Skip to main content

?

लेखक शितल यांनी रविवार, 01/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तू एक स्वप्न आहेस की सत्य? हा तुझा आभास का तुझी जाणीव करून देणारा अलगद स्पर्श? मनाला काहीच उमजत नाही ... आणि शरीरालाही. सगळे विसरून वर्तमानात जगायचे, तरी घुसमट होते. मनाच्या कोपर्‍यात, खोल कुठेतरी एक साद ऐकू येत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण आज तर माझाच आवाज मीच विसरले आहे! तुझ्या सादाला प्रतिसाद द्यायला टाळतेय... का? कारण तू सत्य का तुझा मृत्यू सत्य? ... शरीर म्हणते तू आज जगात नाहीयेस, मन म्हणते तू मला सोडुन कुठे ही दूर नाही... फक्त माझ्यासाठी... मृत्यू नंतरही माझ्याजवळ. मनाला खूप दु़:ख झाले की तु़झा हसरा चेहरा, आधार देणारी नजर झोपेतही जाणवते, सुखात ही तीच प्रेमळ, कौतुकाची नजर मनाला समाधान देऊन जाते, अनंत काळाच्या सोबतीसाठी माझी वाट पहात उभा तू... मला तु़झे हे भास का छळतात? कोणीही करणार नाही इतके भरभरून प्रेम केलेस, प्रेमाची अपेक्षाही न करता फक्त प्रेम देणे एवढंच तुला माहित होतं, न मिळणार्‍या प्रेमा बद्दल कधीच कोणतीच तक्रार नाही, प्रेमाची दखल घेतली जात नाही म्हणून कधी प्रेम करणंही सोडलं नाहीस... पण तुझ्या मृत्यू नंतर माझ्यात एवढा बदल कसा झाला? तुझ्या प्रेमाची दखलही न घेणारी मी आज तुझ्या विचाराने एवढी हळवी कशी झाले, तुझ्या प्रेमाची, तुझी एवढी सवय होऊन गेलेली मी आज तू ह्या जगातुन नाहीसा झाल्यावर तुझ्या प्रेमाची किमंत मला कळली का? असे हे छळणारे सतावणारे हजारो प्रश्न !!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2598
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

शितल मस्त लिहीलयस.

शितलमॅडमनी एकदम जोरदार फटकेबाजी चालू केलीये की!. वेगळ्याच मूडमध्ये असताना लिहिलेलं दिसतय. छानच! रेवती

...तुमच्या लिखाणातली intensity पाहून राहवलं नाही म्हणून तुमच्या भावना (तुमच्याच शब्दांत) काव्यबद्द करण्याचा प्रयत्न करतोय, चुकीचा भाव आल्यास क्षमस्व! सत्य तू की स्वप्नभास जाणीव अलगद स्पर्श खास उमज नाही तनमनास विसरू कसे मी सर्व आज घुसमट खोल या मनाची हाक येते ओळखीची विसरले माझाच नाद देऊ कशी मी प्रतिसाद येणे खरे की सत्य जाणे जाणे संवेदना तुझे नसणे मन म्हणते तू दूर नाही फक्त माझे, तु़झे हसणे आधार नजरेचा नितनूतन प्रेमळ कौतुक शांतवी मन अनंत देऊन समाधान मार्गी उभा चिरंतन निरपेक्ष केलेस प्रेम फक्त देणे एक नेम तक्रार नाही, खंत दूर किती रे तव मन सुंदर मृत्यू तुझा छळतो मला एवढी हळवी कशाला सवयीचे प्रेम झाले आज किमंत कळली मला?

In reply to by बहुगुणी

बहुगुणीजी, भावना अगदी सुंदररित्या काव्यबद्द केल्या आहेत.. :) मनापासुन धन्यवाद ! :)

>पण तुझ्या मृत्यू नंतर माझ्यात एवढा बदल कसा झाला? तुझ्या प्रेमाची दखलही न घेणारी मी आज तुझ्या विचाराने एवढी हळवी कशी झाले, तुझ्या प्रेमाची, तुझी एवढी सवय होऊन गेलेली मी आज तू ह्या जगातुन नाहीसा झाल्यावर तुझ्या प्रेमाची किमंत मला कळली का? :) सुंदर ! जेव्हा तो / ती आपल्या जवळ नसते तेव्हाच आपल्याला तीच्या/त्याच्या प्रेमाची किंमत कळते, असे का होत असावे ? जेव्हा ते प्रेम आपल्या जवळ नसतं तेव्हाच का किंमत कळते ? जेव्हा ते प्रेम आपल्या बरोबर असतं तेव्हा आपण त्या प्रेमाला समजवुन घ्यायला कुठेतरी कमी पडतो का ? काही क्षणाची आठवण व दिर्घकाळ येत राहणारी आठवण ह्या मधील मला काही क्षणाची आठवण आलेली आवडेल... दिर्घकाळ येत राहणारी आठवण मलाच निराशेच्या गर्ते मध्ये ढकलेल. ! शितल खरोखर उत्तम लिहले आहे... धन्यवाद.

In reply to by दशानन

शितल, बघ आता गुरूजींनी पण कौतुक केले आहे!!! ;) बिपिन कार्यकर्ते

शितल........ खूप छान उतरल्या आहेत तुझ्या भावना :) लिहिती रहा !!

लय भारी

छान झालाय छोटासा सुटसुटीत लेख.

सर्व वाचकांचे आभार, "?"आवडल्याचे कळविल्या बद्दल धन्यवाद ! :)

अरेच्या.. हे वाचायचेच राहुन गेले होते... फार छान!! लिहित रहा... --अवलिया

फार छान झालाय लेख... खूप भावपूर्ण... धन्यवाद...