Skip to main content

विरंगुळा

पहावं ते नवलंच..

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 03/04/2009 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करतो, आणि थोडक्यात सांगायचे तर सध्या माझे कामाचे स्वरूप नवीन प्रोजेक्ट्स मिळवण्याकरता त्यांचे एस्टीमेट आणि प्रपोजल तयार करणे असे आहे. तर, असाच एक संभाव्य प्रोजेक्ट म्हणजे ऍटलांटा एरियात होणाऱ्या एका प्राथमिक शाळेचे रिनोवेशन. इमारतीची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी या शाळेत गेलो होतो. शाळेभोवती चक्कर मारत असताना शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असणारा, आणि बाहेरच्या दिशेने उघडणारा, एक दरवाजा दिसला (खालचा फोटो बघा) आणि हसतच सुटलो .... फोटो बघा तुम्हीसुद्धा हसत सुटाल... दरवाज्या बाहेर खाली उतरण्यासाठी ना जीना ना अजून काही व्यवस्था...

देवानी मुलींना असं का बनवलं?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/04/2009 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबनाच्या विडंबनाचं विडंबन) एका (म्हातार्‍या) कवी कडून प्रेरणेतून प्रेरणा देवाने मुलींना असं का बनवलं? की बघताच ती मला आई सारखं वाटावं सगळ्याच स्त्रीया मला आई सारख्या वाटतात पण तिने कुणाही बाळाला मिठीत का घ्यावं? कुणाचे डोळे,तर कुणाचे ओठ प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण प्रेमळ माझं मन,नाही आई म्हणत नाही पहाताच तिला मन येतं भरून कुणी हसून आपलंसं करतं कुणी लाडावून हृदयाजवळ घेतं प्रत्येकाची खूबी निराळीच असते मग आपली आई कुठे आपलाजवळ उरते कुणी अंगाई म्हणून झोपवतं कुणी मांडीवर घेऊन शांत करतं किती तर्‍हा झोपवण्याच्या असतात मन हे वेडं प्रत्येक चेहर्‍यात फसतं सगळ्याच आया कमाल करतात नको नको म्हण
Taxonomy upgrade extras

(चेहरा)

लेखक दशानन यांनी गुरुवार, 02/04/2009 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
चेहर्‍या मागे चेहरे दडलेला खरे-खोटे कुणास कळला? तुझा रंग प्रत्येक वेळी वेगळा काळा, गोरा कधी सावळा मेकअप मध्ये कधी लपलेला जसे काळ्यावरती पिठ फासलेला तुझा नेहमीच रंग वेगळा प्रत्येक वेळी भाव वेगळा आरसाशी तुझा लपंडाव चाललेला दुस-याला धसका घ्यावा लागलेला विना मेकअप बघुन तुला चक्कर येऊन पडलेला होवो ना प्रत्येक वेळी सामना चेहराचा ना राहो तुझ्या चेहरा नेहमी समोर दर्शनी धुतलेला अन विना मेकअप, सडलेला. ____ जागुची माफी मागून ;) प्रेरणा
Taxonomy upgrade extras

आणखी एक कविता पूर्ण करा

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 02/04/2009 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एका (अर्धवट) कवीची (अर्धवट बिघडलेली) कविता. बघा ब्वॉ रिपेअर करता येते का .. रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले |
Taxonomy upgrade extras

लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग २)

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 02/04/2009 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग १) स्थळ ः सिंधुदुर्गातील कुडाळमधील एक छोटेखानी घर. वेळ ः दुपारी चारची. पात्रे ः अस्मादिक व मातुःश्री. ----------- पार्श्‍वभूमी ः कोकणातील व्यवस्थित घर, मुलगी साधीसुधी, आज्ञाधारक, गृहकृत्यदक्ष वगैरे. त्यामुळे मातुःश्रींच्या एकदम सर्वाधिक प्राधान्यातली. "नाकारण्याचा प्रश्‍नच नाही!' या गटातली. त्यामुळे भेटून "पारखण्यासाठी' स्वतः मातुःश्री हजर. पण मुलगी मुंबईला काही कामासाठी गेलेली. आम्ही गोव्याहून मावशीकडून थेट कुडाळात दुपारी दाखल.

`पद्मश्री'चा सन्मान...कित्ती छान!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 01/04/2009 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
akshay1 अक्षयकुमारला "पद्मश्री' सन्मान झाला, तेव्हा कोण टीका झाली होती! पुरस्काराला काही किंमतच उरली नाही, कुणालाही देतात, वशिलेबाजीचा जमाना आहे, वगैरे वगैरे! 31 मार्चला हा पुरस्कार प्रदानही झाला. अक्षयनं त्याच्या आदल्याच दिवशी आपल्याला मिळालेला सन्मान किती योग्य होता, हे सिद्ध करून दाखवलं. मुंबईच्या लॅक्‍मे फॅशन वीकमध्ये अक्षय रॅम्पवर चालला.

गाडीच्या गाडीवाना...

लेखक डॉ. आनंदा वारके यांनी बुधवार, 01/04/2009 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S तुज्या गाडीचा गा बैल बैलापाठी नक्षाची झुल तुज्या गाडीचं गा चाक चाक धावतया एकटाक गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S तुज्या बैलाच्या गळ्यात चाळ चाळ वाजत्यात खुळखुळ तुज्या कपाळाचा गा घाम घाम देतोया दाम गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S
Taxonomy upgrade extras

आमने सामने

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 31/03/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख हा फक्त मौजमजा आणी मिपाकरांना थोडेसे हास्य क्षण द्यावेत म्हणुन लिहिला आहे. लेखात ज्या ज्या मिपाकरांची नावे आली आहेत त्या पैकी एकाचीही मी ह्या साठी परवानगी घेतलेली नाही. ह्या लेखा मागच्या भावना समजावुन घेउन तुम्ही मला माफ कराल असा मनात विश्वास (म्हणजे आपले पानिपत होणार नाही) आहे. ह्या लेखात झालेल्या उल्लेखानी कोणी दुखावले गेल्यास मी त्याची आधीच जाहिर माफी मागत आहे.