Skip to main content

विरंगुळा

विरंगुळा — मनोरंजन आणि हलक्याफुलक्या मराठी लेखनाचा विभाग. विनोदी किस्से, गमतीजमती आणि विरंगुळा देणारे मराठी साहित्य येथे वाचा.

कुण्या नावाचं हे पाखरु???

लेखक अथांग सागर यांनी मंगळवार, 14/04/2009 03:55 या दिवशी प्रकाशित केले.

खालील छायाचित्रे कॅनन पॉवरशॉट एस एक्स १० आय एस (Canon Powershot SX10 IS) कॅमेर्‍याने काढली आहेत.

(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा)

(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा)

<तक्रार>

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 13/04/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा

अमावस्येचा बघतो तुझा चंद्र कधीचा
अंधारले नयन दर्शना घाबरले

का डांबर सदा बरसले तुजवरी
बरसताना बरे मला ते विसरले ;)

अगडबंब देह काळवंडलेली काया तुझी
वाटेवरुन तुझ्या रेडेही मागे सरकले

घाबरले तुज पाहता भुत पिशाच्च आणी हडळी
येता तु गल्लीमधले माझ्या श्वानही टरकले

जळफळली कढई, सखे तुज पाहता
गोंजारता गाल तुझे बघ माझे हातही करपले

आपला,
मराठमोळा.

डॅम इट !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 13/04/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.

"डॅम इट !"
"अरे नगमा, दिपीका सारख्यांपासुन तो कोण तो बिहारी नट, त्यांच्या नावाचा तिकिटासाठी विचार होतो आणी मराठीतील एका कलाकरालाच्या नावाची अफवा सुद्धा उठत नाही म्हणजे काय ? महेश कोठारे तावातावाने बोलत होता. काहि वेळाने धाप लागल्यावर परत एकदा 'डॅम इट' म्हणुन तो खाली बसला.

"अरे बाबा त्यांच्या नावाला ग्लॅमर असत रे ! कळतय का तुला ?" स्मिता तळवळकर महेशला समजावत्या झाल्या.

"का ? माझ्या श्वास चित्रपटाला ग्लॅमर न्हवते ? ऑस्कर पर्यंत वारु दौडला की त्याचा !" संदिप सावंतानी हिरिरिने आपला मुद्दा मांडला.

भीमाशंकर : खांडस मार्गे.

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 13/04/2009 05:24 या दिवशी प्रकाशित केले.

साधारण तीन वर्षांपुर्वीची गोष्ट. पुण्यातील स्.प. महाविद्यालयाजवळ मास्टेक कंपनीचा बीपीओ होता, तिथे मी संगणक अभियंता म्हणुन कार्यरत असताना, तेथील काही हौशी तरुणांनी एकत्र येउन गिरीभ्रमण कंपू स्थापन केला. त्यांच्या पहिल्या गिरीभ्रमणाचे यश बघुन, मी सुध्दा त्यांच्या कंपुत सामील झालो. काही नवखे, काही अनुभवी असे आम्ही सह्याद्रीत भटकंती करायला सिध्द झालो. लोहगड, राजमाची असे सोपे किल्ले सुरवातीला केल्यावर जरा अवघड म्हणुन "भीमाशंकर" करायचे ठरले. आमच्या पैकी बरेच जण आधी गाडीनी जाउन आल्यामुळे तसे फार काही अवघड नसल्याच्या भ्रमात होते.

जालिंदर जलालाबादी यांच्या भक्तांसाठी खुश खबर. त्वरा करा.

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 11/04/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.

जालिंदर जलालाबादी यांचे पूजनीय 'साहित्य'

जालिंदर जलालाबादी यांचा काही काळातच लोकांना आलेला अनुभव आणि त्यांची वाढत असलेली भक्तसंख्या आपण सारे जाणताच.
आम्ही आता त्यांचा फोटो असलेत्या व इतर काही वस्तू भक्तगणांना उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे.

