मिस्टर विनोद विरंगुळे,
मिस्टर गंभीर विचारे,
मिस चर्चा गुऱ्हाळे
--ही तीन मजेदार व्यक्तीमत्वे.
या तीघांचे जे प्रताप किंवा संवाद (की वाद) असतील त्याला आपण म्हणूया "गंभीर विनोदी चर्चा"
तर आपला 'विनोद विरंगुळे' एकदा सहज रस्त्याने जात होता.
एका एस. टी. डी. बुथवर तो अचानक थबकला. खिशात हात घालून पैसे आहेत का ते तपासले. अचानक आनंदला. बुथवर 'आनंद अवकाळे' बसला होता.
आनंदः काय रे विनोद! कसे काय? आज एकदम आनंदात? नाव विनोद असून तू नेहेमी गंभीर असतोस. आज आनंदी आहेस. ते कसे काय?
विनोदः तू जरा थांब. मला फोन करायचे आहेत.
असे म्हणून विनोद फोन करू लागला. आधी त्याने केरळ मध्ये फोन केला.