Skip to main content

विरंगुळा

तंदुरुस्ती की रक्षा करता है नॅशनल पार्क...

लेखक अभिजा यांनी शनिवार, 12/09/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील बोरीवलीच्या नॅशनल पार्कात मॉर्निंग वॉकचा आस्वाद घेणारे काही तरूण... :-) अधिक प्रकाशचित्र माझ्या प्रतिबिंब अनुदिनीवर! धन्यवाद!

मात्र रात्रीची गोष्ट भाग ३

लेखक दशानन यांनी शनिवार, 12/09/2009 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - २ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (पॅग मोजायचे सोडून दिले आहे... आता कितवा पॅग आहे ते वेटरालाच माहीत) मी - अरे तुला चढली आहे काय ? तो - नाही रे, अजून दोन चार चा कोटा आहे बाकी. मी - ठिक आहे.. बाकी ते कुंपण शेत रखवालदार . तो - अरे काय कुंपण शेत रखवालदार बडबडत आहेस. मी - काहि नाही रे जरा वैचारीक लेखन करावे म्हणत आहे नाही तर गेला बाझार प्रेम कथाच लिहू म्हणत आहे.. तो - अरे वेडा आहेस, जमाना बदल गया. आता लेका तु लेखाचं विडंबन पाडायला बघ. पक्का ५० + - ७०+ प्रतिसाद. मी - काय सांगतोस बे ?

काही रेखाटने

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 10/09/2009 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
काही नवीन रेखाटने... मोजूनमापून पोर्ट्रेट काढायचा कंटाळा आला की फक्त एक पेन्सिल घेऊन पांढर्‍यावर काळे करत बसायला मजा येते. छान टाईमपास होतो. टीप : चित्रांना हसले आणि मजेदार कॉमेंट करून लोकांना हसवले तरी चालेल.. फारच मज्जा येइल...

मात्र रात्रीची गोष्ट भाग २

लेखक दशानन यांनी गुरुवार, 10/09/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - १ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (पहिला पेग होवुन गेला आहे, वैचारीक चर्चा सुरू आहे अशी जागृत अवस्था अशातच पेग २ आगमन) मी - घे ! फिश फ्राय चांगलं आहे... सध्या पिंडाचं गोळं खावुन खावुन वैतागला असशील.. तो- हं... काय करणार परंपरा असतात, त्या पाळाव्या लागतात... नाही पाळल्या तर बाप्पा ढुंगणावर टिमकी वाजवेल ना! बर ते जावु दे, ती हल्ली लिहित नाही... मी - नाही लिहित... टिंगल होते म्हणे तो - हं.. पुरषोत्तममधे गाजणारे नंतर समाजापुढे यायला घाबरतात हेच खरे मी - जावु दे ना आपल्याला काय करायचे? तो बघ कसे वैचारीक लिहतो हल्ली..

चड्डीवाला आणि माकडे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 09/09/2009 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डीवाला आणि माकडे एक नाना नावाचा टोपी विक्रेता होता. गावातले सगळे लोक नाना टोपीवाला असे म्हणत असत. त्याच्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर त्याच्या देशात डोक्यात टोप्या घालण्याची फॅशन जरा कमी झालेली होती व लोकं एकमेकांनाच 'टोप्या घालू' लागली होती. आधीच टोप्यांची विक्री कमी व त्यातच आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन वेगळा धंदा काहीतरी सुरु करायचे नानाच्या मनात होते. म्हणून आपल्या नानाने विजारीच्या आतुन घालतात तसल्या वेगवेगळ्या चड्डया आणि नाड्या विकण्याचा धंदा चालु केला. आताशा सगळे लोकं त्याला "नाना चड्डा" असे म्हणत असत.

"दूरून साजरे" असे पोलाद कारखाने

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 08/09/2009 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
भंगारातून चांगल्या प्रतीचे पोलाद बनविण्याची सर्वसाधारण पद्धत या पद्धतीत खालील टप्पे येतात: भंगार भरणे, भंगार वितळवणे, पोलादाचे शुद्धीकरण व ओतकाम. त्यानंतर रोलिंग. भंगार भरणे: पहा आकृती १ व २Fig 1: Filling the charging bubkets आकृती १: भंगार एक तर "ग्रॅब बकेट"च्या सहाय्याने भरले जाते किंवा दीड ते दोन मीटर व्यासाच्या मोठ्या लोहचुंबकाद्वारे भरले जाते.

पावलांचे सांगाती

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 08/09/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
नाडीवरील धाग्यांनी अजीर्ण झालेल्यांना हलकासा सुंठवडा पावलांचे सांगाती देह देवाचे मंदीर म्हणायची पद्धत आहे. त्या मंदिराचा भार पावलावर असतो. बालपणात मऊमऊ तळव्यांच्या अनवाणी पावलांनी बागडणारे वाय जरा मोठे झाले की आपले सांगाती शोधायला लागतात. काहींना काटे-सराटे बोचल्याने् तर काहींना चिखल राड्यातून वाट काढायला लागल्याने बोटांच्या बेचक्यात काहीतरी सरकवून द्यावे लागते. आधी गरज नंतर शोभा म्हणून पावलांचे सांगाती जन्मभर जोडीने प्रवासाला बरोबर येतात.

कोलाज

लेखक जयवी यांनी मंगळवार, 08/09/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
हे मी केलेलं गणपतीचं कोलाज :)

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 08/09/2009 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९ * हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ ! * ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे. * हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत. आधार : अर्थातच, आंतरजाळ