खालील प्रमाणे वस्तू उपलब्ध आहेत.
लॉकेट ५००० रु
फोटोफ्रेम १००० रु
पेन २०० रु
टी शर्ट ९०० रु
(जालिंदर यांनी ओढलेल्या चिलिमितील पवित्र) अंगारा २०,००० रु तोळा
जालिंदर बाबांनी मंतरलेले मोक्षाचा दिव्य अनुभव देणारे 'तीर्थ' १०,००० रु लीटर.
जालींदर बयालीसाचे पुस्तक ले. धनंजय (मोठ्या टाइपातील) १०० रु

जालिंदर महिमा

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 10/04/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.

आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी सगळीकडे जालिंदर बाबा चमत्कारी यांची माया (स्त्री नव्हे) नाना रुपात प्रकट होत आहे. त्यांची भक्तगण संख्या सुद्धा वाढत आहे. यापासुन मी तरी किती दिवस वंचित राहणार होतो. मला सुद्धा बाबा जालिंदर यांच्या भक्तीचा कानमंत्र मिळाला आणी हे काव्य स्फुरले.

एक महात्मा जन्मला दुर अफगान देशी!
जालिंदर असे थोर नाव मिळाले त्यासी!!
सोडुन सारा व्यापार अन अफुची शेती!
कर्मभुमी देशोदेशी, शिष्य भारतवासी!!

पाववाल्याचे गाणे

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 10/04/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.

एक खूप गरीब माणूस सायकलवरुन पाव (ब्रेड) विकत असे. टोकाच्या गरीबीमुळे त्याच्याकडील पाव ठेवण्याची पिशवी अगदी फाटलेली असते व त्यातुन पाव जमीनीवर कधी पडून जात हे त्याला बिचाऱ्याला सायकल चालवतांना कळतही नसे.

त्याची दया येऊन एकजण त्याला एक नवी कोरीकरकरीत पिशवी देतो. त्यामुळे त्यापिशवीतुन पाव घेऊन विकतांना साहजिकच त्याचे नुकसान टळते व तो खुशीत येऊन गाणे म्हणू लागतो-
"आज कल पाव जमींपर नही पडते मेरे"..

असे प्रसंग व त्यावरुन आधारलेली गाणी तुम्हाला माहित असतील तर सांगा!

हे राम ! व जालिंदर जलालाबादी

लेखक दशानन यांनी गुरुवार, 09/04/2009 17:14 या दिवशी प्रकाशित केले.

मास्तरांचा जालिंदर जलालाबादी ह्याच्या वरील माहीती पर लेख काय आला मिपा जगतात खळबळ उडाली, एका सामान्य प्रतीच्या लेखकाला मिपावर येवढी प्रसिध्दी मिळाली की दगडफोड्या, कावलिया व रेवा ह्यांना जालिंदर जलालाबादीच्या माहीतीपुर्ण लेखामुळे त्याच्यावर लेखन करावेसे वाटले व कावलिया तर सरळ त्यांना भेटायला गेला हे पाहून मनात आग धुसमसत होती, काय ती पुस्तके काय ती त्यांची नावे कधीच वाचायचे नाही असे ठरवले होते पण "चालते व्हा" चा उल्लेख झाला व जराशी खटपट करताच आमच्या गुप्त सुत्राद्वारे ते पुस्तक भगव्या रंगाच्या कपड्यामध्ये मला उपलब्ध झाले, व प्रस्थापित लेखकांच्या वर खास करु महाजालावरील काही महा

चित्र-काव्य स्पर्धा

लेखक सुनील यांनी गुरुवार, 09/04/2009 10:35 या दिवशी प्रकाशित केले.

चित्र-काव्य स्पर्धा

खालील चित्र पाहून तुम्हाला स्फुरलेली कविता येथे टंका.

मोगरा फुलला...

लेखक सुनील यांनी गुरुवार, 09/04/2009 07:16 या दिवशी प्रकाशित केले.

पहिला दिवस...

दुसरा दिवस...

तिसरा दिवस...

स्थळ - घरचा बगिचा
दिनांक - ७. ८ आणि ९ एप्रिल, २००९
कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!