विरंगुळा
चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी
“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.
“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - १
“कुठून सुरवात करावी? कुठून ही सुरवात केली तरी तुम्हाला काय फरक पडणार म्हणा. येथे फक्त फरक पडणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मी. कारण ते सगळे आठवून आठवून मला सांगावे लागणार प्रत्येक क्षण, मिनिट, तास, दिवस, महिने आणि वर्षे पुन्हा एकदा जगावे लागणार... तो आनंद, तो त्रास, ती यातना आणि ते अतीव सुख! आपल्या आपल्याच बद्दल खूप विचित्र अश्या कल्पना असतात आणि त्या विचित्र आहेत याची आपल्याला जाणीव देखील नसते. प्रत्येकाला एक आरंभबिंदू असतो आणि एक त्याची ओळख असते. आणि ती ओळख आयुष्यभर त्याला सावली सारखी साथ देत असते.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
---------------------------
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons)
स्पर्धेचे नियम दुसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" : निकाल
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"
नमस्कार मंडळी. पहिल्या छायाचित्रण स्पर्धेप्रमाणेच दुसर्या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३१ प्रवेशिकांना ४० जणांनी मते दिली. त्यातून सर्वात जास्त मते मिळणारी छायाचित्रे पुढीलप्रमाणे:
विशेष म्हणजे यावेळी बहुतेक छायाचित्रांना कोणी ना कोणी तरी पसंती दिली आहे. सर्वच छायाचित्रे विषयानुरूप आनंद देणारी होती. यातील पहिल्या आलेल्या ३ छायचित्रांचा समावेश मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये करत आहोत. तसेच विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत.
एक रात्र फुटपाथवरील
एक रात्र फुटपाथवरील
पन्नास वर्षांपुर्वीची गोष्ट. पावसाची रिप रिप. वीज गेलेली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. कुठलेच हॉटेल खायला व राहायला उघडे नाही. अशा अवस्थेत मी आणि माझा मित्र व त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या एसटीसाठी वणवण भटकत फिरून शेवटी हाताची उशी करून फुटपाथवर उताणे पडलो होतो. “...हापिस-हापिस
शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून)
‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’
‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’
‘ते का ?’
‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात...
...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात.
....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’
‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’
‘हम्म..
न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डी सी मधे कट्टा करूया का?
नमस्कार.
पुढील एका महिन्याच्या कालावधीत (२० आक्टोबर पर्यंत) न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डीसी मधे कट्टा करूया का?
कोण कोण मिपाकर या दोन्ही शहरात आहेत? मी सध्या आल्बनीमधे आहे, आणि खास म्युझियम्स बघण्यासाठी या दोन्ही शहरांचा आठवडाभराचा प्रवास करण्याचा बेत करत आहे.
कट्ट्याचे वेळी एकाद्या म्यूझियमची सफर करू शकतो, किंवा अन्य कुठेतरी मोकळ्या जागी जमू शकतो, आणि पुरेसा वेळ असल्यास मी तैलरंगात निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक करू शकतो.
माझा इथला फोनः ५१८ ८३१ १७९१.


< थेट्रातली मज्जा >
आमचे प्रेर्नास्तान
------------------
बारका हुतो तवा आज्जाबरबर चंद्रमा थेट्रात जायला मला कद्दीच आवडलं न्हाई, पण त्यो वडत मला घेऊन जायचा. दर शुक्करवारी बच्च्चनचा पिच्चर हमखास लागायचा. दोन-तीन तास तर बसायचं हाय तिथं, पर आज्जाला आधी एवढा वेळ का लागायचा मला त्या टायमाला कद्दीच समजलं न्हाई. त्यो आधी आसपासची जागा बघायचा, कुठं थुकलंय का? *गून्, *तून ठेवलंय का बघायचा. मग रुप्पयाचा एक बंदा घेऊन लाकडी शीटच्या पट्ट्यामधनं फिरवायचा. भौतेक ढेकनं मारत हुता. मग तरुनभारत पेपर शीटवर हातरायचा तवा कुठं तेच्याच शीटवर मला जर्रा जागा मिळायची टेकवायला.
निर्णय आणि नकारात्मकता....
दैनंदीन जिवनात आपण छोटेमोठे अनेक निर्णय घेत असतो. जसे टुथपेस्ट पासुन ड्रेस वापरण्या पर्यंत. ऑफीसला निघायच्या वेळे पासुन परत घरी परत येई पर्यंत. रोजच्या गोष्टींसाठी सहसा निर्णय घ्यावे पण लागत नाहीत , ते सगळ आपसुखच होत. पण असा कधी विचार केलाय का की नेमकी तिच गोष्ट का केली जाते? अस काय कारण असत की आपण एक ठरावीकच टूथपेस्ट का वापरतो, दुसरी का नाही? किंवा आपण एक ठरावीकच रस्ता का वापरतो? दुसरा का वापरत नाही? किंवा एक ठरावीक टाईपचे ड्रेसिंग का वापरतो?
हाच क्रायटेरीया मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा लागु होतो का? उदाहरणार्थ , आपण एका ठरावीक कंपनीत काम का करतो? किंवा एका ठरावीक शहरात का राहतो?
मिसळपाव