विरंगुळा
लहानपणच्या आठवणी
"बेट्या, आता तू मोठा झालास. आता वेगळ्या ताटात जेवत जा." मी लहानपणी तिसरीत जाईतो बाबांच्या ताटात जेवायचे. यामुळे त्यांच्या तिखट खाण्याच्या प्रमाणाला आळा बसायचा त्यामुळे ते करवादायचे पण लहान लेकराला काय म्हणा म्हणून असा क्षीण प्रयत्न करायचे.
"पुढच्या वर्षीपासून जेवत जाईन वेगळ्या ताटात. अजून मी छोटीच आहे." बागेत जाऊया, सर्कस बघायचीये, नवे बूट घ्यायचे वगैरे म्हटले की बाबांचे "पुढच्या वर्षी" हे उत्तर इतके ठरलेले असायचे की तेच उत्तर माझ्या तोंडून बाहेर पडल्यास नवल ते कसले?
~~~
बाबांच्या हापिसात बसून त्यांच्या कामात त्यांना मदत करण्याची मला कायम हौस.
माझी पण कोकण भ्रंमंती... थोड्या अपरिचित कोकणात...
सध्या सतत कोकणात भटकतेय. गठ्ठ्याने फोटु मारतेय.
अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!
अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!
मी २३ जून २००९ साली लिहिलेला अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांची माहिती देणारा लेख लिहिला होता.
http://www.misalpav.com/node/8315
गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी आलेल्या वृत्ताप्रमाणे द्रोणाचार्यांच्या हातून त्यांची अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात हत्या करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही मारले गेल्याचे वृत्त आहे.
पाद्रीबुवांची मराठी शिकवणी
तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं.
कॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच घरून हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, "आपापले पैसे कमावा आणि खर्च करा"!
नाष्टा-ए-पाणीपुरी
पुऱ्यांतून पाणी पिणं काय किंवा पाण्याच्या पुऱ्या खाणं काय, दोन्ही एकाच आंबट पाण्याच्या दोन बाजू. तिसऱ्या बाजूकडून म्हणजे रस्त्यावरून माझ्या नजरेत तो पाणीपुरीचा ठेला भरला. तिथे उपस्थित जनसमुदायाला पाणीपुरी गिळतांना पाहून माझ्याही पोटात कोरड पडली. वळवळणाऱ्या जिभेभोवती चळाचळा पाणी सुटले. तरीही त्या पुऱ्यांमधल्या आंबट गोड पाण्याची पंचस्वादीय चव जिभेला खूपच हवीहवीशी वाटली अन् त्यामुळेच की काय पाच गिर्रेबाज गोल पुऱ्यांची डोकी टचाटचा फुटली! अन् फुटक्या डोक्यानिशी बशीत दाटीवाटीनं आसनस्थ होण्याची शिक्षा त्यांना मिळाली. आणखी काय काय पहावं लागणार गं बाई..
मिसळपाव