मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! :)
समस्त मिपाकरांना आमच्याकडून (;))मकरसंक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा! :)
विरंगुळा — मनोरंजन आणि हलक्याफुलक्या मराठी लेखनाचा विभाग. विनोदी किस्से, गमतीजमती आणि विरंगुळा देणारे मराठी साहित्य येथे वाचा.
समस्त मिपाकरांना आमच्याकडून (;))मकरसंक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा! :)
मिल्याचे 'स्वप्न एखादे जणू...' वाचताना आम्हाला सत्याची जाणीव झाली! ;)
चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले
चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले
बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले
टेबलाला धडकुनी पडलो कितींदा मी जरी
भंगले नाही तरी प्याले कधी हातातले
घेतली काढून त्यांनी बाटली हातातली
वाटले मी टुन्न झालो; ग्लास सारे तोडले
दोष हा माझा कसा? जर पाजले त्यांनी मला
मीच हवर्यासारखे प्याले 'विरोधी' ढोसले?
डीसूजाने सिगारेट विझवली. कंटाळा आला म्हणून. देवापूढे मेणबत्ती लावली. ते सुद्धा एक कर्तव्य म्हणून. मेरी लावायची म्हणून. मेरीला आपण भकाभका सिगारेटी ओढतो ते बिलकूल आवडायच नाही. आणि ती चिडते म्हणून आपण मुद्दाम ओढायचो तिच्या समोरच. तिच्या अंगावर धूर सोडत. मग तिला खोकल्याची उबळ यायची. डोळ्यातून पाणी काढत खोकायची. रागावून लटकी चापट मारायची. आपण तिला जवळ घ्यायचो तिच्या खोकून ताज्या मधासारख्या गालावर हात फिरवायचो. ती झिडकारायची पण तीला ते आवडत असणारच. डीसूझाला अप्र्रूप वाटल. चांगला ३ वर्ष संसार केला आपण मेरी बरोबर. पण तिचा एकही गुण आपल्याला कसा लागला नाही.
जयवी यांची सुंदर कविता 'गुलाबी चांदणे' हीच ह्या विदारक सत्यामागची खरी प्रेरणा आहे! ;)
घुमा जडशीळ जाड कसा तनात तनात
कसे फुलेल चांदणे गुलाबी मनात मनात?
भासे कंपन धरणी मन कातर कातर
उरी भय थरथर, स्वप्न करी चूर चूर
कुणी बुकलले माझे आज गुपित गुपित
कसे फुलेल चांदणे गुलाबी मनात मनात?
आठवांचे मज जाळी, ऊन बेजार बेजार
त्याच्या मनात 'बसंती', मन जहर जहर
गाणे गाई मेला तिचे माझ्या कानात कानात
कसे फुलेल चांदणे गुलाबी मनात मनात?
काही काही कलाकृती/प्रसंग अवचित आवडून जातात. ते का आवडले हे सांगण्यासाठीसुद्धा काही वेळा आपल्याकडे शब्द नसतात. त्यांचीच आठवण जागवण्यासाठी हा धागा.. माझ्यापासूनच सुरुवात करतो :) -
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही.
शाळेत जायला निघतो तेव्हा रोज म्हणते आई , रस्ता नीट क्रॉस कर करु नको घाई.
डोळे ठेव उघडे रस्त्यात - दिसली गंमत काहि , घरी येउन सांग बात मारायचि नाहि.
आमच्या बापाला अखेर आमची आवड कळली म्हणायची!
च्यायला! गेले एक-दीड वर्षं नुसता छळवाद मांडला होता मेल्यानं! याची हौस नि मला निष्कारण सजा!! आताशा कुठे रुळावर आलाय.
:P प्रेम म्हणजे काय असत॑............... :X ,
तुमचे आणि आमचे सर्वा॑च॑ सारखच असत॑..............,
मुड असो वा नसो तरी ते मना विरूध् कधी करायच ही नसत..........,
समोरच्या माणसा समजून घेऊन, निर्मळ मन पहून ते करायच॑ असत॑......,
प्रेम म्हणजे काय असत॑ ...............!!!
चेहरा बघुन कि॑वा रूप बघुन ते करायच नसत......,
पैसा, मालमत्ता बघुन ते करायच नसत......,
तर,
समोरच्यात किती चा॑गले आणि वाईट गुण आहेत..........,
आणि आपल्यात कीती शक्ति आहे ते गुण सुधरण्याची हे पाहून ते करायच॑ असत॑......,
प्रेम म्हणजे काय असत॑ ...............!!!
'वार कुणावर...' झालेले बघून मला अगदी कसेसेच झाले आणि मग आम्हाला उमाळा आला! ;)
प्यार कुणावर माझ्याच्याने करवत नाही
खूप शेकलो म्हणून आता मिरवत नाही...
'सल्लू'सारखे बनणे नाही जमले मजला
उगीच नंबर कुणाचेच मी फिरवत नाही...
हातभट्टिचे सेवन करतो, 'हिमेश' सुनतो
हट्ट 'बिपाशा'चे मी आता पुरवत नाही...
चलन मागणारे मी बहुदा टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मजला अठवत नाही...
ब्रँड धुराचा का बदलत जातो असा तुझा?
सवाल असले उत्तरण्याचे ठरवत नाही...