Skip to main content

विरंगुळा

युद्धावरील काही चित्रपट

लेखक दिपक यांनी शुक्रवार, 13/03/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एक भुत चढलं आहे युद्धावरील चित्रपट (वॉर मुव्हीज) पाहण्याचे. जे मिळतील चांगले असतिल ते पाहतोय. समिक्षण आणि परिक्षण मधले मला घंटा कळत नाही. तरीसुद्धा जे आवडले ते इथे मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. सेव्हींग प्रायव्हेट रायन(Saving Private Ryan) -- स्टीवन स्पीलबर्गचे अप्रतिम दिग्दर्शन ह्या चित्रपटाला टॉप वॉर चित्रपटाच्या पक्तींत बसवते. चित्रपट पाहताना आपणही चित्रपटातील एक आहोत आणि लढाई स्वत: डॊळ्याने पाहतोय असे भासते, चित्रपटातील सुरुवातीचा प्रसंग अगांवर काटा आणतो.

(आज)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 13/03/2009 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची 'आज' ही सुंदर कविता वाचली आणि मग "त्याचे उत्तर माहीत असूनही दिले नाहीस तर डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील" ह्या वेताळाच्या धमकीप्रमाणे, "तुझ्या धर्माला जागला नाहीस तर ह्या ओळी रात्री छळू लागतील" ह्या भीतीने मला हे लिहिणे भाग पडले!

वर्षाव अमृताचा..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी श्वासात खोल जाई मिसळून रातराणी बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी (हळुवार मंद होई हा दीप तेवणारा वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा ..

<<गाळलेली हात भट्टीची>>

लेखक कुंदन यांनी गुरुवार, 12/03/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
गाळलेली हात भट्टीची>> लेवुन तवंग नवसागराचा, दारु होती तेलकट|| न पोलिसांचे डोंगर आडवे न एक्साईज चे किल्ले रासवट|| देशीच्या बारची दारं उघडी सताड उद्याचा दिवस आहे रात्रीच्या पल्याड|| बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा|| शिलगावुनी सिगारेट मारला एक झुरका|| सोडा/पाणी टाकुन घेणे मला कधी ते जमणेच नाही || फेसाळलेली दारु आणते एक आगळीच खुमारी दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी||
Taxonomy upgrade extras

<--->

लेखक दशानन यांनी गुरुवार, 12/03/2009 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
येतो एक आवाज गुत्यातून चीरुन दारुड्यांचा पडदा.. अन रम, आपली व्हिसकी दंग पिण्यात बेवडा...!! अन इथे... पुन्हा पिण्याची उबाळ येथे पडले हो बेवारस... बेवडा एक परि, करुनी तंगडी वरी हसले सगळे त्यावरी, खी खी खी...
Taxonomy upgrade extras

<फोडणी पाककलेची>

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 12/03/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा जयवीताईंची साधी, सोपी आणि मस्त कविता लज्जत सुखाची. (कविता वाचून त्याचा माझ्या खर्‍या आयुष्याशी संबंध लावल्यास मी जबाबदार नाही. ;-) ) लेवून तवंग तेलाचा भाजी होती गुळमट भरपूर तूप लावूनही पोळी झाली चामट होती मनात प्रचंड भिती न कुठे होता दूधाचा थेंबही खिडकी होती उघडी सताड शेजार्‍यांचा बोकाही कुंपणाच्या पल्याड झालं ते भरीत असं बेचव आणि अळणी जरी स्वयंपाक सोपा, मला कधी तो जमणेच नाही. कढीला हवी खरी, फोडणी खमंग हिंगाची हिंग थोडा ताजा अन्‌ मोहरी हवी शेजार्‍यांची तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी दुसर्‍याने बनवले
Taxonomy upgrade extras

"लव टू मरेज" प्रवासवर्णन

लेखक सौरव जोशी यांनी गुरुवार, 12/03/2009 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये मागे एक सदर आल होत... विषय होता "लव टू मरेज प्रवासवर्णन" मी थोड वेगळ पण स्वानुभवाने लिहीण्याचा प्रयत्न केला, आज "मिसळ पाव" चा मेम्बर झालोय तर म्हटल सुरुवात त्या लेखानेच करु कारण तो लेख ह्रदयाच्या अगदी जवळ आहे! पहा तुम्हाला आवडतो का... लि़खाण सुधारण्यासाठी आलेल्या सूचना व टिका, दोन्हीचे स्वागत! प्रेम काय असते हे कळायच्या अगोदरच प्रेम करून मोकळा झालेला मी!! (Thanks to Bolywood Movie संस्कार)... जेव्हा विचारांमध्ये प्रगल्भता आली, सारासार विवेक बुद्धी जागृत झाली तेव्हा."मी कोणावर खरच प्रेम करू शकतो का?" हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला.

चालचलाऊ गीता

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 11/03/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
:P आज अचानक श्री. ज. के. उपाध्ये यांची "चालचलाऊ गीता" ही खूप लहानपणी वाचलेली कविता सापडली. मिपाच्या सदस्यांना होळीच्या मेजवानीनिमित्त सादर! होळीच्या रंगीबेरंगी, रंगतदार, रंगीत शुभेच्छा! पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग लेकांनो! होऊनिया रोग | मराना का! लढाई का असते सोपी?
Taxonomy upgrade extras