Skip to main content

विरंगुळा

सुपारी की ब्ल्याकमेल

लेखक स्वामि यांनी रविवार, 26/04/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत कधी ड्रायव्हर सारख्या टुकार माणसाबरोबर डील करण्याचा योग आला नव्हता,ही जात साली परधार्जिणी असते.कधी चुकुनही मालकाच्या गाडीचं कौतुक करणार नाही.झेन चालवत असतील तर स्विफ्टचं कौतुक,स्विफ्ट चालवत असतील तर इनोव्हाचं कौतुक,च्या मायला ह्यांच्या बुडाला गार वाटावं म्हणून घेतली काय गाडी!तर ह्या च्युत्याचं नाव आहे बाबु.असल्या नावांचं एक बरं असतं,म्हटलं तर नाव,नाहीतर टोपण नाव.उद्या गेम झाली की पोलिसांना काय सांगु?माझ्याकडं बाबु नावाचा ड्रायवर होता म्हणुन?कानाखाली आवाज काढतील माझ्या पहील्यांदा.आडनाव काय,राहातो कुठं,त्याचं कुटुंब कुठं असतं,वात पेटवतील शंकांची.आणी 'सुशिक्षित'अशी शिवी पण देतील जाताना.

जे मला दिसले ते

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडा कंपु तिकडी चाल सगळे भरती माल रिते आमची झोळी शब्दांवाचूनी यार प्रतिसादांच्या लढाईमध्ये एकाची वरताण तर दुसरा घासे वहाण ह्या दारातून त्या दारावर प्रतिसाद बद्दल प्रतिसाद शब्दांना विके कोणी शब्दांसाठी लिहतो एकच बाकी +१ सगळे मागोमाग भार लिहतोय कोण भांडतोय कोण शब्दांना वेठिस धरतोय कोण एक खवाट बाकी सुसाट डुप्लिकेट आयडीचा नेहमीच सुळसुळाट एक नारी नाव धरे भारी हवा दिसे तीज विषारी शब्दांत तीच्या जळजळाट फार तळपते सोडून विषय पार !

गौडगावचा जाग्रुत मारुती

लेखक सनविवि यांनी रविवार, 26/04/2009 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल! हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला.

विडंबन पुर्ण करा

लेखक निशिगंध यांनी शनिवार, 25/04/2009 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
गारवा माहीतच असेल ना...... पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. कुणाचे कीती प्रतीसाद काटायचे..

कमिलिऑन

लेखक पॅपिलॉन यांनी शनिवार, 25/04/2009 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा ते मावळतीच्या शेजार्‍याघरीं बालेकिल्ला बांधत होते - तेव्हा ते होते पवित्रभूमिरक्षक! जेव्हा ते उगवतीच्या शेजार्‍याला रक्तबंबाळ करीत होते - तेव्हा ते होते शहीद व्हायला निघालेले स्वातंत्र्यसैनिक! आता त्यांच्या बंदुका रोखल्यात आमच्यावरच - हो, खरे आहे - ते आहेत दहशतवादी!!
Taxonomy upgrade extras

मेहूण म्हणून ऍव्हलेबल! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 24/04/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियाच्या या लेखातील मेहुणाच्या आधुनिक कल्पनेनुसार, मी व माझी एक आवडती स्त्री कुणाकडेही मेहूण म्हणून भोजन झोडायला Available आहोत. कुणाकडे सत्यनारायणाची पूजा वगैरे असल्यास अवश्य कळवण्याचे करावे! :) आपला नम्र, तात्या अभ्यंकर.

डायरी डायरी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 24/04/2009 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्मिळ दुर्मिळ पत्रे जमवण्याचा आमचा छंद आपण जाणताच. अशाच घडामोडीत एक डायरी आमच्या हाताला लागली. काही पाने आहेत काहि नाहीत अशा अवस्थेतली ती डायरी मिपाकराची आहे कळाल्यावर आम्ही अत्यानंदीत झालो. त्या डायरीतील काहि नोंदी आपल्यासाठी. १ जानेवारी :- च्यायला वर्षाच्या सुरुवातीलाच नाट लागला. आमचा नववर्षाच्या शुभेच्छा हा धागा त्या प्रा. डॉ. बिरुटेंनी उडवला. का तर म्हणे एकाच विषयाचे २/३ धागे कशाला ? शुभेच्छा द्याव्या घ्याव्यात तेव्हड्या कमीच हे ह्यांना कधी कळणार ? आणी #$#@$#@$ आम्ही कायम लोकाच्या धाग्यावरच इतरांना शुभेच्छा देत बसायचे होय ? १२ जानेवारी :- गणपतीच्या स्वेटरवरुन रणकंदन माजले.