Skip to main content

कटी पतंग

लेखक तिमा यांनी बुधवार, 23/07/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तर बरं का, एकदा एका बाप्याची पतंग कटली! म्हणजे कुणी काटली नाही. तर कणीला जिथे मांजा बांधतात ना, तिथेच निसटली. आता लोंबणारा मांजाच नाही, त्यामुळे ती काय टपरी पोरांना भेटली नाही. ती गेली उडत उडत आधीच्या उडवणार्‍याकडे! तिला वाटलं, आपल्याला बघून त्याला आनंद होईल. पण त्याच्याकडे तर कोर्‍या पतंगांची थप्पीच होती! आणि एका सुंदर पतंगीला तो कणीच बांधत होता. त्याने कटलेल्या पतंगीला पाहिलं आणि छदमीपणे म्हणाला, तू कशाला आलीस परत? आता तुझा नंबर ही सगळी चळत संपल्यावर! कटलेली पतंग फार निराश झाली. एकदम दिशाहीनपणे उडायला लागली. एका अंबॅसॅडर चालवणार्‍या डायवरला मिळाली.

हरवले ते गवसले का? व कसे? - पीएमटीत हरवली पर्स - भाग - ६

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 21/07/2014 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

शब्द छटा - देणे - एक कला... भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 18/07/2014 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
*scratch_one-s_head*
मित्रांनो, टाईम पास चा हा विरंगुळा! घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!
देणे - एक कला... अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते. देणे ही एक कला म्हणून पाहू जाता - सल्ला प्रथम येतो. न मागता तो देणे ही घरच्यांची मेहेरबानी. तर सल्ला कला कला देता देता अशीलाचा खिसा रिता करायची कला वकील लोक जोपासतात. बायकोच्या भावाने दिलेला सल्ला मानभवीपणे ऐकून तो कटाक्षाने न पाळणे ही कला. सल्ल्याचे एक भाऊबंद - उपदेश.

शब्द छटा - खडा भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 18/07/2014 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, टाईम पास चा हा विरंगुळा! घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!! खडा भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे! कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते. ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो. दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो.

CID एपिसोड: आईच्या गावात अंन बाराच्या भावात

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 15/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 09/07/2014 22:36 या दिवशी प्रकाशित केले.

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट... असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे.

कहां गये वो लोग?--संज्या

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 07/07/2014 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा कहां गये वो लोग?--मंग्या कॉलेज सुरु होउन काही दिवस झाले होते.पावसाने चांगलाच जोर धरला होता.अशातच एका वीकेंडला ट्रेकला जायची टूम निघाली.ट्रेकिंगविषयी तशी फारशी माहीती कुणालाच नव्हती.कर्जत,पनवेल,

कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/07/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही! आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin* ................................ सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते.

कृतार्थ !..... एक भयकथा !

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 03/07/2014 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
रुचिता चपलेचा तुटलेला बंद पायाच्या अंगठ्यात आणि त्याच्या शेजारच्या बोटात घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत तशीच फरपटत चालत होती. ‘आत्ता जवळ मोबाईल असायला हवा होता...कोणालातरी घ्यायला तरी बोलावलं असतं. आता मेन रोड पर्यंत चालत जाव लागणार ! मग तिथे रिक्षा मिळेलच....’ कपाळावर आठ्या आणत ती स्वतःशीच पुटपुटत होती. शेजारून एखाद वाहन जाईल, आणि आपण लिफ्ट घेऊन घरी जाऊ ; अस स्वप्नरंजन करत तिने जवळ-जवळ अर्धा रस्ता पायीच पूर्ण केला होता. पण दुर्दैव म्हणजे एकही गाडी या रस्त्यावरून गेली नव्हती. खरेतर, इतक्या रात्री अश्या या आड रस्त्यावरून कोण कशाला प्रवास करेल ?

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 02/07/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात.