Skip to main content

विरंगुळा

छगनलालांचे सापळे (भाग ६)

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/11/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग : http://misalpav.com/node/25470 हा भाग डोक्यात फार आधीच तयार होता...पण काही कारणांमुळे लिहायला उशीर झाला...दिरंगाई बद्दल क्षमस्व....

डोब्रा - भाग २

लेखक खटपट्या यांनी रविवार, 02/11/2014 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
डोब्रा - भाग १ तो बाहेर गेलाय हे बघितल्यावर डॉक्टर सरपटत रूम सर्विसच्या बटणापर्यंत कसेतरी पोहोचले आणि त्यांनी रूम सर्विसचे बटण दाबले. ------------------------------------------------------------------------------------------- रूम सर्विस चे बटन दाबताच दोन ते तीन मिनिटात रूम सर्विसचा माणूस आला. समोरील दृश्य पाहताच तो प्रचंड घाबरला. ताबडतोब मागे फिरून त्याने व्यवस्थापनाला घटनेची खबर दिली. हॉटेल व्यवस्थापनेचे लोकही झाला प्रकार पाहून स्तंभित झाले. त्यांनी लगेच हे प्रकरण स्थानिक पोलिसांना कळवले. चौकशी सुरु झाली.

काही प्रसंग

लेखक सुज्ञ यांनी बुधवार, 29/10/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रसंग. वेळ: तुमच्या मनात येईल ती … स्थळ: तुम्हाला वाटते तेच. प्रसंग पहिला सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात. एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं.

कमल घर (एक वात्रटपणा)

लेखक शरद यांनी बुधवार, 29/10/2014 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
कमल घर चार एक वर्षांपूर्वी मी "उपक्रम"वर हायकूवर एक लेख लिहला होता.नेहमीच्या ५-७-५ या तंत्राची माहिती दिल्यावर कवी श्री. राजेश घासकडबी यांनी एक पृच्छा केली कमल घर बघ कमल घर कमल बघ ह्याला हायकू म्हणावयाचे का ? माझा यावरचा प्रतिसाद थोडा दीर्घ व अवांतर असल्याने प्रतिसाद म्हणून न देता एक नवीन चर्चा विषय म्हणून मांडला होता. चर्चा का हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल. फारा वर्षांपूर्वी सत्यकथेत एका लेखिकेची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी कवीमंडळात ही एक फार मानाची गोष्ट होती. आता आम्हाला कळली नाही, पण हे काही नवीन नव्हते. नेहमीचीच ओरड. खरी गंमत पुढील अंकात. त्या लेखिकेने पत्रच लिहले.

"डोब्रा"

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 25/10/2014 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
(हि कथा "अती काल्पनिक" आहे याची कृपया नोंद घ्यावी") डॉक्टर शेणोय हे मानव वंश शास्त्राचे गाढे अभ्यासक व तज्ञ. जगभरातील आणि भारतातील मानव वंशा बद्दल त्यांचा दांडगा व्यासंग होता. आपल्या सारख्या सामान्य लोकांना फक्त युरोपियन, आफ्रिकन, चीनी आणि आशियायी असे मूळ मानव वंश माहित आहेत कारण ते बघताचक्षणी आपल्याला लक्षात येतात. पण आपण जसे भारतीयांमध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांना ओळखू शकतो तसे युरोपियन लोक आपल्याला ओळखू शकत नाहीत त्यांना सारे भारतीय सारखेच. तसेच आपल्या दृष्टीने डच, फ्रेंच, ब्रिटीश, स्पेनिश हे सगळे युरोपियनच.

पुणेरी.......

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 18/10/2014 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी????????????? ह्ये काय म्हणायचं हो आता तुमचं नविन??? नेहेमीचं पुणं..पुणं..नावाचं नवं रडगाणं? कि बघा आमच्या पुण्याचं हे ठिकाण...म्हणून वाजवलेलं पिपाणं? की आणखि काही? तर नाही बरं का तसलं काही. पुणेरी हे आमच्या पुण्याच्या आत्म्यात वसलेलं एक छोटेखानी सूखं होतं. आणि होतं म्हणायचं म्हणजे अता त्याला बंद होऊन चार वर्ष झाली. तुंम्ही म्हणाल कित्ती छळ करताय आढे आणि वेढे घेऊन..? सांगा कि लवकर काय ते!? तर सगळं कळायला जरा तुंम्हाला माझ्या वेदपाठशालिन(किंवा कालिन!) जीवनात घेऊन जातो. (आलं कि नै ..पहिलं पुणेरी श्टाइलचं वाक्य!

बयो !! - भाग ३ (अंतिम)

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 18/10/2014 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
बयो !! - भाग १ बयो !! - भाग २ "मग काय ते सविस्तर सांग" ------------------------------------------------------------------------------------- "सांगते बाबा सगळं. हि बयो माझ्यापेक्षा दोन वर्षाने लहान आहे. फक्त दोन वर्षाने लहान असून तिचे खूप लाड व्हायचे घरी. तिला जे मागेल ते खायला प्यायला द्यायचे आई बाबा. मलाही द्यायचे पण तिच्याकडे आई बाबांचे जरा जास्तच लक्ष होतं. यामुळे तिला बाहेरचं चमचमीत खायची सवय लागली.

शिआयडी गंमत

लेखक दशानन यांनी गुरुवार, 16/10/2014 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा. पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द. मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा. अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द. अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे?