Skip to main content

विचार

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 25/05/2018 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
२: परभणी- जिंतूर- नेमगिरी एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना ११ मे ला पहाटे साडेपाचला परभणीतून निघालो. अनेक जण निरोप देण्यासाठी आले, त्यामुळे उत्साह आणखी वाढला. अनेक जणांनी मॅसेजवरही शुभेच्छा दिल्या. काही अंतरापर्यंत माझे प्रिय सायकल मित्र आणि माझे रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा सोबत आले. मी चालवतोय ती एटलस सायकल त्यांचीच तर आहे! पाय दुखत असूनही ते काही अंतर सोबतीला आले. थोडा वेळ त्यांची सोबत मिळाली व मग पुढे निघालो. योग प्रसार हेतु सायकलिंगच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आहे.

इस रंग बदलती दुनिया में !

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 24/05/2018 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच एका अध्यात्म वगैरेंच्या धाग्यावर इथे एक अवांतर चर्चा सुरु झाली (म्हणजे मीच सुरु केली म्हणा!) त्याला माझं छिद्रान्वेषण कारणीभूत आहे असे काही लोकांचं मत झालं. पण तरीही त्या चर्चेतला मुख्य मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो. खूप साधा सरळ मुद्दा... एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी त्याला फक्त "काळ्या" म्हणणे पुरेसे आहे? आपण बरेच "कॉमेडी" शो पाहतो. त्यातले निम्मे अर्धे विनोद हे शारीरिक व्यंग किंवा रंग (म्हणजेच तो किती काळा आहे त्यानुसार) यावर असतात.

आख्यायिका

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 20/05/2018 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा आख्यायिकांचा देश आहे. इथे हरघडी, हरवक्त, हरयुगी नवनवीन आख्यायिका जन्माला आल्या. ** आख्यायिका सर्रियल भासतात. लाईफलाईक असतात. 'हे खरं आहे' असं वाटता वाटता एकदम भानावर येऊन लक्षात येतं अरे ही तर आख्यायिका आहे. पण आख्यायिका आभासी मात्र नसतात. किंबहुना त्या वास्तवाची जुळी प्रतिमा असतात. वास्तवाचं प्रतिबिंब असतात. त्यामुळे, आख्यायिका अमर आहेत. कारण वास्तव अमर आहे, अचल आहे. ** भक्तीमार्गात नवविधा भक्ती सांगितल्या आहेत. श्रवण, किर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे ते भक्तीचे प्रकार. सांगणारे सांगून गेले.

अन्नदाता सुखी भव भाग ९ : आहे का सुंदर हा चॉकलेटचा बंगला?

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 20/05/2018 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि

बेबी डोल मै सोने दी

लेखक जेडी यांनी शनिवार, 19/05/2018 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल "एबीपी माझा"वर एक बातमी पाहिली. त्यात सुरुची त्रिवेदी या मुलीने एका गतीमंद मुलाशी लग्न केले आणि त्यांचा संसार कसा सुखाचा आहे वैगेरे दाखवत होते. त्यांना एक मुलगी देखील आहे वैगेरे दाखवत होते. त्या बातमीला “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील”, हे गाणे पार्श्वसंगीत म्हणुन वापरले होते. त्यात त्या मुलीच्या सासू सासऱ्यांची, गतीमंद नवऱ्याची मुलाखत दाखवली , तो माणूस फक्त ती खूप प्रेम करते एवढेच बोलू शकला पण बाकी ती कशी खुश आहे, कुटुंब कसे सावरलेय वैगेरे वर भाष्य चालले होते. घरातल्यांचा तिच्या कौतुकाचा पाढा चालू झाला, प्रेम असे असावे वैगेरे.

कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख ३.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 17/05/2018 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग १, भाग २)

विदिशेजवळची आणि कालिदासास ’नीचै:’ ह्या नावाने माहीत असलेली ही टेकडी म्हणजेच दिल्लीच्या स्तंभामध्ये उल्लेखिलेला ’विष्णुपदगिरि’ असा तर्क ठरल्यावर तिच्यावर तो ’विष्णुध्वज’ अशा वर्णनाचा लोहस्तंभ कोठे उभा असेल ह्याच्या शोधाचा प्रारम्भ होतो, आणि त्यासाठी आपणास प्राचीन भारतीयांच्या ज्योतिर्विज्ञानाकडे वळावे लागते.

सिनेमागृहातल्या अंधाराच समाजशास्त्र आणि मानसशास्त्र

लेखक पिंपातला उंदीर यांनी बुधवार, 16/05/2018 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
'गुलाबजाम ' मधली राधा आगरकर जेंव्हा जेंव्हा vulnerable असते तेंव्हा तेंव्हा चित्रपटगृहात जाऊन बसत असते . तिला रणबीर कपूर आवडत असतो हे एक कारण झालंच . पण माझा असा अंदाज आहे की सिनेमागृहातला तो विशिष्ट अंधार तिला comforting वाटत असणार नक्कीच . तो अंधार तिला काही तासांपुरता का होईना तिच्या वेदना पुरून टाकण्यास मदत करत असणार . थियेटरमधला अंधार ही प्रचंड टेम्पटिंग गोष्ट असते . अंधाराच्या पण जातकुळी असतात . माजघरातला अंधार , दिवे गेल्यावर होणारा अंधार , निर्मनुष्य शेतातला अंधार ह्या सगळ्या अंधाराच्या जातकुळी वेगवेगळ्या आहेत . अंधार हा बहुतेकवेळा भयानक आणि काहीवेळा प्रचंड सुंदर असतो .

कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख २.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 15/05/2018 23:20 या दिवशी प्रकाशित केले.

चन्द्रगुप्त विक्रमादित्याच्या विष्णुभक्तीचा आणखी स्पष्ट पुरावा पाहण्यासाठी आपणास सध्याच्या मध्य प्रदेशातील विदिशा गावाच्या (२३ ३१' ७९.९" उत्तर, ७७ ४८' ३५.३" पूर्व) जवळच पश्चिम दिशेकडे २-३ कि.मी. वर असलेल्या ’उदयगिरि’ नामक छोटया टेकडीकडे जावे लागेल. हा पुरावा पाहण्यापूर्वी ’उदयगिरी’चा परिचय करून घेऊ.

कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख १

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 15/05/2018 07:26 या दिवशी प्रकाशित केले.

दिल्लीला भेट देणारा प्रत्येक प्रवासी, प्रख्यात कुतुब मिनार, त्याच्याजवळील कुव्वत-उल-इस्लाम ही आता पडझड झालेली मशीद आणि तिच्या प्रांगणातील लोहस्तंभाला भेट दिल्याशिवाय राहात नाही. ह्यांपैकी कुतुब मिनार आणि मशीद ह्यांचा इतिहास पुरेसा स्पष्ट आहे, परन्तु लोहस्तंभाकडे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. हा स्तंभ कोणी आणि का निर्माण केला, तो पहिल्यापासून येथेच आहे की आधी तो अन्य कोठे होता आणि तेथून येथे आणला गेला आहे, अन्य अनेक स्तंभांप्रमाणे हाहि बाहेरून येथे आणला गेला असेल तर त्याचे मूळ स्थान काय असावे ह्याविषयी तो विचार करू लागतो.

एकाच माळेचे मणी

लेखक जेडी यांनी सोमवार, 14/05/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते. पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले. बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या.