Skip to main content

विरंगुळा

महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान्........रायरेश्वर!!!!!!!!

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 03/07/2010 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या महाराष्ट्रात ज्याला रायरेश्वर माहिती नाही असा माणूस विरळा. जर कोणी असेल तर तो कमनशिबिच.... मी रायरेश्वरला आजवर दोनदा गेलो. माझ्या सुदैवाने म्हणा किंवा मित्रांच्या दुर्दैवाने, दोन्ही वेळेस एकटाच होतो. या वेळेस मुक्काम करायचा ठरवला. थोडे तहान्-भूक लाडू घेउन आणि नेहमीच सोबत करणारा दोस्त्....माझा Camera. सन्ध्याकाळी ४.३० ला बाईक ने पायथा गाठला आणि माझा फोटोग्राफीक प्रवास सुरू झाला. माझा मीच असल्यामुळे कोणी टोकणारे नव्हते. रमतगमत, नीरव शांतता पीत (क्लिक हा आवाज सोडल्यास) मी निघालो. (शिवाय गडावर महाराज आणि मावळे होतेच :)). रात्री पुजार्‍याकडेच मुक्काम केला.

ती

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 01/07/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो.

मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 01/07/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्केमर : १. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा. २. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत. वि. सु.

रिक्षावाले काका

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/06/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद. दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! '' दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! '' पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात. ''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! '' रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते.

हॉट एअर बलून फेस्टीवल

लेखक मराठे यांनी सोमवार, 28/06/2010 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
पोरांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की इथे सर्वाना भटकायचे वेध लागतात. अर्थात तेही ठीकच आहे म्हणा कारण उन्हाळ्याच्या ह्याच तीन चार महिन्यात मनसोक्त भटकायला मिळतं. मग आहेच थंडीत बाहेर पांढरा एकसुरी रंग बघत दिवस रात्र घालवणं. इथे एप्रिल महिन्यांपासूनच छोट्या छोट्या गावांच्या जत्रा सुरु होतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. त्यापैकीच 'हॉवेल' हे एक छोटंसं गाव. त्यांच्या 'हॉट एअर बलून फेस्टीवल' बद्धल बरंच ऐकलं होतं पण घराच्या अवघ्या तासा-दोन तासांच्या अंतरावर असूनही जाणं मात्र झालं नव्हतं.

एका कोळीयाने....

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 27/06/2010 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
काशीद समुद्रकिनार्‍यावर झाडाखाली बसलो असताना हा सापडला.... Canon 450D, 18-55mm lens

ट्वायलाईट २ - 'न्यू मून'

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 25/06/2010 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्टेफनी मेयर ह्या लेखीकेच्या ट्वायलाईट सागा वर आधारीत पहिल्या चित्रपटाची ट्वायलाईटची ओळख आपण मागच्या भागात करुन घेतली. आज आपण ओळख करुन घेणार आहोत ह्याच्या पुढच्या भागाची 'न्यू मून'ची. खरेतर पहिल्या भागात चित्रपटातील सर्व पात्रांची ओळख झाली असल्यास बर्‍याचदा दुसरा भाग थोडा संथ अथवा कंटाळवाणा वाटतो, पण 'न्यू मून' ह्याला निश्चीतच अपवाद ठरतो.

वाकुल्या दाखवणारा अदृश्य मुद्राराक्षस

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 22/06/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली.