***
स्थळ - नेहमीचेच रात्रीचे ठिकाण.
वेळ - नेहमीची 'बसायची' वेळ.
पात्र - मी आणि नेहमीचा मित्र.
(सुरवात नुकतीच होत असल्याने कोण काय बोलत आहे हे नीट कळत नाही, जसजसा वेळ जातो तसं नीट कळायला लागतं, अशी सुरवातीची उन्मनी अवस्था)
मी - हाटेल चांगल चालायला लागलं रे... सुरवातीला आपण यायचो तर अगदी फुटकळ लोक यायचे
तो- तर आता चांगले चालु आहे. फॅमिली रुम, बार, गार्डन, टेरेस वेगवेगळे भाग आहेत. जो तो आपापल्या चॉईसने जातो
मी - ते बरे आहे नाही तर तुला मला पाहुन सगळे फॅमिलीवाले पळुन गेले असते
तो - तर काय .. एक तर माकडाचे चेहरे आपले.. भाषा खराब
मी - पण आपल्याला तोंडावर बोलतं का कुणी?