मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कसं सांगू ....?

अरुण वडुलेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कसं सांगू .....! तुला पटणारही नाही. साक्ष तुझ्या-माझ्या गुपिताची, तो निशिगंध.... अबोल झालाय ! तुला आठवतं.........? त्या अनुरागी क्षणांवरती त्याच्याही गंधाची पखरण होतीच. त्या कैफाचा स्पर्षवारा, त्यालाही हवासा वाटला. ताटातुटीच्या क्षणी........! 'पुन्हा येते' म्हणालीस, आली नाहीस. तुझ्या प्रतीक्षेत तो मात्र, कोमेजून गेलाय......! माझं कांही नाही.....! पण निदान त्याच्यासाठीं तरी, तुला पुन्हा यायलाच हवं......!!

वाचने 1485 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रमोद देव 31/05/2009 - 17:16
नानाशास्त्री, कविता अतिशय हृद्य आहे. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

क्रान्ति 31/05/2009 - 23:22
आवडली. क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा