मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हापिस-हापिस

सस्नेह · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून) ‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’ ‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’ ‘ते का ?’ ‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात... ...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात. ....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’ ‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’ ‘हम्म.. आता मी बॉस झालो आहे ना !’

वाचने 6069 वाचनखूण प्रतिक्रिया 32

ज्ञानोबाचे पैजार 20/09/2014 - 12:41
एका उमेदवाराची नोकरी साठी मुलाखत सुरु असते. मुलाखत घेणारा त्याला विचारतो "या आधिची नोकरी का बरं सोडलीत?" उमेदवार सांगतो "मी नाही सोडली. आमच्या कंपनीने त्यांच कार्यालय दुसरी कडे हालवले पण जाताना त्यांनी मला नव्या कार्यालयाचा पत्ताच सांगितला नाही." पैजारबुवा,

विलासराव 20/09/2014 - 12:52
ही तर माझीच गोष्ट लिहीलीत तुम्ही. फक्त ते सिगारेट प्रकरण सोडुन . आता यावर उपायही सांगा ना प्लीज?????? आत्मनीरीक्षण करा हा फाउल समजला जाईल हा!!!!!!

In reply to by विलासराव

होकाका 22/09/2014 - 22:57
हे व्यावसायिकांना लागू होत नाही, पण मॅनेजर्सना जरूर होतं: दुसरी कंपनी join करा आणि मग जुन्या कंपनीतल्या ज्युनिअर्सशी तुमची मैत्री कशी वाढत जाते ते अनुभवा.

प्यारे१ 20/09/2014 - 12:54
खिक्क. असाच एक जोक. आई: चल रे उठ. शाळेत जायचंय ना? मुलगा: मी नाही जाणार. आई: काय झालं? मुलगा: कुणीकुणी नीट बोलत नाही. सगळे कामापुरतं बोलतात, डबा शेअर करत नाहीत, गप्पा मारत नाहीत, चेष्टामस्करी करत नाहीत, सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटली तरी उशीरपर्यंत थांबायला लागतं, सगळं नीट पूर्ण करायला लागतं. आई: अरे पण जायला पाहिजे की तुला..... मुख्याध्यापक आहेस ना तू?

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर 20/09/2014 - 18:33
अगदी...अगदी.... त्यावरूनच ही शतशब्द कथा बेतलेली आहे. त्यांमुळे तेव्हढी भावली नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 20/09/2014 - 18:42
असं काही नसतंय हो. रामलक्ष्मण, अन्नू मलिक, राजेश रोशन ह्यांचं संगीत आवडतं का? गेला बाजार प्रीतमचं? 'कधीकधी' ते संगीत सुद्धा इन्स्पायर्ड असतं. चालतं थोडंफार.

In reply to by प्रभाकर पेठकर

यसवायजी 20/09/2014 - 18:43
+१ असेच म्हणतो. -- मी ऐकलेले व्हर्जन- आई- शाळेला का जाणार नाहीस याची २ कारणे सांग मुलगा - शाळेत माझ्याशी कोणी जास्त बोलत नाही, आणी सगळे चेष्टा करतात. तूच सांग दोन कारणं की मी का जायचं शाळेला? आई- अरे आता तुझे वय ५५ आहे, आणी तू मुख्याद्यापक आहेस शाळेचा.

मुक्त विहारि 20/09/2014 - 14:55
लेख आणि प्रतिसाद जबरदस्त...

In reply to by यसवायजी

आदूबाळ 20/09/2014 - 18:02
फक्त कुठे "कट्टा", "डंबोली", "मध्यवर्ती", "बियर" असे शब्द दिसले तरच ते फिल्टर आऊट होऊन खरे (म्हणजे असली. सुबोध नव्हे) मूवि प्रतिसाद देतात.

In reply to by आदूबाळ

यसवायजी 20/09/2014 - 18:50
"कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट क्याट्यागरीत येतो. मुविंना तात्काळ एसेमेस आणी मेल जातो. मुवी लगेच (आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात. :D

In reply to by यसवायजी

विश्वनाथ मेहेंदळे 20/09/2014 - 20:00
शोधायला कशाला पाहिजे ??? जगातील सर्वात convinient ठिकाण आणि वेळ ठरलेली आहे. रविवार रात्रौ ८ वाजता डोम्बोली स्टेशन पासून फ़क्त ४-५ किलोमीटर वर ;-) असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यसवायजी 20/09/2014 - 20:39
(आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात - असो जास्त अवांतर नको. टिप:- हलके घ्या हो मुवि.

पोटे 20/09/2014 - 17:48
छ्हान

श्रीरंग_जोशी 20/09/2014 - 18:56
शतशब्दकथा आवडली.

किसन शिंदे 20/09/2014 - 21:30
कथा वाचतानाच त्याच्याशी संबधित विनोद आठवला त्यामुळे कथा फारशी आवडली नाही. आपल्याला शतशब्दकथा आवडतात त्या फक्त आतिवास तैंच्या. :)

In reply to by कवितानागेश

विश्वनाथ मेहेंदळे 20/09/2014 - 23:23
हो. जमलीये. एकदम वास्तववादी आहे. मला फ्रेशर असल्यापासून या मुद्द्यावरून manager लोकांबद्दल कणव वाटत आलीये.

सस्नेह 22/09/2014 - 16:40
वरीलपैकी बऱ्याच प्रतिसादांमधून असे जाणवले की हे लेखन आवडले नाही कारण १. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही. २. मी कुणाची तरी नक्कल केली. ३. एका विनादावर ते बेतले आहे. मी हे एक मजेदार प्रयोग म्हणून लिहिले. हेतू फक्त इतरांनीपण ते एन्जॉय करावे. ही काही साहित्यकृती नव्हे. फक्त मजा आहे. Just Fun. काहींना त्याची मजा केवळ वरील कारणांसाठी घेता आली नाही याचे वाईट वाटले. लेख प्रकाशित केल्यानंतर मला हे वेगळे नाव सुचले. शतशब्दविनोद. (चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) स्नेहांकिता

In reply to by सस्नेह

दशानन 22/09/2014 - 22:10
>>(चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी) हे आवडले, हा प्रयत्न कायम सुरु ठेवा. कोण काय आपल्याबद्दल लिहित / बोलत आहे याकडे डोळसपणे पहा, पण आपला प्रतिसाद आपल्या लेखनातून द्या. शुभेच्छा :)

In reply to by सस्नेह

विश्वनाथ मेहेंदळे 22/09/2014 - 23:12
१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

In reply to by सस्नेह

विश्वनाथ मेहेंदळे 22/09/2014 - 23:12
१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)

सुहास.. 22/09/2014 - 22:14
=)) =)) ( मी विनोद पहिल्यांदाच ऐकला आहे !! ) अम्मळ शिरियस असलेला वाश्या