विरंगुळा
बीबी का मकबरा
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

आमच्या घरातून दिसणारा सिंहगड... छायाचित्रे...
मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्याचदा ढगाच्या पडद्या आड असते...
पण कधीतरी दिसतो....
"एक होता पोल्ट्रीयात्री"
सांगायला बरे वाटतेय की आपले काही सदस्य मिळुन एक नवचित्रपट काढत आहेत. नव्या टेक्नीक नुसार या चित्रपटात प्रेक्षकाना कथेत हवा तो हवा तसा तसा बदल करण्याची सोय असेल. लव्ह ष्टोरी/ शादी / ताटातुट / व्हीलन / हीरो ला चॅलेन्ज / पोलीस/ चोर / तस्करी / लैच लाथाबुक्याने / तलवारीने / सायकल च्या चेन ने / बंदुकानी हाणामारी काय वाट्टेल ते लिहु शकता. थेटरात पिक्चर दिसताना *ज्याला जसा हवा तसा एकाच वेळेस दिसेल अशी सोय ह्या नव्या टेक्नीक मधे आहे (*ही आयडीया : मिपा कुटुंबीयांकडुन पेटंटेड)
तुम्ही यात भर घालु शकता / काटछाट करु शकता.
तर मग वाट कशाची पहाताय ?
पहिल्या पावसात भिजायचे?
पाऊस !!!
तो ही पहिला !!!
वाह क्या बात है !!!
काल पुण्यात या मोसमातला पहिलावहिला पाऊस पडला आणि मन अगदी सैरभैर झालं.
पहिल्या पाऊसाची गंमतच काही वेगळी असते नाही ?
लहानपणी अशा पावसात आईची नजर चुकवून भिजायचे. आता नवय्राची नजर चुकवुन का होईना पण पहिल्या
पावसात भिजतेच . कोणाकोणाला पहिल्या पावसात भिजायला आवडते बरे?
की आमच्या यांच्यासारखे विजांना घाबरुन घरात कोंडुन घेतात?
Taxonomy upgrade extras
(येशील येशील येशील___)
आपल्या लाडक्या लोकलला-
(चाल अरुण दाते यांनी गायलेले -येशील येशील येशील राणी , पहाटे पहाटे येशील )
------------------------------------------------------------------------------
येशील येशील येशील गाडी वेगात लवकर येशील?
तिकीट काढुन, वेगात पळुन खिडकीची जागा तू देशील !! येशील येशील येशील--
सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ!
तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु !
सर्वांना भिडुन, डब्यांना खेचुन मुक्कामी मला तु नेशील !!
Taxonomy upgrade extras
मिसळपाव