप खिडक्या उघडती खचीत संगणका लोळवती कोसती फाटक ऋषीला फुका जगी पसरले संगणक जाल जोडून
Taxonomy upgrade extras

दह्या वर भागवावे ते असे !

लेखक मुन्गी यांनी शनिवार, 10/05/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक दूधवाला भय्या दही घेउन बेस्ट बस मधे चढ्तो (त्याच्या साइकली ची कुणितरी अगदी 'मनसे' लावलेली असते) बस मधे खुप गर्दी असते पण पुढे एक जागा रिकामी दिसते , तर तो तिथे जाउन बसतो , त्याला माहीत नसते कि ती ज़ागा महिलांसाठी राखीव आहे . पुढ्च्या स्टाप ला काही बायका बस पकडतात , पुढे येतात अन त्याला म्ह्ण्तात - बाई : " ओ भय्या उठो , ये ज़ागा हमारी है , हम महिलाए हैं " भय्या : " अरे बेहेनजी , ठीक है आप महिलाए हैं लेकिन हम भी तो दही लाये हैं " ~X(
Taxonomy upgrade extras

एक कोड्न

लेखक मुन्गी यांनी शुक्रवार, 09/05/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक लहान मुल्गा आम्बा खाउन कोय रस्त्या वर फेकतो , तोच एक नास्तिक माणुस रस्त्या वरुन चालत येतो , त्या कोई वर सरपट्तो आणि डोके फुटुन मरण पावतो | दुस्र्‍या दिवशी पुन्हा तो मुलगा तसेच कोय रस्त्या वर फेकतो (असतात काही डाम्बिस पोरं, असो ) , मग एक पुजारी तेथून निघतो , तोही रपट्तो आणी डोके आपट्तो , पण त्याला काहीच होत नाही ... का ? - कारण जाको राखे सांईया मार सके ना कोय !
Taxonomy upgrade extras