Skip to main content

विरंगुळा

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 30/05/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-) ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.

(तीळ आणि त्याचा अर्थ)

लेखक सुनील यांनी रविवार, 30/05/2010 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
आता ह्या तीळाचा अर्थ काय तो आम्हास ठाऊक नाही. परंतु, जे काही आहे ते ह्या तीळामुळेच, अशी आमची खात्री आहे! ;)

गड्याऐवजी माझ्या श्रीमुखात!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 30/05/2010 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख माझ्या मातोश्रींनी लिहिला असून २४ मे २०१०च्या सकाळ मुक्तपीठात प्रकाशित झाला आहे. मिपाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकायला हरकत नाही.) सुमारे पन्नास वर्षांपूर्वी घडलेली हकिगत मी सांगत आहे. त्यावेळी मी दहा वर्षांची असेन. अगदी बारीकशी, कुणाच्या अध्यात ना मध्यात. आई- वडील, आजोबा, दोन काका-काकू, चुलत भावंडे असे भरलेले घर. मोठ्या भावडांमध्ये खूप दंगामस्ती, भांडणे चालयची. कधी कधी त्यांना आजोबांच्या छड्या खाव्या लागत. माझ्या जन्मानंतर वडिलांचा व्यवसाय अधिक भरभराटीला लागला त्यामुळे मी त्यांची फार लाडकी मुलगी होते आणि असे सर्व असताना मला माझ्या वडिलांनी अगदी अचानक एक सणसणीत थोबाडीत दिली.

चित्रमानपत्र (भाग १)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 24/05/2010 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
जसे आपले वर्तमानपत्र रोजच्या "खर्‍या" घडलेल्या घटना आपल्यापर्यंत पोचवते, तसेच .... प्रस्तुत आहे- चित्रपानपत्र.. म्हणजे काय? असे विचारता? सांगतो.

ताम्रोत्सव...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 22/05/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
वैशाख वणवा पेटला की गुलमोहर देखील पेटतोच. तो असा तसा पेटत नाही, दुरून नखशिखांत अग्निज्वालांनी वेढलेला भासतो. मृगजळामागगील गुलमोहराची फुले म्हणजे सक्षात ज्वालांचे ज्वलंत उदाहरणच! उन्हाळ्यामुळे त्याची हिरवी पाने झडली तरी लाल कळ्या उमलून येतात, त्यातून फुले फुलतात. अन् आख्खं झाड ताम्रोत्सव साजरा करतांना दिसतं. इतरांची पानझड झालेली असतांना हे झाड मात्र ओकंबोकं न वाटता काहीतरी भरगच्च वाटू लागतं आणि ऐन उन्हाळ्यात शीतलता, शांतता शोधणारी आपली नजर त्या भगभगीत फुलांमुळे आणखीनच गरम होण्याची शक्यता असते गुलमोहराच्या फुलांचा एक वेगळाच साचा असतो. एकूण पाकळ्या पाच.

काही छंद

लेखक सुचेल तसं यांनी शुक्रवार, 21/05/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील. मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार.