Skip to main content

विरंगुळा

आपण सारे कोट्याधीश!..... नाही होणार!

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 21/05/2009 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
१५०० अब्ज डॉलर!' या विषयावर कांही दिवसांपूर्वी मिपावर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक सदस्यांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते. "१. स्वीस बॆंकेतले पैसे काढून सर्व उधार्‍या (जागतिक बॆंकेच्या कर्जासहीत ) देऊन टाकू आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर प्रश्नांची सोडवणूक करायची." "२.

कैफियत ....

लेखक बट्ट्याबोळ यांनी बुधवार, 20/05/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली. एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली.

ऒळखीचे भेळवाले

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 20/05/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या कुठल्याही नाक्यावर असतो तसाच आमच्याही नाक्यावर एक भेळवाला होता. ब-याच लहानपणीपासून माझा त्याच्यावर (म्हणजे त्याच्या भेळेवर) डोळा होता. आपण चांगले मार्क मिळवावेत आणि मग आईने “जा, नाक्यावरच्या भेळवाल्याकडून भेळ घेऊन ये” असं म्हणावं असं माझं एक माफक स्वप्न होतं. पण आईपुढे आमची डाळ शिजत नसे. त्यामुळे इव्हसारखंच मलाही त्या भेळेच्या “forbidden fruit” चं कायम आकर्षण वाटत राहिलं. आणि मग एका कोजागिरीला भय्याची भेळ खायचा “दुग्धशर्करा” योग आला आणि मग पुन्हा पुन्हा आला, येतच राहिला. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी “को जागर्ती” असं म्हणत जागत्या घरी जाते असं म्हणतात.

दोन दिग्गज

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 20/05/2009 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
चेहेर्‍यांत साम्य आहे, की कल्पनाविलास?

अंत

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 19/05/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
फुलत्या क्षणी फुलणे ना जमले सुकताना ही खंत नको गंधित होउन बहरुन जावे, पाचोळ्यापरी अंत नको जगणे अवघड झाले तेव्हा दिला सुरांनी जन्म नवा जन्मांतरी हे सूर भिनावे, नुसता कोकिळकंठ नको रंग-रूप, रस-गंध साठवित फुलाफुलावर लहरत जावे फूलपाखरू जीवन व्हावे, कोशातिल सुरवंट नको क्षणाक्षणाला कणाकणातुन उसळावे चैतन्य अनोखे खळाळते आयुष्य असावे, गती कधीही संथ नको अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको
Taxonomy upgrade extras

फडफड फडफड फडकतो.....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 19/05/2009 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते. थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा.

`उत्तर'क्रिया!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते.

निरिक्षणाशा ...

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी रविवार, 17/05/2009 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा शरदिनीताईंची माफी मागून, माझी निरीक्षणाशा... एका निरीक्षणाचा कचराग्रस्त डेटासेट अभ्यासकाच्या पारख्या नजरेची कात्री कर्र कर्र कर्र उरलेल्या डेटाचे गायलेले भारूड अन डेटाचा म्यापकडे चुकतमाकत होणारा प्रवास लब डब लब डब नयनांच्या भोकांसमोर दिसणारे हिरवे बिंदू रक्तवारूणीच्या अंमलाखालचे विसंवादी बोल खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका ऑब्झर्व्हेशनमधून निघणारा पेपर त्यावर होणारा अभिनंदनाच्या इमेल्सचा वर्षाव धो धो धो... अन मग सगळंच तुलनेने शांत ... पुढच्या जी.एम.आर.टी.