कॉन्ट्रॅक्ट (बहुतांशी खरी झालेली एक पद्यकथा)
लेखनप्रकार
कॉन्ट्रॅक्ट
चार दिवस सुट्टी होती
म्हटले जरा मौज करावी
बायकोला घेऊन सोबती
थंड हवेची सहल करावी.
थंड हवेची सहल करावी?
बायको पण खूश झाली
त्या खुशीत तिने दारूची
पॅक करू दिली बाटली
पॅक करू दिली बाटली
मी पण लिमीट पाहिली
जवळच्या दुकानातून
तीन वाइनची क्रेट घेतली
तीन वाइनची क्रेट घेऊन
निघालो मी सहलीला
स्वप्ने पाहत प्रवास झाला
करू प्रिये सह लीला
कसली प्रिये सह लीला!
पाहा अगाध दैवाची लीला
थांबवली बस अचानक
डाकूंचा घाला पडलेला
डाकूंचा घाला पडलेला
मुसंड आत चढलेला
घेतले सगळ्यांचे दागिने
पैसा अडका गोळा केला.
पैशाअडक्याचे एक सोडा
तीन क्रेट पण घेतल्या
नशा पळवून गेला
न उघडता बाटल्या
नशा पळवून टोळी
झाली अदृश्य सकाळी
उरली रिकामी पकिते
रडणे अमुच्या भाळी
आता रडत बसू नका
जवळ आहे पोलीस नाका
बस ड्रायव्हर बोलला
एफायार लिवून टाका
एफायार लिवून टाकायला
बस चालली जोरात
पण काय होते दैवात
ब्रेक मारला जोरात
ब्रेक मारला जोरात
तेच डाकू समोर आले
मुसंड मघाचेच सगळे
दोघे आतमध्ये घुसले
दोघे आतमध्ये घुसले
गाठोडी खांद्यावर घेऊन
आपला माल घ्या ओळखून
चाललो आम्ही परतून
चालले डाकू परतून?
चालले माल लोटवून?
अक्रीत कसे झाले?
कलियुगात इतके सगळे
वाल्मिकी कसे घडले?
न राहवून शेवटी
भीत भीतच विचारले
भाई क्या गलती हुई?
सारे धन वापस केले?
सारे धन वापस केले?
अबे सारे धन वापस केले,
काही मिळाले नाही डाक्यात.
फुकट आमचे श्रम झाले
आजचा दिवस तोट्यात
आजचा दिवस तोट्यात?
भाई असे का बोलता,
आजचा दिवस तोट्यात?
भाई असे का बोलता,
आमचा त्याग असा
ठोकरून का टाकता?
ठोकरून टाकण्यायोग्यच सगळे,
खोटे दागिने किरकोळ पैसे
ठोकरून टाकण्यायोग्यच सगळे,
खोटे दागिने किरकोळ पैसे
क्रेडिट कार्ड क्यां चाटने है?
कॅन्सल करता प्लॅस्टिक जैसे
आम्हा भले मिळो न काही
कॉंन्ट्रॅक्ट पक्के ठाणेदाराशी
एका दरोड्याचे कमिशन
नगद हजार पंचाऐंशी
लगान मिली जो भीक जैशी
घाटेमे पडती लूट ऐशी
घाटा घेण्यापेक्षा असा
माल सारा वापस केला
जावा सुखाने घरला
एफायारचा त्रास वाचवला
नाही एफायार नाही कमिशन
तुम्ही खूश आम्हा न टेन्शन
डाका दुसरा घालू जंक्शन
ठाणेदारालाही पुरवू राशन
प्रॉफीट थीअरी त्याची ऐकून
म्हणालोमी थोडा चक्रावून
भाई इतके बोललात म्हणून
विचारतो मी साहस करून
माल आमचा वापस केला
भाई वाइनच्या बाटल्या नाही दिसल्या!
तसा रागावून डाकू ओरडला
अबे तू काय पागल झाला
आठवड्यात दरोडा नाही झाला
जर आठवड्यात दरोडा नाही झाला
पाजावी लागते दारू ठाणेदाराला
पाजावी लागते दारू ठाणेदाराला
केलेच पाहिजे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट मला
धन्यवाद द्या तुमच्या नशिबाला
कोणी वेड्याने वाइन आणल्या
नाहीतर चाट पडली असती माझ्या खिशाला
दोन लाफा मारूनच सोडले असते तुम्हाला
दोन लाफा मारण्याचे ऐकताच
माझी सारी जान खल्लास
बसमध्ये बसलो मुक्काट
थोबाड सलामत तो क्रेट पचास
थोबाड सलामत तो क्रेट पचास
वाचने
3462
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सुपरडुपर हिट! :)
Three Cheers तात्या
In reply to Three Cheers तात्या by अरुण मनोहर
:)
मस्त कविता
थोबाड
छान..
In reply to छान.. by गणपा
दरोडा नव्हे.