Skip to main content

विरंगुळा

एक निवांत, मोकळा वीकांत

लेखक सुनील यांनी रविवार, 15/03/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक मोकळा, निवांत पसरलेला वीकांत निवडावा. भरपूर आराम करावा. आराम करायचा कंटाळा आला, की एक फर्मास चहा घ्यावा. चहामुळे पुन्हा आराम करण्याइतपत तरतरी आली, की पुन्हा आराम करावा! एखाद्या जुन्या चित्रपटाची सीडी पहावी. बाजारात जावे. छानपैकी मुडदुशे आणि कोलंबी आणावी. दोन्ही व्यवस्थित साफ करून घ्यावी. कोलंबीचा काळा धागा काढण्यास विसरू नये. आलं, लसूण आणि लाल मिरचीचे वाटण करून घ्यावे.

एक संवाद ..भाग १..( मी आणि ती)

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 15/03/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभामध्ये होणार्‍या बायकोला घेऊन आलेल्या मुलाचा लग्नघरात तिच्याशी झालेला संवाद.... _____________ मगाशी भेटल्या त्या सगळ्या आत्या माझ्या..त्या बर्‍या आहेत.. म्हणजे? भोचक प्रश्न कमी विचारतात.. असं होय? पण मला नाही हं सगळी माणसं लक्षात राहायची... जमेल तशी थोडीथोडी ठेव लक्षात... ओके.. तशी आमच्याकडे चक्रम माणसांची कमी नाही... असू दे.. मला सवय आहे.. हे बघ, ती जी दिसतेय ती ... कोण? अगं, ती काय...पैठणी घातलेली... हॅ..ती काय पैठणी आहे होय? नसेल मग..

काव्य झुरळे- एक मंथन

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 15/03/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
(होळीचे औचित्य साधून,मिपावरील एक नव कवी तुषार शिंतोडे ह्यांची एक ज्वलंत कविता (म्हणजे ज्वलंत प्रतिसाद मिळवणारी कविता ) फॉलो करण्याचा एक प्रयत्न. ह्या प्रयत्नांमागे कुणालाही दुखावण्याचा किंवा सुखावण्याचा कुठलाही अंत्यस्थ (का अस्वस्थ) हेतू नाही. कृपया हलक्याने घ्यावे.
Taxonomy upgrade extras

हैद्राबादी पाटी!

लेखक शक्तिमान यांनी शनिवार, 14/03/2009 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार पुणेरी पाट्यांची महती हैद्राबादेतही पोहोचली म्हणायची.... ही पहा मी टिपलेली एका पाणपोईबाहेर लावलेली एक चपखल व लक्षवेधक हैद्राबादी पाटी.... पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की :)

(कहर)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 14/03/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
अर्पिलास जरी तुझा अकल्पित कहर मला तू, रिती तरीही निबंद प्रतिभा माझी राहिली कशी? टंकताना प्रतिसादाचे नव्हते भान मजला, आता हे अवैचारीक प्रतिसाद राहू दे तुझ्याचपाशी! कुपितले, खिशातले लेख आगळे कसे , कधी अन कुणी टंकले, कुणास ठावे? खरडीखरडींवरी आवाहनाच्या कळ्या ठेवुनी, उडून गेले ते वैचारीक समुपदेशनवाले उधळलीस तू विडंबने माझ्या भग्न मनावर तुरट कडवट नासक्या शेंगदाण्याची काय करू मी?

<काय काय वाटतयं>

लेखक दशानन यांनी शनिवार, 14/03/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं डोकं गरगरतय विचित्र वाटतयं मळमळतय असलं विचित्र फिलिंग वाटतयं काल पिलेली बाहेर येऊ असं विचारतेय वाटतयं आताशा अवस्थेमध्ये खुप अस्वस्थ वाटतयं सगळे जवळ असूनसुध्दा उतारा देणारा एकपण नाही असं वाटतयं काल रात्री राहिला अर्धा पॅग तो अर्ध्यावर सोडून दिला वाटतयं 'वॅट ६९' कालचा ब्रान्ड आपला नव्हंताच असं वाटतयं आताशा सकाळ सकाळी खूप मळमळतयं कसं सगळे विचित्र विचित्र वाटतय समोर पडलेला तो अर्धा पॅगचा उतारा दिसतोयं जरा घटकाभर डोकं दाबणारी कोणी लाभणारच नाही वाटतयं आताशा अवस्थेमध्ये लिंबू पाणी देणारं कोणीच नाही असं वाटतयं लोक म्हणतात कशाला येवढा पितो कशाला डोकं हँग होव्हर मध्ये झुलेतयं पण सप्तर॑गी ही दुनि
Taxonomy upgrade extras

<आजच्या जेवणात>

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 14/03/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: चैत्रालीताईंची सुंदर कविता आताशा जीवनात. आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय। सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥ बनवत असताना बनवलेलं संपणारच नाही वाटतंय। तेच जेवताना मात्र "किती पटकन संपतंय" असं वाटतंय॥ आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय। सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥ ज्याच्यासाठी बनवायला घेतलं तोच फोनवर बोलत बसला। "दुर्दैव त्याचं, पुरणपोळी माझ्यासाठीच आहे" असं वाटतंय॥ आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय। सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥ समोर ठेवलेल्या डब्यातलं किलोभर तूप दिसतंय
Taxonomy upgrade extras

<काल>

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 13/03/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
नक्कीच काल काहीतरी चुकलय काज कशानं हे अंग दुखतय आज ? कधी नाही त्या सुचल्या दोनच ओळी दंगा घातला भलत्याच वेळी अनावर नशा रात्रीची व ती खेळी खेळातील ते वेडे सुख दुखतय आज ! मनातच काय तो खेळ आता डोक्यात ही नाही सुखाचे गाव कुठे दुरवर राही दुखती कंबर मलमची का वाट पाही टपटप पाणी डोळ्यातून पडतय आज ! उदास चेह-याची वाकडी मान निस्तेज झालो लचकली मान एक नंबरी जुनं दुखणं वर आलं उफाळून पुन्हा काल ? प्रेरणा - आज
Taxonomy upgrade extras

रसराजेश्वर..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 13/03/2009 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी.. मार्च अर्धा संपला जवळजवळ! तो आता येणारे, तो येतोय, येऊ घातलाय..! चला त्याचं स्वागत करुया, सज्ज राहूया, गुढ्यातोरणं उभारून! तो राजा आहे, तो बादशहा आहे तो सम्राट आहे..! तो साक्षात चक्रवर्ती आहे..! तो माणसाला माणूस जोडतो, तो मनातले सारे विकार करतो नाहीसे एका क्षणात.. तो वाटतो फक्त प्रेम