लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी बुधवार, 16/06/2010 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या गोष्टीचं अतिरेकी वेड किंवा छंद उफाळला की 'आलं का फेफरं?' असा प्रश्न ग्रामीण भागात विचारला जातो. आमच्या पेपराचं फेफरं असंच नाक मुरडण्यासारखं. पेपर म्हणजे परिक्षेच्या उत्तरांचा अथवा प्रबंधाचा नसून आमच्यालेखी 'समाजमान' आणि 'भान' या संबंधाचाच आहे.
कालच्या वर्तमानाचा भूतकाळ आज वर्णन करणारे ते एक 'पत्र' जरी असले तरी त्याला पाने मात्र अधिकच असतात. तसं पाहिलं तर पोस्टाचे पत्र आता कालबाह्य झाल्यातच जमा आहे. 'आपली चालू वर्षाची सदस्य वर्गणी त्वरित जमा करा अन्यथा पुढील अंक पाठविला जाणार नाही' अशा आशयाची 'पत्रे' फलाण्या बिस्ताण्या अंकाच्या संपादकाकडून वर्षभर येत राहतात.
लेखकछोटा डॉनयांनी बुधवार, 16/06/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी उठलो आणि पहिल्याछुट आपण "पुण्यात" नसल्याचे लै दु:ख झाले.
मायला पुण्यात असतो तर काय दणका झाला असता की बोलायचे काम नाही.
काय ते भल्लेभल्ले होर्डिंग्स, पोश्टर्स, पेप्रात जैराती, केबल टीव्हीवर शुभेच्छांच्या क्लिपिंग्स वगैरे वगैरेचा दणका उडवला असता.
आज आमच्या मित्राचा वाढदिवस.
नव्हे नव्हे, आमच्या परममित्राचा आणि आंतरजालावरचे एक लोकप्रिय व्यक्तीमत्व व 'कट्टा स्पेशालिस्ट' श्री. श्री. श्री.
लेखकअरुंधतीयांनी सोमवार, 14/06/2010 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक वळणांवर काही मजेशीर लोक भेटतात. कित्येकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गमतीशीर गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात, तर काही वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपली निखालस करमणूक होत राहते. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे अश्या व्यक्तींच्या गावीही नसते की त्यांच्या वागण्यातून उत्तम विनोदनिर्मिती होत आहे!
असाच एका कुटुंबातील हा खराखुरा किस्सा. थोडा आंबटगोड आहे आणि थोडा कडूपण!
तर हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहाणारे कुटुंब म्हणायला पाचजणांचे.... पण त्यांच्या घरात, दहा बाय बाराच्या दोन खोल्यांमध्ये साधारण आठ ते दहा माणसे नांदत. शिवाय गावाकडून येणारा पै पाहुणाही असायचा सोबत.
लेखकशशिकांत ओकयांनी सोमवार, 14/06/2010 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
बरसात की रात!!जिंदगीभर नही भूलेगी वो ....आम्ही दोघेच...अंधाराच्या गाभाऱ्यात...
भुरुभुरु पावसाची हलकीशी सर... ओलावलेल्या पानांची मंद सळसळ....गारव्याची झोंबाझोंबी...
आनंदाची शिरशिरी...
कोण बोलले... काय बोलले... याची तमा कोणाला... हळुवार आठवणींचे मोरपिस मनाला गोंजारून गेले...
ती रात्र... ती जागा... ती ती... मनात कायमची घर करून गेली...
आठवणीचे मनोरे चढत गेले...
लेखकअरुंधतीयांनी रविवार, 13/06/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
ती येईल का नक्की सांगितल्याप्रमाणे? की आयत्या वेळेस नवेच खेंगट काढेल? तिचा नवरा वैतागणार तर नाही ना, बायको सकाळी सकाळी तयार होऊन एवढी कोणाला भेटायला चालली आहे म्हणून?
मी असेच काहीसे विचार करत घरातून निघाले तेव्हा सकाळचे सव्वा आठ झाले होते. कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. रिक्षावाल्याला ''रुपाली हॉटेल, एफ्. सी. रोड'' सांगितले आणि मी निवांत झाले.
आज बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधील दूर परराज्यात राहायला गेलेल्या एका मैत्रिणीला भेटायचा योग जुळून आला होता. गेला आठवडाभर आमचे वेळापत्रक एकमेकींशी लपंडाव खेळत होते. ज्या दिवशी तिला वेळ असे त्या दिवशी नेमके मला काम असे.
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी रविवार, 13/06/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
डाळिंब व्यवस्थित सोलणे हे मनीचं गूज खोलण्याइतकंच कठीण काम असतं. मधुमिठास बोलणे काय किंवा इच्छित निसरगाठी खोलणे काय दोन्ही गोष्टी एकाच पाटातून वाहणाऱ्या! त्या वाहत्या, खळाळत्या प्रेमजलात (किंवा जालात म्हणा हवं तर) संबंधित प्रेमीजन कसे-किती-कोठवर वहावत जातील याचा अंदाज भल्याभल्यांनाही येत नसतो. पाटाने वहिवाट मोडल्यावरच भानावर येणं होतं!
तद्वत डाळिंब सोलण्याअगोदर आत काय दडलंय? टिप्पूर दाणे आहेत की नुसताच भुललासी वरलिया रंगा असा प्रकार आहे, याचा अदमास ना चाकूला असतो ना काकूला. डाळिंब विक्रेती काकू कितीही म्हटली की ते झाडावरच टचकन् फुटलंय, यावर पटकन विश्वास ठेऊ नये बंधूंनो.
लेखकअभिषेक९यांनी शुक्रवार, 11/06/2010 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
परवा औंध कडून डांगे चौकाकडे unicorn गाडीवर येत होतो. रस्ता पण साफ होता, नवीन गाडी, त्यामुळे ६०-७० च्या वेगाने मस्त गाडी चालवत होतो. पण रक्षक चौकात लाल सिग्नल आडवा आला आणि जरा हिरमोडच झाला. गाडीचे break दाबून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. फारसी वर्दळ नव्हती त्यामुळे मोजून ५-१० गाड्या सिग्नलवर थांबल्या होत्या. सिग्नल मोठा असल्यामुळे मी गाडी बंद करून इकडे तिकडे बघत होतो. अचानक मागून टप टप असा आवाज आला. घोड्याच्या टापांचा आवाज असल्यासारखा वाटत होता. आणि खरच तो तोच आवाज होता. मी मागे वळून बघितले. एक पंधरा शुभ्र घोडा अगदी रुबाबदारपणे एकेक टाप टाकत येत होता.