Skip to main content

विरंगुळा

उमड घुमड ...

लेखक मैत्र यांनी शनिवार, 28/06/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारपासून उकाडा जास्तच जाणवत होता. कुठे जावं तर रस्त्यावरची गर्दी नकोशी वाटत होती. गाडी चालवण्यासाठी किंवा वाट काढण्यासाठी होणारी चिडचिड लक्षात घेता तो बेत रहित केला. उगाच काहीतरी किरकोळ उद्योग करत घरीच बसून राहिलो. घरात कोंदट वाटत होतं म्हणून अनेक दिवसांनी बाल्कनीत जाऊन बसलो थोडी मोकळी हवा मिळावी अशा विचाराने. फोनचा चाळा होताच वेळ घालवण्यासाठी. थोड्या वेळाने काहीतरी फरक जाणवला की हवा बदलते आहे. वारा सुटला आहे. आजूबाजूची मोठी झाडं सळसळत होती. छोटी झुड्पं वार्‍याच्या वेगाने थडथडत होती... आभाळ भरून आलं होतं.. एखाद्या उत्तम जलरंग चित्रासारखे ग्रे ढग पसरले होते.

कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर? भाग - २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 27/06/2014 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 2
‘...रन, सर्च फॉर शेल्टर यू फूल! व्हेयरीज युवर ट्रेंच रन?... ... एयरमन चेक पोस्ट पार करून शटरवर फुली मारली तेवढ्यात मागून शिटी वाजली. दोन जण धावले मी पटकन एका आडोशाला गेलो. ‘किसने लगाया ये क्रॉस? तुम क्या कर रहे थे? ये गया ना बॉम्ब के धमाकेसे! ...’ म्हणताना ऐकत होतो. ... कडकडून थंडी वाजल्याप्रमाणे मला कंप सुटला होता. ‘आता काय एक्शन घेतली जाणार याची कटू सुनावणी ऐकायला मला भिती वाटायला लागली!’ ... पंधरा दिवसापुर्वी पहिल्या भेटीतील पुसटशी ओळख झालेला एओसी राक्षसाप्रमाणे वाटत होता.’
तेवढ्यात ‘यू, व्हाट इज युवर नेम?

कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर?

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 26/06/2014 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझे हवाईदलातील दिवस ब्लॉगची लिंक
“...बुरी तरहसे फँसा तू रे’ असं मी मला म्हणत होतो. कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्धरिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली... ...‘साहेब,अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. इथे फक्त परेडच्या सरावाला,15 ऑगस्ट, 26 जानेवारीअन पार्टीच्या वेळी ‘बँडइन अटेंडन्स’असेल तर ‘डायनिंगइन नाईट’च्यावेळी बोलावणे येते. 4-6 रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश”म्हणून बोळवण केली जाते...’ ...मलात्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली.

मी केलेला एक प्रयत्न !!

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 26/06/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
संजय क्षीरसागर आणि प्रशांत आवले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी काढलेल्या चित्रावर स्वतंत्र धागा काढत आहे. - --------------------------------------------------------------------------------- बरेच दिवसापासून आमच्या हिचे म्हणणे होते कि आपण हॉल मधील या दर्शनी भिंतीवर काहीतरी चांगले चित्र लावले पाहिजे. बाजारात बरेच फिरलो पण चित्र काही पसंत पडेना. देवाचा/गणपतीचा मोठा फोटो लावावा तर त्या भिंतीपलीकडे नेमके बाथरूम आणि शौचालय येत होते. याच भिंतीवर चित्र लावण्याचे कारण हे कि पलीकडच्या बाथरूम ची ओल सदैव भिंतीच्या पायथ्याशी दिसते व कोणी आले कि तिकडे लक्ष जाते.

बायकांचे संसारींग-माझा अनुभव

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 25/06/2014 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषांचं स्ट्रायव्हिंग हा जसा तमाम स्त्रीवर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच बायकांचं संसारींग हा पण आहे. पण याकडे तमाम स्री वर्ग जाणूनबुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत. महाभारतात नाही का, पाच पुरुष एकीशी लग्न करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या १००% स्त्रीयांना संसाराचे नियम हे दोन्हीकडून पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये.

मॅनेजमेंटचा गोडाचा शिरा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 24/06/2014 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी काहीजण व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात, तर काही जणांनी या पैकी एक केलेलं आहे. पैसे मिळवायला तुम्हाला ते करणं भाग असतं. आणि यात विशेषत: ज्यांनी नोकरी केलेली आहे, म्हणजे जे ऐलतीरावर राहिलेले आहेत त्यांना पैलतीरावरच्या माणसांचा नेहमीच (अपवाद असतीलच) त्रास झालेला आहे. सांगायचंच झालं तर ज्या प्राण्याला बॉस म्हणतात त्या प्राण्याचे लाड करण्यात, नखरे सहन करण्यात, एम्प्लॉयी किंवा कर्मचारी नामक व्यक्तीची काय तारांबळ होते, किती त्रास होतो, किती मनस्ताप होतो, राग येतो, हे ज्याचं त्याला ठाऊक आहे.

संवादिका - ३

लेखक प्रास यांनी रविवार, 22/06/2014 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
"आहेस का रे?" "आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे." "तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?" "व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?" "माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला." "असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D" "नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..." "असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?" "तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?" "काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?" "चेष्टा नकोय रे!

कावळा बायकांनाच का शिवतो?

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 14/06/2014 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे. कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले! मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते.

काय होतास तू !... काय झालास तू...!!.. सार्जंट तांदळे....!!!...

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 13/06/2014 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
pic (आठवणी हवाईदलातल्या मधून) सन १९९३. हवाईदलाच्या तांबरम पोस्टींगवर नुकताच पोहोचलो होतो. तेथील स्टेशनच्या गणेश चतुर्थीच्या आरतीला एयरमन लोकांनी एका हॉलमधे मला बोलावले होते. म्हणून मी कुटुंबासह तेथे पाचारण झालो होतो. मी आल्याचे पाहून तेथील एयरमन लोक उठून उभे राहिले. एक आसामी तरीही खुर्चीत बसून राहिलेले मी पाहिले. नंतर मला नेमकी त्याच्या शेजारची खुर्ची बसायला दिली गेली.