Skip to main content

विचार

संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ?

लेखक आशु जोग यांनी रविवार, 01/07/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ? या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा पुन्हा टिका करताना दिसतात. काय असतील या संघ विरोधामागची कारणे ? इंग्रजांविरुद्ध मोठ्या लढाईला सुरुवात झाली ती 1857 मधे. त्याचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले आणि झाशीच्या राणीसारखे संस्थानिक त्यात सहभागी होते. पुढे वासुदेव बळवंत फडकेंनी सशस्त्र लढा दिला. सर्वात कमी वयाचा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे, तीन चाफेकर बंधू फासावर चढले.

आजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे!

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 30/06/2018 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे. "९८१ भागिले ९ किती होतात रे?" कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. "कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.स्वत;चे स्वत: करायचे." ( डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.) “ह्या! त्याची काय गरज आहे? ९८१ भागिले ९ ना... सोप्पे तर आहे उत्तर ९९.”तो म्हणाला मी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे.

काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .

लेखक Sanjay Uwach यांनी शनिवार, 30/06/2018 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी . मला माझ्या तरुण वयातच काश्मीर मध्ये जवळ जवळ पाच वर्षे शिक्षणाच्या निमित्याने राहण्याची संधी मिळाली. सर्व जगात पृथ्वीवर स्वर्ग असेल तर काश्मीर असेल ,असे सांगणारा सम्राट किंव्हा ."काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे ." अशा सारखी कानावर पडणारी भाषणे . . पाकीस्तानला उद्देशून त्यांना दम भरण्या साठी केलेली नेते मंडळीची विधाने .भारतीय सेनेचे असणारे काश्मीर मधील कायमचे वास्तव, या वर होणारी सादोदित चर्चा , तसेच धर्माच्या आधारे होणारी हिंसा.

स्वैपाकघरातून पत्रे ३

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 30/06/2018 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!

लेखणी का कीबोर्ड ? (उत्तरार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 22/06/2018 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध इथे आहे: https://www.misalpav.com/node/42843 * * * * * * इ-माध्यम सध्या यांत प्रसिद्ध होणारे साहित्य ते साधारण ३ गटांत मोडते: १. वैयक्तिक अनुदिनी: येथे एखादा लेखक त्याचे लेखन स्वतःच जालावर नियमित प्रसिद्ध करतो. या प्रकारे जगातील कोणीही इच्छुक लेखक बनू शकतो आणि मनसोक्त, विनाअडथळा लिहू शकतो. २. संस्थळे: यांना एक प्रकारे जालावरची नियतकालिके म्हणता येईल.

मा.ल.क.-४

लेखक शाली यांनी गुरुवार, 21/06/2018 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासात रस असल्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा कालखंड हा प्रवासातच व्यतीत झाला होता. अनेक भुभाग, अनेक देश, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती, भाषा, कला पहात तो बराच फिरला होता. आज मात्र दिवसभर चालूनही त्याला थकवा आला नव्हता. कारण आजुबाजूचा सधन शेती, निसर्ग असलेला भाग, त्या भागातून जाणारा रस्ता, रस्त्यातील विश्रांती स्थळे, पाणपोया या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. तो शहराच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेंव्हा पहारेदारांनी अत्यंत नम्रपणे पण कसोशीने त्याची चौकशी करुन त्याला शहरात प्रवेश दिला होता. “राजधानीचे शहर असल्याने काटेकोर चौकशी करावी लागते” असे सांगत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.

लेखणी का कीबोर्ड ? (पूर्वार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 19/06/2018 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला. निरनिराळ्या प्रकारची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध छापील माध्यमे निर्माण झाली.